मुंबई: राजकीय वर्तुळात सध्या निवडणूक आयोगाच्या 'एसआयआर' (SIR) प्रक्रियेवरून आणि मतमोजणीबाबत जोरदार वाद सुरू असतानाच, भारतीय जनता पक्षाने (BJP) काँग्रेस पक्षावर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर सविस्तर पोस्ट शेअर करत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "सोयीनुसार आपले रंग बदलणे आणि राजकीय स्वार्थासाठी लोकशाही संस्थांवर खोटे आरोप करणे हाच काँग्रेस पक्षाचा जुना राजकीय पराक्रम राहिला आहे," अशी घणाघाती टीका रवींद्र चव्हाण यांनी केली आहे.
'व्होट चोरी'च्या आरोपांवरून काँग्रेसवर प्रहार
काही दिवसांपासून देशभरात निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरावृत्ती (SIR) प्रक्रियेवरून आणि मतदार याद्यांमधून नावे वगळल्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी रान उठवले आहे. राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी या मुद्द्यावरून दिल्लीत जोरदार निदर्शने आणि आंदोलन केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विरोधी पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राहुल गांधींच्या आरोपांची चांगलीच पोलखोल केली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "ज्या राज्यांमध्ये तब्बल चाळीस-चाळीस वर्षे काँग्रेसचा एकही मुख्यमंत्री होऊ शकला नाही, तिथे प्रत्यक्षात त्यांच्याच मित्रपक्षांची किंवा विरोधकांची सत्ता होती. मात्र, निवडणुकीच्या राजकारणात जेव्हा पराभव समोर दिसू लागतो, तेव्हा 'व्होट चोरी'चा (मत चोरीचा) खोटा कांगावा सुरू केला जातो. राहुल गांधी आणि काँग्रेस नेते सोयीच्या राजकारणासाठी अशा मुद्द्यांचा वापर करतात, परंतु त्याच राज्यांमधील मूळ वास्तवाबाबत ते तोंडातून 'ब्र' देखील काढत नाहीत."
"चोराच्या उलट्या बोंबा" - रवींद्र चव्हाणांची टीका
जनतेने वारंवार नाकारल्यानंतर आता थेट देशाच्या लोकशाही संस्थांवर, निवडणूक प्रक्रियेवर आणि स्वायत्त यंत्रणांवर अविश्वास दाखवणे ही काँग्रेसची जुनीच सवय असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेचा कौल स्वीकारण्याची तयारी नसताना अशा पद्धतीचे निराधार आरोप करणे म्हणजे नेमकी "चोराच्या उलट्या बोंबा" अशीच गत असल्याचा टोला त्यांनी लगावला.
देशभरात सुरू असलेल्या या राजकीय कलगीतुऱ्यामुळे सत्ताधारी भाजप आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाच्या कारभारावर आणि मतमोजणीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांना भाजपने आता अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे.
शहर
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
- पुणेः भरलेल्या सिलिंडरमधून पाइपद्वारे गॅस काढून रिकाम्या सिलिंडरमध्ये भरण्याचा घातक प्रकार; कधीही घडू शकतो मोठा स्फोट!
महाराष्ट्र
- अहिल्यानगर: खासदार सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीच्या नावावर १२८० एकर सरकारी जमीन; शेतकरी आणि विरोधक आक्रमक, राजकीय वातावरण तापले
- कोल्हापूर: तेरवाडमध्ये भरधाव कंटेनरचा थैमान; पादचारी महिला व दुचाकीस्वारांना चिरडल्याने चारजण जागीच ठार, चालक पसार
- पुणे: गोपाळ गोडसे यांनी संघाची तुलना चोरांशी केल्यावर मला काही भाष्य करायचे नाही, सात्त्यकी सावरकर; राहुल गांधी मानहानी खटल्यात उलटतपासणी पूर्ण
- पुणे: एनआयबीएम ॲनेक्समधील ७ हजारांहून अधिक कुटुंबांना हक्काच्या उद्यानाची प्रतीक्षा; मोकळ्या जागेवर गार्डन व वॉकिंग ट्रॅकची जोरदार मागणी
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तराखंड: काँग्रेस सोडण्याच्या चर्चांवर हरीश रावत यांनी सोडले मौन; विनापरवानगी जनसंवाद यात्रेवरून हायकमांड नाराज!
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!























Subscribe to my channel



