आपण काय केलं हा भूतकाळ. काय करत आहोत हा वर्तमान आणि त्याचे परिणाम हे भविष्य. कोणत्या घटना घडणार हे युनिव्हर्स मध्ये ठरलेल आहे. त्याचा कोणाला किती अंदाज येतो हे ज्याच्या त्याच्या साधना संवेदनेवर अवलंबून आहे. कर्म सिद्धांत हा खूप मोठा विषय आहे. त्याच्या संपूर्ण अभ्यासाला एक जन्म पुरत नाही. संपूर्ण विश्व हे अणू-परमाणुनी भरलेले आहे. त्यांच्या अनेक कास्ट जाती प्रकार कॅटेगिरी आहेत. एका विशिष्ट प्रकारचे परमाणु असतात त्यांना कार्मिक जड अशा स्वरूपाचे संबोधले आहे. हे कार्मिक जड परमाणु विश्वात सर्वत्र विखुरलेले असतात. आपण केलेल्या भावनेनुसार ते त्या वेळी आकृष्ट होतात. आपल्या मन आत्म्याशी एकीभुत होतात. ते किती काळ सुप्त अवस्थेत राहणार याचा काळ त्यावेळी निश्चित होतो. ते कधी कोणत्या स्वरूपात फलादान देणार हेही निश्चित होते. आणि त्या निश्चित काळात ते फलित होतात. आणि ते त्यांचे काम करतात. यालाच आपण कर्माचे फळ मिळाले असे म्हणतात. हे सहज भाषेत लिहिले. अध्यात्म शास्त्रीय टर्मिनोलॉजी वेगळी आहे. पूर्वी रेडिओ असायचे. आपण एखादा बँड दाबून गोल बटन फिरवायच. ज्या अंशाच्या लहरीवर आपण थांबलो ते रेडिओ केंद्र लागायचे. कर्मांच तसंच आहे. आपण कोणती भावना आता केली? मुख्य म्हणजे किती तीव्रतेने केली. Intention महत्त्वाचे आहे. नकळत की मुद्दाम? यावर त्या ठिकाणी किती शक्तीचा कर्म बंध होणार अवलंबून आहे. आणि त्यानुसार तो नंतर फल देतो. यासाठी घटाचे उदाहरणे समर्पक आहे. एक ओला आणि एक वाळलेला असा घट ठेवलेला आहे. हवेच्या झुळकेतून धुळ येते. दोन्हीही घटांवरती धूळ बसते. हवेच्या दुसऱ्या झुळके सरशी कोरड्या घाटावरची धूळ निघून जाते. पण ओल्या घटावरची धूळ काढण्यासाठी त्याला धुवावे लागेल. अर्थातच परिश्रमपूर्वक स्वच्छता करावी लागेल. कर्माचे असेच आहे. कोणतेही कृत्य करताना ते किती तीव्रतेने केले आहे यावर त्याचे निर्मूलन अवलंबून असते. जगातल्या सर्व धर्मातल्या सर्व प्रकारच्या साधना तपस्या या कर्मांना विखंडित करून जर करून नष्ट करण्यासाठीच आहेत. त्याला शास्त्रामध्ये निर्जरा असा शब्द आहे. जशी जशी ही कर्म निर्जरा होत जाते तसे तसे ज्ञान आणि शक्तीचा अवरोध संपून ती प्रकट होतात. यालाच आपण पूर्ण ज्ञान झाले असे म्हणतो. संपूर्ण ज्ञानाची अवस्था ही संपूर्ण कर्मवीखंडित झालेली प्रकृती असते. म्हणून प्रत्येक क्षणाला समभावात राहावे असा आध्यात्मिक उपदेश असतो. अर्थात हे कर्म घडण्याचे दोनच द्वारे असतात: राग आणि द्वेष. क्रोध मान माया लोभ हे त्याचे परिणाम स्वरूप असतात. आज या प्रसंगी जास्त न लिहिता फक्त इतकेच की आपण जे घडले घडत आहे पाहतो म्हणतो जाणीव करतो, तो हाच परिणाम असतो आपण केलेल्या पूर्व कृत्यांचा. आणि हे विज्ञान संमत आहे. हे भौतिकशास्त्राचा सूक्ष्म संवेदनशील भाग आहे. अध्यात्मात हे प्रथम आले. म्हणून सर्व धर्मांचे सर्व तत्त्वज्ञान याच्या भोवती फिरते. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) (संपर्क- 9420015108)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय दिला? पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून प्रफुल पटेलांचा सवाल, महायुतीत रंगली चर्चा!
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
- ठाणे: पुर्णेकर हत्या प्रकरणातील दोषींची गय केली जाणार नाही; खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा; या संवेदनशील प्रकरणावर राजकारण न करण्याचे आवाहन!
महाराष्ट्र
- पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने उमेदवार कसा काय दिला? पुणे शिक्षक-पदवीधर मतदारसंघाच्या जागेवरून प्रफुल पटेलांचा सवाल, महायुतीत रंगली चर्चा!
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या बंद जलवाहिनी प्रकल्पाला आता आंद्रा धरणग्रस्तांचाही तीव्र विरोध; पुनर्वसन आणि प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची हाक!
- गोवा: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या मृतदेहाचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये शवविच्छेदन पूर्ण; अंतिम दर्शनासाठी पार्थिव बाहेर ठेवण्यात आले!
- छत्रपती संभाजीनगर: ज्या वर्गखोलीत विद्यार्थ्यांना घडवले, तिथेच संपवले जीवन; आर्थिक फसवणूक आणि बँकेच्या जप्ती नोटीसला कंटाळून 'फिनिक्स' क्लासेसच्या संचालकाची आत्महत्या!
गुन्हा
- सांगली: पती-पत्नीमधील वादानंतर जिव्हारी लागणारी घटना; विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू, संतापलेल्या नातेवाईकांकडून सासूला मारहाण!
- नागपूर: दारूच्या नशेत अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या पित्याची अल्पवयीन मुलीनेच केली हत्या; एमआयडीसी परिसरातील घटना
- अहिल्यानगर: राहुरीत मन हेलावणारी दुर्घटना! अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे आईने दोन चिमुकल्या मुलांसह गळफास घेऊन संपवले आयुष्य
- पुणे: ऐतिहासिक कसबा गणपती मंदिरात मध्यरात्री चोरी; दानपेटी फोडून ६० हजारांची रोकड लंपास
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३० सप्टेंबर २०२६: लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग देणार या राशींना अफाट लाभ आणि नोकरीत मोठा फायदा!
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: शिवसेनेच्या अंतर्गत नियुक्त्या लोकशाही मूल्यांशी सुसंगत नाहीत; धनुष्यबाण चिन्ह आणि पक्ष नियंत्रण वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी!
- दिल्ली: मी इथे सरकार बदलायला आलो नाही; प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासमोर मांडले तीन कठीण सवाल!
- उत्तर प्रदेश: वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या आश्रमाच्या सुरक्षेत वाढ करण्याची मागणी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी प्रशासनाला पत्र!
- नवी दिल्ली: विरोधकांची मोट बांधण्यासाठी रणनीती; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंकडून आज 'इंडिया' आघाडीच्या खासदारांना स्नेहभोजनाचे निमंत्रण!























Subscribe to my channel



