छत्रपती संभाजीनगर: श्री क्षेत्र वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिर परिसरामध्ये सध्या राज्य शासनाकडून विविध विकासकामांना जोरदार वेग देण्यात आला आहे. मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास आराखडा आणि भाविकांच्या सुविधेसाठी कन्नड-खुलताबाद रस्त्याखाली सुमारे ७५ मीटर लांबीच्या भुयारी मार्गाचे (अंडरपास) काम हाती घेण्यात आले आहे. या विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर आगामी २० ऑक्टोबरपासून किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून सलग सहा महिने भाविकांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची चर्चा प्रशासकीय स्तरावर सुरू झाली होती. यामुळे वेरूळ येथील स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ, पुजारी आणि भाविकांमध्ये मोठी नाराजी पसरली होती.
प्रमुख पर्यटन आणि यात्रांचा मुख्य हंगाम आता सुरू होत असतानाच मंदिर दीर्घकाळ बंद ठेवल्यास स्थानिक व्यावसायिक, हॉटेल-लॉजिंग व्यावसायिक व स्थानिक अर्थव्यवस्थेवर मोठा विपरीत परिणाम होईल, या चिंतेपोटी वेरूळ येथील स्थानिक व्यापारी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांची प्रत्यक्ष भेट घेतली. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मंदिर दीर्घकाळ बंद न ठेवण्याची आक्रमक मागणी केली. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेत स्पष्ट केले की, मंदिर पूर्ण सहा महिने कधीही बंद ठेवले जाणार नाही. विकासकाम करताना दिरंगाई टाळून कालावधी शक्य तितका कमी ठेवण्याचा आणि भाविकांना दर्शन सुलभ होईल यादरम्यान योग्य ती खबरदारी घेण्याचा प्रशासनाचा पूर्ण प्रयत्न राहील, असे ठोस आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
वाहतूक नियोजनाचा फज्जा आणि स्थानिकांची गैरसोय: दरम्यान, घृष्णेश्वर मंदिर परिसरातील या प्रस्तावित भुयारी मार्गाच्या व विकासाच्या कामाला सुरुवात झाल्यामुळे वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मात्र, प्रशासनाने योग्य आणि ठोस पर्यायी वाहतुकीची सुसज्ज व्यवस्था करण्यापूर्वीच थेट प्रमुख रस्ता बंद केल्यामुळे वेरूळमध्ये येणारे भाविक, पर्यटक आणि स्थानकांची प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहायला मिळाले. प्रशासनाकडून दुचाकी व हलक्या वाहनांना मुभा असल्याचे सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात चारचाकी वाहने आणि प्रवासी रिक्षांनाही मज्जाव केल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. यामुळे तातडीने अधिक सुटसुटीत आणि स्पष्ट पर्यायी मार्ग निश्चित करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे. वेरूळमधील या २१० कोटी रुपयांच्या विकासकामांतर्गत भाविकांना केवळ ३० मिनिटांत सुलभ दर्शन मिळावे यासाठी आधुनिक दर्शनवारी व विविध सुविधा उभारल्या जात आहेत, परंतु स्थानिकांच्या रोजगाराचा व पर्यटनाचा प्रश्न लक्षात घेऊन योग्य समन्वय साधण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




