डॅा. पुष्पा लिमये लिखित विविधा हा स्फुट लेखसंग्रह हाती पडला. या पुस्तकात चरित्रपर लेख, धार्मिक व अध्यात्मिक साहित्य, संत वाड्मय, इतिहासविषयक लेख अशा विविध विषयांवरील चिंतन आढळते. विषयांचे वैविध्य आणि लेखिकेचे नाव यांना एका सूत्रात गुंफणारी वेगवेगळ्या फुलांची परडी मुखपृष्ठावर आहे. उमेदीच्या काळात अनेक ठिकाणी नोकरी बदलत, शेवटी अध्यापिका आणि प्राचार्य असा लेखिकेचा जीवनप्रवास झाला आहे. त्यांचे अनुभवसंपन्न विचारविश्व त्यांच्या लेखणीतून उमटले आहे. पुस्तकातील लेख तीस-पस्तीस वर्षांपूर्वी लिहिले आहेत. लेखांच्या विषयात यादृच्छिकपणा असल्याने वाचकांशी सूर जुळण्यास सुरुवातीला थोडा वेळ लागतो. पुस्तकाला आनंद हर्डीकर यांचे अनुभवी संपादन लाभले, ही या पुस्तकाची जमेची बाजू आहे. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात विशेष प्रकाशझोतात न आलेल्या समाजसुधारक धुरिणांबद्दल लेखिका विशेष विस्ताराने आणि जिव्हाळ्याने लिहितात. ज्या अधिकाराने हा विषय मांडला गेला आहे, त्यावरून तो त्यांचा अभ्यासविषय असल्याचे लक्षात येते. वऱ्हाड प्रांताचे ‘न्यायमूर्ती रानडे’ म्हणवले गेलेले विष्णू मोरेश्वर महाजनी यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचे इंग्रजी भाषांतर केले. हे कार्य आजवर अप्रकाशितच राहिले. अशा प्रकारे संत साहित्याचे इंग्रजी भाषांतर करण्याचा कदाचित हा पहिलाच प्रयोग असावा. उदाहरणादाखल काही अभंग आणि त्यांचे फर्मास इंग्रजी भाषांतर दिल्याने विष्णू मोरेश्वर महाजनी यांच्या कार्याच्या थोरवीचे प्रत्यंतर येते. महादेव मोरेश्वर कुंटे यांच्याबद्दल लेखिका विशेष आत्मीयतेने लिहितात. कुंट्यांचा धर्मविचार आणि तत्वज्ञान, तत्कालीन धर्माचे विकृत स्वरूप, त्यातील साचलेपण, नवे पंथ स्थापण्यातील निरर्थकपणा, काळाची पावले ओळखून औद्योगीकरणाची गरज, व्यावसायिक शिक्षणाची पायाभरणी (1885 सालात कुंट्यांनी स्वत: सूर्यशलाका नावाच्या शिसपेन्सीलींचा कारखाना काढला होता!), त्यांची राजकीय भाष्ये, जागतिक इतिहासाचा अभ्यास, पुढारलेली सामाजिक दृष्टी आणि व्यक्तिगत जीवनात त्याचे काटेकोर पालन (मुलीचे दोष न लपवता तिचे लग्न लावून देणे आणि कुष्ठरोगी मुलाला पत्नीचा रोष पत्करून अविवाहित ठेवणे, या गोष्टी एकोणिसाव्या शतकात क्रांतिकारक होत्याच. शिवाय कुंट्यांच्या उच्च नैतिक आचरणाचे दर्शन घडवणाऱ्या होत्या.), शैक्षणिक विचार यावरील विस्तारपूर्वक लेखांमधून कुंट्यांचे जीवितकार्य समाजापुढे आणण्याची लेखिकेची प्रामाणिक तळमळ दाद देण्याजोगी आहे. केशवसुतांपूर्वी दीडेक दशक कुंट्यांच्या काव्यविचारातील आधुनिकतेचे यथार्थ विवेचन करणारा लेखही वाचनीय आहे. एकोणिसाव्या शतकातील वाचनसंस्कृती व त्यात होत गेलेले बदल यावरही अभ्यासपूर्ण प्रकरणे आहेत. 1825 ते 1885 या काळात 152 नवीन मराठी मासिके निघाली, अशी माहिती मिळते. त्यातील 1825 ते 1840 या कालावधीत केवळ तीन मासिके होती! निबंधमाला, निबंधचंद्रिका, मनोरंजन, न्यायदीपिका, दीनमित्र, कुमारसंभव, दंभहारक, विविधज्ञान अशा नावांची मासिके आणि त्यांच्या मासलेवाईक वर्गणीदारांशी संबंधांवरचा लेख आजच्या काळाच्या प्रकाशात वाचताना गंमतशीर वाटतो. वऱ्हाड समाचार या वृत्तपत्राच्या वृत्तांतावरही दृष्टीक्षेप टाकण्यात आला आहे. लेखिकेचे पीएचडीचे मार्गदर्शक, डॅा. सु. रा. चुनेकर, संतसाहित्याचे अभ्यासक व एस. पी. महाविद्यालयातील प्राध्यापक डॅा. व. दि. कुलकर्णी, नानासाहेब चापेकर या बिजवराशी विवाह झाल्यानंतर पन्नास वर्षे त्यांच्याशी नेटाने संसार करणाऱ्या रमाबाई चापेकर यांच्यावर व्यक्तिचित्रणपर लेख आहेत. हे सगळेच लेख विशेष उल्लेखनीय आहेत. चुनेकरांचे कृतज्ञ स्मरण, व. दि. कुलकर्णींशी जुळालेला स्नेहबंध लेखातून प्रकट होतो. नानासाहेब चापेकरांच्या जीवनचरित्रात सतत पहिल्या पत्नीचे उल्लेख येतात, परंतु रमाबाईंना कसलेही स्थान नाही, हे वाचताना मन भरून येते. रमाबाईंच्या वाट्याला आलेले अवहेलनेचे सोशिक जगणे, केवळ हळहळायला लावणारे आहे. ते लेखिका प्रत्ययकारी रितीने वाचकांपर्यंत पोहोचवतात. भा. रा. तांबे, ना. सी. फडके, कुसुमाग्रज, वसंत बापट यांच्यासारख्या दिग्गज साहित्यिकांच्या निवडक साहित्य आणि काव्याचे रसग्रहण करणारे अभिरुचीपूर्ण लेख पुस्तकात आहेत. ‘भूमिकन्या बहिणाबाई चौधरी : एक चिंतन’ या पुस्तकासह 'गोची' (काव्यसंग्रह), 'शिवविजय' (छत्रपती शिवाजी महाराजांचे पद्य चरित्र), ‘मुहम्मद - क्रांतीचे प्रेषित’ या इतर काही पुस्तकांचे परिचय करून देणारे लेख आहेत. पुस्तकातील रिकाम्या जागांत लेखिकेने स्वतःच्या भावकविता, चारोळ्या पेरून कवयित्री असण्याचाही परिचय दिला आहे. त्यातून पुस्तकाच्या देखणेपणात भरच पडली आहे. गणेश योगींद्रांवरचे लेख व्यक्तिगत श्रद्धेतून लिहिले गेले आहेत. सर्वच वाचकांना ते पटतील असे नाही. सुरुवातीलाच हे लेख येत असल्याने या लेखांचा प्रभाव संपूर्ण पुस्तकावर रेंगाळताना जाणवतो. प्रस्तुत लेख अनेक वर्षांपूर्वी इतरत्र प्रकाशित झाले, ते पुस्तकरूपाने पुनर्प्रकाशित करताना काही ठिकाणी पुढचे-मागचे संदर्भ देणे आवश्यक ठरते. (उदाहरणार्थ पुण्याचे गणपती, या वेगळ्या पुस्तकासाठी लिहिलेला प्रस्तावनापर लेखात पात्रपरिचय अपेक्षित आहे.) पुढील आवृत्तीत काही किरकोळ मुद्रण दोष (उदा. विष्णू मोरेश्वर यांचा जन्म1951 साली झाल्याचा उल्लेख आहे; तो 1851 हवा.) दुरुस्त करता आल्यास नवख्या वाचकांचा गोंधळ कमी होईल. उपेक्षित किंवा फारशा चर्चिल्या न गेलेल्या वैविध्यपूर्ण विषयांवरचे संशोधनपर, संयत, कृतज्ञ व आस्वादक लिखाण हे या पुस्तकाचे लक्षणीय वैशिष्ट्य आहे. गतकाळात डोकावून पाहण्यासाठी लागणारा झरोका, म्हणून या पुस्तकाची नक्कीच उपयुक्तता आहे. पुस्तकाचे नाव - विविधा
लेखक - पुष्पा लिमये
प्रकाशक - पुष्पा मोरेश्वर लिमये
संपादक - आनंद हर्डीकर
मूल्य - ₹ 300/-
पृष्ठसंख्या - 224 (लेखक कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- ठाणे: हत्येनंतर उद्धव ठाकरेंचा ठाणे दौरा; प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन
- मुंबई: आगामी ४ ऑक्टोबरच्या मोर्चात पक्षाचा झेंडा बाजूला ठेवून सर्व कार्यकर्ते सहभागी होणार; राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांची घोषणा
महाराष्ट्र
- पुणे: गजबजलेल्या रस्त्यावर थरार; नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलणाऱ्या तरुणाचे प्राण अग्निशमन जवानांनी वेळीच वाचवले
- मुंबई: शिंदेसेनेत अंतर्गत बंडाळी उफाळली! अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी श्रीकांत देशपांडे यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
- मुंबई: पर्यावरणपूरक गणेशोत्सव गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी समुद्रात न टाकता निर्माल्य थेट प्रतिष्ठानकडे केले सुपूर्द
- सातारा: दुष्काळाची भीषण परिस्थिती; माण आणि खटाव परिसरात नद्या-विहिरी कोरड्या, पिके वाळून गेल्याने शेतकरी संकटात
गुन्हा
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

म्हसावद पोलिसांची धडक कारवाई; ₹१०.३७ लाखांचा अवैध दारूसाठा व वाहन जप्त!
कुख्यात ड्रग्ज तस्कर सनी पगारेचा जेलमधील VIDEO व्हायरल; सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!
सिंहगड कॉलेजमध्ये NSUIचा अचानक पाहणी दौरा; ‘हजेरी लावून कर्मचारी गायब’चा आरोप!
देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप



























Subscribe to my channel




