अमरावती: बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी अॅड रिसर्च, बडनेरा येथील पायऱ्यांवरच मंगळवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास एका तरुणाने १९ वर्षीय वर्गमैत्रिणीच्या गळ्यावर चाकूने निर्दयीपणे जीवघेणे वार केले. गंभीर जखमी तरुणीचे नाव प्राप्ती आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आरोपी नवीन मेघराज वानवाणी (१९, रा. सिंधी कॅम्प, बडनेरा) याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. त्याला अटक करण्यात आली आहे.
सूत्रांनुसार, प्राप्ती व नवीन हे एकाच महाविद्यालयात शिकतात. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास प्रॅक्टिकल संपवून प्राप्ती ही क्लासच्या बाहेर येत असताना नवीनने तिला महाविद्यालयाच्या पायऱ्यांवरच मागोमाग गाठले.
भावाने दिली फिर्याद
याप्रकरणी प्राप्तीच्या भावाने बडनेरा पोलिसांत तक्रार नोंदविली. त्या तक्रारीनुसार, नवीनने प्राप्तीला प्रॅक्टिकल लिहून मागितले होते. त्यावर तिने नकार दिल्याने त्याने तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे म्हटले आहे.
ती जोराने ओरडली...
बॅगमध्ये आणलेल्या चाकूने त्याने तिच्या मानेवर दोन वार केले. ती जिवाच्या आकांताने ओरडल्याने पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला चौकीदार व विद्यार्थ्यांनी पकडले. सद्या तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
विद्यार्थ्यांनी दाखवले धाडस; आरोपी पोलिसांच्या ताब्यात
कॉलेजच्या वर्गाबाहेर आणि लॉबीमध्ये घडलेल्या या भीषण प्रकाराकडे सुरुवातीला काही क्षण कोणाला काय करावे सुचले नाही. परंतु, महाविद्यालयीन इतर विद्यार्थ्यांनी आणि सुरक्षा रक्षकांनी कमालीचे धाडस दाखवत तातडीने धाव घेतली. जिवाच्या आकांताने ओरडणाऱ्या तरुणीला वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आरोपी तरुणाला घटनास्थळावरच कॉलर पकडून रंगेहात पकडले. संतप्त विद्यार्थी व नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला पोलिसांच्या हवाले करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि मोबाईल फॉरेन्सिक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेला चाकू जप्त केला असून आरोपी नवीन वनवाणी याला ताब्यात घेण्यात आले आहे. दुसरीकडे, गंभीर जखमी झालेल्या १९ वर्षीय विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी अमरावती येथील खासगी रुग्णालयातील (RIMS Hospital) अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून तिच्यावर अपोश उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत गंभीर स्वरूपात समोर आला आहे.
शहर
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
महाराष्ट्र
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
- मुंबई: ओबीसी समाजाच्या विकासासाठी मोठा निर्णय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी शासकीय जागा मिळणार केवळ १ रुपयात!
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
























Subscribe to my channel




