पूर्वी असा एक समज होता की, हृदयरोग फक्त वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरच होतो. पण आता ही विचारसरणी वास्तवापासून खूप दूर जात आहे. खरी परिस्थिती अशी आहे की, हृदयरोग आता वयाच्या तिसाव्या किंवा चाळिसाव्या वर्षांतच लोकांना गाठत आहे. माणूस आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात सर्वात जास्त सक्रिय असतो, असा हा काळ असतो. माझ्याकडे येणाऱ्या तरुण रुग्णांची संख्या वाढतेय, ही तर चिंतेची बाब आहेच. पण त्याहून मोठी चिंता म्हणजे या आजाराच्या कारणांकडे दीर्घकाळ होणारे दुर्लक्ष! उच्च रक्तदाब, मधुमेह, कोलेस्टेरॉलची बिघडलेली पातळी आणि लठ्ठपणा हे घटक वर्षानुवर्षे हृदयरोगाचा धोका वाढवत असतात. पण यांची कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसत नाहीत. एखादी गंभीर समस्या समोर येते, तेव्हा बचावाची वेळ निघून गेलेली असते. भारतीयांची बदलती जीवनशैली हादेखील या समस्येचा एक मोठा भाग आहे. तासन्तास एकाच जागी बसून राहणे, व्यायामाचा अभाव, अपुरी किंवा अनियमित झोप, प्रक्रिया केलेले अन्न खाणे आणि तंबाखूचे सेवन... या सर्व गोष्टी मिळून मोठा धोका निर्माण करत आहेत. तरुण वर्ग याकडे अजिबात दुर्लक्ष करू शकत नाही. आजच्या धकाधकीच्या आयुष्यात ताणतणाव ही वस्तुस्थिती बनली आहे. त्यातही नोकरदार तरुणांसाठी हा ताण अधिक आहे. त्यामुळे आरोग्याचा विचार करताना या मुद्द्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. आजार प्रतिबंधक यंत्रणा आता आपल्या रोजच्या जीवनाचा भाग बनली पाहिजे. तरुण वयात रक्तदाब, शुगर किंवा कोलेस्टेरॉल तपासण्यासाठी लक्षणांची वाट पाहू नये. ज्यांच्या कुटुंबात आधीपासूनच हृदयरोगाचा इतिहास असलेल्यांची ओळख वेळेतच झाली पाहिजे. त्यांना योग्य तो सल्लाही मिळाला पाहिजे. कामाच्या ठिकाणी आरोग्याकडे कसे पाहिले जाते, या विचारातही आपल्याला बदल करावा लागेल. खूप वेळ काम करणे, सतत बसून राहणे आणि पुरेशी झोप न घेणे... या गोष्टी रोजच्या सवयी बनतात, तेव्हा त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतोच. कामाच्या मधोमध थोडे चालणे, कर्मचाऱ्यांसाठी नियमित आरोग्य तपासणी ठेवणे आणि आरोग्याला पूरक वातावरण निर्माण करणे, यासाठी कंपन्या पुढाकार घेऊ शकतात. लोकांनी हृदयरोगाच्या लक्षणांबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. छातीत अस्वस्थता होणे, हुरहूर वाटणे, अचानक धाप लागणे, विनाकारण खूप घाम येणे, मळमळणे, चक्कर येणे किंवा हात, खांदे, पाठ आणि नव्ह्यासह जबड्यापर्यंत वेदना पसरणे... ही लक्षणे कधीही किरकोळ मानून दुर्लक्ष करू नका. हृदयविकाराचा झटका आल्यास त्वरित वैद्यकीय मदत मिळणे हे जीवन वाचवणारे ठरते. प्रतिबंधात्मक वैद्यकीय शास्त्रामध्ये आता खूप प्रगती झाली आहे. त्यामुळे लक्षणे दिसण्यापूर्वीच हृदयरोगाचा धोका ओळखणे शक्य झाले आहे. यामुळे आजार गंभीर रूप धारण करण्याआधीच डॉक्टरांना योग्य ते उपचार सुरू करण्याची संधी मिळते. हृदयाच्या आरोग्यासाठी आमचे पुढचे मोठे पाऊल हे आजार टाळणे हेच असले पाहिजे. आपण धोके आधीच ओळखले पाहिजेत. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच नियमित आरोग्य तपासणी ही प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनवली पाहिजे. कुटुंबांनी, शाळांनी, कंपन्यांनी आणि आरोग्य यंत्रणेने एक गोष्ट समजून घेतली पाहिजे : हृदयाचे आरोग्य हे लक्षणे दिसण्याच्या खूप आधीपासूनच बिघडायला सुरुवात झालेली असते. एखाद्या गंभीर संकटाचा सामना करावा लागल्यावरच तरुण भारताला हृदयरोग समजणार का? आपण वेळेवर पावले उचलली, तर आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी तो आजार होण्यापासूनच रोखू शकतो. म्हणूनच प्रश्न हा नाही की तरुण भारतीयांना हृदयरोगाचा धोका आहे की नाही. प्रश्न हा आहे की, आपण या धोक्याला वेळेत ओळखून त्यावर उपाय करायला तयार आहोत का?
(हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे) आज प्रश्न हा नाही की तरुण भारतीयांना हृदयरोगाचा धोका आहे की नाही. तो तर उघडच आहे. पण खरी गोष्ट ही आहे की, आपण या धोक्याला वेळेवर ओळखण्यास तयार आहोत का? जेणेकरून त्यावर काहीतरी उपाय करता येईल.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
महाराष्ट्र
- पुणे: १५ ऑक्टोबरपूर्वी किंवा त्यापूर्वीही सुरू करता येणार ऊस गाळप हंगाम; साखर आयुक्त कार्यालयाचा मोठा निर्णय
- मुंबई: दिंडोशीत माकडांचा उच्छाद! १९ व्या मजल्यवर पोहोचले माकड, वृंदावन सोसायटीचे रहिवासी त्रस्त; वनविभागाकडे कारवाईची मागणी
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

रस्ता रुंदीकरणावरून शाही मशिदीवर कारवाई; विरोधात मोठी गर्दी, प्रशासनावर दगडफेकीचा दावा
‘Golden GUYS’ सनी वाकचौरेच्या Mercedesवर पोलिसांची कारवाई! 🚔🚘⚠️
पावसाअभावी सोयाबीन पूर्णपणे वाळलं; शेतकऱ्याने ३ एकर पिकावर फिरवला ट्रॅक्टर!
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
























Subscribe to my channel



