पुणे: बारामती तालुक्यातील बाबुर्डी परिसरातील शेरेचीवाडी येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दोन वयोवृद्ध महिलांच्या खळबळजनक दुहेरी हत्याकांडाचा (Double Murder) पुणे ग्रामीण पोलिसांनी आणि सुपे पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. सुरुवातीला हा प्रकार चोरीच्या उद्देशाने बाहेरील अनोळखी व्यक्तीने केला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. मात्र, सखोल तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या विविध पथकांच्या कसून चौकशीनंतर या भीषण हत्याकांडामागे दुसरातिसरा कोणी नव्हे, तर मृत महिलांचा स्वतःचाच चुलत नातू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
विकास राजेंद्र लडकत (वय २६, रा. शेरेचीवाडी, ता. बारामती) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चुलत नातवाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला शिताफीने ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
नेमकी घटना आणि पार्श्वभूमी: शेरेचीवाडी येथे २९ सप्टेंबर रोजी इंदूमती लडकत (वय ७५) आणि कृष्णाबाई लडकत (वय ५५) या चुलत सासू-सुनांची त्यांच्याच घरात मध्यरात्री झोपेत असताना अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. दोघींच्याही डोक्यावर व शरीरावर कुऱ्हाडीने वार करण्यात आले होते. या घटनेमुळे संपूर्ण बारामती तालुका आणि पुणे जिल्ह्यात मोठी दहशत व खळबळ उडाली होती. घरातून सोन्याचे दागिने व ऐवज चोरीला गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे हा खून दरोड्याच्या किंवा चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असे प्रथमदर्शनी वाटत होते.
कर्जबाजारपणा आणि ओळख लपवण्यासाठी खून: तपासादरम्यान पोलिसांनी कसून चौकशी केली असता, संशयित विकास लडकत हा मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला होता. पैशांच्या तीव्र गरजेमुळे त्याने चोरीचा कट रचला होता. चोरी करण्याच्या उद्देशाने तो रात्री घरात घुसला, मात्र दोन्ही महिला गाढ झोपेतून जागी झाल्या आणि त्यांनी त्याला ओळखले. आपली ओळख पटल्यामुळे आणि बिंग फुटण्याच्या भितीने नराधम नात्याने क्षणाचाही विचार न करता घरात ठेवलेल्या कुऱ्हाडीने दोन्ही वृद्ध महिलांवर सपासप वार करत त्यांना जागीच संपवले. यानंतर सोन्याचे दागिने घेऊन तो पसार झाला होता.
गुन्हा केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपीने हत्या करण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड आणि रक्ताचे डाग असलेले कपडे जवळील विहिरीत फेकून दिले होते. मात्र, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि सुपे पोलिसांच्या १० हून अधिक अधिकारी व ५५ हून अधिक कर्मचाऱ्यांच्या पथकाने दिवस-रात्र मेहनत घेऊन तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या प्रकरणाचा छडा लावला. पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिनेही हस्तगत केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक सखोल तपास करत आहेत.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार


























Subscribe to my channel




