नुकतीच मध्य प्रदेशातील गुणा येथे एका नागरिकाने केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे एका रखडलेल्या रस्त्याबाबत तक्रार केली. त्याचा थेट संदेश होता: रस्ता बनवा, नाहीतर आम्ही तुम्हाला मत देणार नाही. मागणी मांडण्याच्या या पद्धतीवर शिंदे यांनी आक्षेप घेतला आणि नागरिकाला धमकावण्याऐवजी विनंती करायला सांगितले. पण या घटनेनंतर रस्त्यासाठी सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. आवश्यक प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देशही देण्यात आले. शिंदे हे गेल्या अनेक वर्षांपासून माझे मित्र आहेत. ते एक सज्जन व्यक्ती आणि सक्षम मंत्री आहेत. त्यामुळे ही घटना त्यांच्याबद्दल नसून, यातून मिळणाऱ्या धड्याबद्दल आहे. नागरिकाच्या धमकीमुळेच रस्त्याचे काम मंजूर झाले असा सोपा निष्कर्ष आपण काढू नये. वास्तविक पाहता बातम्यांनुसार त्याचा डीपीआर आधीच तयार झाला होता. शिंदे यांच्या हेतूवर शंका घेण्याचे कोणतेही कारण नाही. पण ही घटना लोकशाहीतील एक मूलभूत गोष्ट समोर आणते : मतदार हा याचक नसतो आणि रस्त्यांसारख्या सुविधा देऊन नेते नागरिकांवर उपकार करत नसतात. रस्त्यांचे बांधकाम सार्वजनिक पैशांतून केले जाते. त्याचा स्रोत नागरिकच आहेत. निवडून आलेला प्रतिनिधी हा जनतेचा पैसा आणि जनहित यांमधील केवळ माध्यम आहे. त्यामुळे हे नाते दयेचे नसून जबाबदारीचे असले पाहिजे. पण काळाच्या ओघात आपण नकळत एक राजकीय संस्कृती तयार केली आहे. त्यात नागरिक अनेकदा याचकाच्या भूमिकेत लोकप्रतिनिधीकडे जातो. निवडणुकीच्या वेळी नेतेही नागरिकांसमोर याच शैलीत येतात. अशा वेळी प्रश्न पडतो की, मतदारांनी ‘काम नाही, तर मत नाही’ हे तत्त्व स्वीकारले तर काय होईल? रागाच्या घोषणांच्या रूपात नाही किंवा धमकी म्हणूनही नाही, तर उत्तरदायित्व ठरवण्याचे हे एक घटनात्मक आणि लोकशाही माध्यम असावे. संशोधन दर्शवते की भारतीय मतदारांनी नेहमी अशा प्रकारे व्यवहार केलेला नाही. ‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजने’अंतर्गत बनवलेल्या सुमारे 1.8 लाख ग्रामीण रस्त्यांचा अभ्यास करणाऱ्या एका मोठ्या संशोधनात असे आढळून आले की, रस्ते बांधल्याने सत्ताधारी पक्षाला अधिक निवडणूक पाठिंबा मिळाला नाही. रस्ते या अत्यंत महत्त्वाच्या आणि स्पष्ट दिसणाऱ्या सार्वजनिक सुविधा आहेत. तरीही त्या उपलब्ध करून दिल्याने निवडणुकीत विजयाची ती हमी मिळाली नाही. त्याची अपेक्षा लोकशाही सिद्धांताच्या आधारे केली जाऊ शकते. असे का आहे? याचे उत्तर फक्त एवढेच असू शकत नाही की भारतातील लोक सहज लोकांच्या सांगण्यावरून वाहवत जातात. असे म्हणणे त्यांचा अपमान करणारे तर आहेच, शिवाय चुकीचेही ठरेल. भारतीय मतदार गुंतागुंतीचे राजकीय हिशेब करण्यास पूर्णपणे सक्षम आहेत. ते अनेकदा सत्ता बदलून सरकारला धडा शिकवतात. अडचण अशी आहे की राजकारणात काम किंवा कामगिरी हा फक्त एक निकष आहे. त्यावर मतदार निर्णय घेतात. ओळख हा दुसरा निकष आहे. जात महत्त्वाची असते. धर्म महत्त्वाचा असतो. समाजाबद्दल निष्ठा महत्त्वाची असते. राष्ट्रीय नेतृत्व महत्त्वाचे असते. कल्याणकारी योजनांचा लाभ महत्त्वाचा असतो. राजकीय कथानक महत्त्वाचे असते. भावनिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. आणि निवडणूक ओळख आणि कथानक यांच्यातील स्पर्धा बनते, तेव्हा घराबाहेरचा खड्ड्यांचा रस्ता मतपेटीतून अचानक गायब होऊ शकतो. हाच भारतीय मतदाराचा मोठा विरोधाभास आहे. एक नागरिक म्हणून आपण खूप तक्रारी करतो, पण मतदार म्हणून अनेकदा वेगळ्या प्रकारे मतदान करतो. आपण रस्त्यावरील खड्ड्यांना नाव ठेवू शकतो. पण निवडणुकीत अगदी वेगळ्या मुद्द्यावर मतदान करू शकतो. प्रदूषण, भ्रष्टाचार किंवा नागरी सुविधांच्या दुर्दशेवर तासन्तास चर्चा करू शकतो आणि नंतर निवडणुकीतील चर्चा दैनंदिन आयुष्याशी काहीही संबंध नसलेल्या मुद्द्यांवर केंद्रित होऊ देतो. कदाचित राजकीय नेत्यांनीही हे ओळखले आहे. यावर उपाय एकच आहे की, नागरिकांनी संघटित व्हावे. जेणेकरून ते मताच्या शक्तीचा प्रभावी वापर करू शकतील. ‘काम नाही, तर मत नाही’ याचा अर्थ नागरिकांनी विरोधी पक्षाशी निष्ठा ठेवावी नाही. प्रत्येक पक्षाने आणि लोकप्रतिनिधीने हे समजून घेतले पाहिजे की मतदाराला काम आणि जबाबदारी हवी आहे. त्यानुसारच तो आपले मत वापरेल. भारतीय लोकशाहीत हाच बदल अजून घडायचा आहे. (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे.) भावनिक मुद्दे महत्त्वाचे ठरतात. निवडणूक ही ओळख आणि नरेटिव्ह यांच्यातील स्पर्धा बनते, तेव्हा घराबाहेरचा वाईट रस्ता मतपेटीतून अचानक गायब होतो. हाच भारतीय मतदाराचा मोठा विरोधाभास आहे.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
- नागपूर: "देशातील संविधान संपवून कम्युनिस्ट विचारसरणी लादण्याचा काँग्रेसचा डाव" राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर सत्ताधारी नेत्यांचा अत्यंत गंभीर व आक्रमक हल्लाबोल!
महाराष्ट्र
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीचा वृद्धाश्रमातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण; मित्राने दिली प्रकृती स्थिर असल्याची माहिती
- सातारा: कृष्णा-कोयना काठच्या पिकांवर मोठे संकट; प्रशासनाकडून पीक पाहणीचा सविस्तर अहवाल सादर
- मुंबई: ज्ञानेश कुमारांनी कोणत्याही दबावाखाली येऊन राजीनामा देऊ नये: केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा विरोधकांना सणसणीत टोला व पूर्ण पाठिंबा
गुन्हा
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
- मुंबई: अवघ्या २४ तासांत संपत्ती आणि पाण्याच्या वादातून खुनाचे दोन भीषण प्रयत्न; पोलीस प्रशासनात खळबळ
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- तमिळनाडू: थलापती विजय सरकारची धमाकेदार योजना; बाळ जन्माला येताच सरकारी रुग्णालयात मिळणार १ ग्रॅम सोन्याची अंगठी!
- दिल्ली: जातनिहाय जनगणनेत स्वतंत्र OBC कॉलमसाठी काँग्रेसचा मोठा एल्गार; १ नोव्हेंबर रोजी 'चलो दिल्ली' आंदोलनाची घोषणा!
- मध्य प्रदेश: मतदान न करण्याच्या' इशाऱ्यामुळे संतापले केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया; गुना येथे ३ कोटींच्या रस्ता प्रकल्पाची त्वरित घोषणा!
























Subscribe to my channel



