एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेला तिचा पती दुसऱ्या मुलीबरोबर नको त्या अवस्थेत पाहिले. त्यानंतर महिलेने जे काही केले त्याची संपूर्ण राज्याच चर्चा सुरु आहे. महिलेने सर्वात आधी तिच्या आईला फोन केला. तिला बोलावून घेतले. त्यानंतर घराबाहेर गोंधळ घालायला सुरुवात केली. आजूबाजूचे लोक नेमकं काय झालं हे पाहण्यासाठी जमा झाले होते. पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना पंजाबच्या जालंधर शहरातील बस्ती गुजां परिसरात घडली आहे. येथे एका महिलेने तिचा पती आणि एका मुलीला नको त्या अवस्थेत खोलीत पाहिले. त्यानंतर महिलेने लगेच त्या खोलीला टाळा लावून घेतला. नंतर तिने बस्ती बाबा खेल पोलीस ठाण्याला माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि टाळा उघडून दोघांना बाहेर काढले. या घटनेनंतर परिसरात बराच वेळ गोंधळ सुरु होता. पोलिस सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत असून दोन्ही पक्षांची चौकशी सुरू आहे.
पतीने पत्नीला मारहाण करून घराबाहेर काढले
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न दशमेश नगर येथे झाले आहे. गेल्या तीन वर्षांपासून तिचा पती तिच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. दोन दिवसांपूर्वी पतीने तिला मारहाण केली आणि घराबाहेर काढून टाकले. त्यानंतर ती आपल्या माहेरी गेली होती. गुरुवारी ती अचानक आपल्या अडीच वर्षांच्या मुलाचे कपडे घेण्यासाठी घरी परतली, तेव्हा तिने पतीला दुसऱ्या मुलीबरोबर अश्लील अवस्थेत पाहिले. तिने लगेच दोघांना खोलीत बंद केले आणि मोठा गोंधळ घातला.
कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी दोघांना मारहाण केली
पीडित कुटुंबाचा आरोप आहे की, दोषीचे वडील एक बीजेपी नेते आहेत, त्यामुळे पोलिस कारवाई करताना विचार करत आहेत. पोलिस जवळपास एक तास उशिरा पोहोचले आणि दोघांना बाहेर काढले. त्यानंतर रागाच्या भरात आलेल्या कुटुंबीयांनी आणि शेजाऱ्यांनी पती व त्या मुलीला मारहाण केली. सध्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान महिलेच्या आईने सांगितले, “आम्हाला याबाबत काहीच माहिती नव्हती. आमच्या जावयाने आणि त्या मुलीमध्ये काय चालले आहे हे आम्हाला माहिती नव्हते. परवा मला माझ्या मुलीचा फोन आला की तिच्या पतीने तिला मारहाण केली आणि घराबाहेर काढले. जावयाने तिचा फोनही घेऊन टाकला होता. आज मी हे पाहिले. तिने फोन केल्यावर मी इथे आले.”
शहर
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- तुम्हाला खरंच गांभीर्य कळतंय का?; शिवम दुबेच्या आधी हर्षित राणाला फलंदाजीला पाठवल्याने दिनेश कार्तिक टीम इंडियावर भडकला
- "शेअर बाजारात हाहाकार: ट्रम्प यांच्या विधानानंतर सेन्सेक्समध्ये १,६७७ अंकांची घसरण; गुंतवणूकदारांचे ८ लाख कोटी पाण्यात"
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
महाराष्ट्र
- पुण्याला मोठा दिलासा! खडकवासला धरण साखळीतील पाणीसाठा ४२ टक्क्यांवर; एका दिवसात ४ टीएमसी पाण्याची आवक!
- पावसात रायगड किल्ल्यावर जाताय? अतिवृष्टीमुळे पायरी मार्ग दोन दिवस बंद; महाड प्रांताधिकाऱ्यांचे आदेश
- कोल्हापूरकरांनो सतर्क राहा! पंचगंगा नदी इशारा पातळीकडे; जिल्ह्यातील ६० बंधारे पाण्याखाली, पावसाचा जोर कायम
- मुंबई: नांदेड–मुंबईदरम्यान दोन अतिरिक्त साप्ताहिक विशेष रेल्वेगाड्या सुरू
गुन्हा
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- पश्चिम बंगाल: बारुईपूर १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाचा एन्काऊंटरमध्ये खात्मा.
- झारखंड हादरले! अनैतिक संबंधांतून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा केला भीषण खून; आरोपींना बेड्या
- तामिळनाडूमध्ये माणुसकीला काळीमा! कामावर निघालेल्या ५० वर्षीय महिलेला पार्कमध्ये ओढत नेऊन अत्याचार
राजकीय
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
इतर
- आर्थिक राशिभविष्य ८ जुलै २०२६: 'सम योगा'मुळे कोणाचे नशीब उजळणार? जाणून घ्या आजचे विशेष शुभ संकेत!
- 'लाडकी बहीण' योजनेच्या लाभाची रक्कम २१०० रुपये होणार का? केंद्राच्या अहवालामुळे पुन्हा चर्चेला उधाण!
- पावसाळी आरोग्य इशारा: कॅन्सर रुग्ण आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींनी राहावे सावधान!
- व्हॉट्सॲपवरूनच बनवा आयुष्मान कार्ड; केंद्र सरकारचा ‘आयुष्मान सारथी’ चॅटबॉट लाँच!
मनोरंजन
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
- 'वेलकम टू द जंगल' मधून संजय दत्त बाहेर का पडला? अखेर दिग्दर्शक अहमद खान यांनी सांगितंलं खरं कारण!
- मुंबई: 'हेरा फेरी 3' बंद? कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या चित्रपटातून प्रियदर्शन बाहेर, म्हणाले - "हा चित्रपट कधीच रिलीज होणार नाही!"
देश विदेश
- उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टरला महाराष्ट्रात मोठा झटका; उमरग्यातील दाल मिलसह १०० कोटींची मालमत्ता जप्त!
- देश-विदेश: पंतप्रधान नरेंद्र मोदी देणार इंडोनेशियातील प्रंबनम मंदिराला भेट!!
- "उत्तर प्रदेशात भीषण अपघात: पंक्चर काढताना अज्ञात वाहनाची धडक; ४ तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू"
- मोठी बातमी! पीएफ काढण्याचे नियम बदलले; आता पैसे काढताना 'हे' नियम पाळावे लागणार!



























Subscribe to my channel


