कोल्हापूर: मोबाईलमधील 'फोन पे' व्यवहार आणि कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेजचा धागा पकडत पन्हाळा पोलिसांनी महाडिकवाडी (ता. पन्हाळा) येथील पाच लाखांच्या जबरी चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावला. चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरण्यात आलेले कापड आणि संशयिताने काही दिवसांपूर्वी कापड दुकानातून खरेदी केलेले कापड यातील साम्य तपासाचा महत्त्वाचा पुरावा ठरले. या प्रकरणी नंदकिशोर सदानंद महाडिक (वय ३९) आणि रमेश सदाशिव महाडिक (वय २८, दोघे रा. महाडिकवाडी, ता. पन्हाळा) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून चोरीस गेलेला पाच तोळे सोन्याचा संपूर्ण ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
महाडिकवाडी येथील सरदार ऊर्फ बापू महाडिक यांच्या घरी १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास दोन अज्ञात व्यक्तींनी प्रवेश केला होता. घरातील ८० वर्षीय वृद्ध महिलेचे तोंड व हात पांढऱ्या कापडी पट्ट्यांनी बांधून आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याच्या पाटल्या, मंगळसूत्र, कुड्या व बुगडी असा सुमारे पाच लाख रुपये किमतीचा ऐवज जबरदस्तीने काढून नेला. या प्रकारात वृद्ध महिला जखमी झाली होती. याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील तसेच आजूबाजूच्या गावांमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक विश्लेषणाद्वारे संशयितांच्या हालचालींचा माग घेण्यात आला. मात्र गुन्ह्याच्या वेळी कोणतीही संशयित गाडी किंवा बाहेरील व्यक्ती परिसरात आल्याचे स्पष्ट होत नसल्याने पोलिसांचा संशय स्थानिक व्यक्तींकडे वळला.
तपासादरम्यान मिळालेल्या स्थानिक माहितीच्या आधारे नंदकिशोर महाडिक याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. सुरुवातीला त्याने गुन्ह्यातील सहभाग नाकारला. मात्र पोलिसांनी त्याच्या मोबाईलमधील व्यवहारांची बारकाईने तपासणी केली. त्यावेळी ७ सप्टेंबर रोजी एका कापड दुकानात 'फोन पे'द्वारे पैसे अदा केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
यानंतर पोलिसांनी संबंधित कापड दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. नंदकिशोरने दुकानातून घेतलेले कापड आणि चोरीच्या ठिकाणी वृद्ध महिलेचे हात व तोंड बांधण्यासाठी वापरलेले कापड यामध्ये साम्य असल्याचे तपासात आढळले. हा महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला. उपलब्ध पुरावे समोर ठेवल्यानंतर नंदकिशोर याने रमेश महाडिक याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर पोलिसांनी रमेश महाडिक यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरीस गेलेले पाच तोळे वजनाचे सुमारे पाच लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले, गन्ह्याचा पढील तपास श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सुरेश खोत करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक लिंगाप्पा चौखंडे यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. श्रेणी पोलिस उपनिरीक्षक सलीम सनदी, सुरेश खोत, समीर मुल्ला, तौसिफ मुल्ला, शंकर पाटील, सचिन पाटील, प्रकाश पाटील, रविंद्र कांबळे, गणेश पाटील, दिगंबर चिले, सागर रोहिले व अमर चव्हाण यांच्या पथकाने तपासात सहभाग घेतला.
शहर
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- मुंबई: कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते...राज ठाकरेंच्या एकाच वाक्यातील सूचक आणि रहस्यमय पोस्टमुळे राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ!
- छत्रपती संभाजीनगर: गणरायाच्या स्वागतावेळी मृत्यूने साधला डाव; कंटेनर थेट मिरवणुकीच्या गर्दीत घुसल्याने २ ठार, पाच वर्षांच्या बालकासह १२ जण जखमी!
- मुंबई: आंदोलनाचा फेरविचार करा; मुख्यमंत्र्यांचे जरांगेंना आवाहन; एकटाच मुंबईला जाणार, मनोज जरांगे भूमिकेवर ठाम!
महाराष्ट्र
- शिर्डी: श्रद्धेच्या नावाखाली मोठी फसवणूक! पूजेच्या साहित्यात सापडले चक्क प्लास्टिकचे बदाम; नगरपरिषदेची तातडीने धडक कारवाई!
- पुणे: सुरक्षेचा मोठा प्रश्न! केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अधिकृत ताफ्याला दुचाकीस्वाराने मारला 'कट'; ३२ वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल!
- पुणे: "ओम नमस्ते गणपतये...!" पुण्यात स्त्रीशक्तीचा अभूतपूर्व जागर; श्रीमंत दगडूशेठ बाप्पासमोर तब्बल ३५ हजार महिलांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण!
- जालना: मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना होताच कुटुंबाचा संताप अनावर; पत्नी आणि मुलींनी सरकारला सुनावले खडे बोल, दिला कडक इशारा
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!
- लंडन: ब्रिटनच्या संसदेत एकनाथ शिंदेंचा डंका! अस्खलित इंग्रजीत भाषण करत लंडनमध्येही गाजवली 'लाडकी बहीण' योजना
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही



























Subscribe to my channel




