एन. रघुरामन यांचा कॉलम:भगवान गणेश एक युनिव्हर्सल व लाइफलाँग टीचर आहेत

भगवान विष्णूंप्रमाणेच भगवान गणेशाचेही अनेक अवतार आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? ‘मुद्गल’ पुराणात त्यांच्या अशा अनेक भव्य अवतारांचे वर्णन आहे. यातील प्रत्येक अवतार आपल्याला माणसातील विशिष्ट वाईट प्रवृत्तींपासून - अहंकार आणि माणसाला जखडून ठेवणारा मोह यांसारख्या गोष्टींपासून मुक्त करतो. आध्यात्म्याशी संबंधित ‘इंडियात्रा’ हे पोर्टल चालवणाऱ्या माझ्या एका मित्राकडून मला एक क्विझ मिळाली. यामध्ये मला भगवान गणेशाच्या बुद्धिमत्तेशी संबंधित अशा काही न ऐकलेल्या रंजक कथा मिळाल्या, ज्या आजही प्रासंगिक आहेत. काही अवतारांच्या कथा खालीलप्रमाणे आहेत. वक्रतुंड : आपण सर्वजण ‘वक्रतुंड महाकाय’ म्हणतो. हा अवतार वळलेल्या सोंडेसाठी प्रख्यात आहे. त्यांचे वाहन सिंह आहे. वक्रतुंडाची सोंड बुद्धिमत्ता, लवचिकता आणि ताकदीचे प्रतीक आहे. त्याच्या आकारात आदिम ध्वनी ‘ओम’चे प्रतिबिंब दिसते, ज्याला उपनिषदांत सर्वोच्च आध्यात्मिक ज्ञान म्हटलेय. जेव्हा मत्सरासुराला रोखणे अशक्य झाले तेव्हा दत्तात्रेयांनी ‘ओम’ची शक्ती सांगितली आणि देवांना वक्रतुंडाची मदत घेण्यास सांगितले. या अवतारामध्ये गणेशजींनी मत्सरासुराचा पराभव केला, जो ईर्षा, द्वेष आणि स्वार्थाचे प्रतीक आहे. एकदंत : तत्त्वज्ञान शिकवण्यासाठी पुराणांत कथांचा वापर केला जातो. एकदंतमध्ये ‘एक’ मायेचे प्रतिनिधित्व करतो आणि ‘दंत’चा अर्थ सत्य आहे, जो अहंकारावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे. जेव्हा मदासुर राक्षस अजिंक्य झाला तेव्हा ऋषी सनत्कुमारांनी देवांना एकदंताचे आवाहन करण्याचा सल्ला दिला. गणेशजींना पाहताच मदासुराने लगेच आत्मसमर्पण केले. महोदर : म्हणजेच मोठ्या पोटाचे गणेशजी. जेव्हा विकारांचा राजा मोहासुराने हाहाकार माजवला तेव्हा सूर्यदेवाने देवांना गणेशजींचे आवाहन करण्याचा सल्ला दिला. महोदर रूपात प्रकट गणेशजी फक्त त्या राक्षसाकडे गेले आणि त्याने लगेच आत्मसमर्पण केले. आठवून पाहा, जेव्हा तुम्ही एखाद्याला एखादे रहस्य (सिक्रेट) सांगता तेव्हा लोक म्हणतात की त्याचे पोट मोठे आहे. खरे तर हे वाक्य गणेशजींच्या मोठ्या पोटावरून आले आहे, जे चांगले-वाईट अनुभव समानतेने पचवण्याच्या क्षमतेचे प्रतीक आहे. गणेशजींच्या पूजेतून आपण हेच आंतरिक संतुलन मिळवण्याचा प्रयत्न करतो. गजानन : ही कथा ‘लोभासुरा’ची आहे, ज्याने तिन्ही लोकांवर ताबा मिळवला होता. ऋषी रैभ्य यांच्या सल्ल्यानुसार देवांनी गजाननाचे आवाहन केले, ज्यांच्या केवळ उपस्थितीने राक्षसांत अपराधीपणाची भावना निर्माण झाली आणि त्यांनी लगेच समर्पण केले. आत्मज्ञान वासनेवर कसा विजय मिळवते हे या कथेतून समजते. गजाननाचे हत्तीसारखे डोके धैर्य, सतर्कता आणि शक्तीचे प्रतीक आहे, जे या प्रवासासाठी आवश्यक असतात. लंबोदर : असे मानले जाते की, या अवतारामध्ये भगवान गणेशाने क्रोधासुराचा वध केला होता. अमृतासाठी समुद्रमंथन झाल्यानंतर क्रोधासुराचा जन्म झाला होता, ज्याने ब्रह्मांडाची शांतता भंग केली होती. गणेशजींच्या लंबोदर अवताराने ही शांतता पुन्हा प्रस्थापित केली. विकट : एक कथा कामासुर राक्षसाची आहे, ज्याने संपूर्ण ब्रह्मांडात हाहाकार माजवला होता. गणेशजींनी विकट रूपात अवतार घेतला आणि मोरावर स्वार होऊन राक्षसावर नियंत्रण मिळवले. मोराला रुबाब करायला आवडते आणि तो अहंकाराचा पर्याय आहे. अहंकारावर मात करून एखादी व्यक्ती आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवू शकते, ही या कथेची शिकवण आहे. विघ्नराज : ही कथा ममासुराची आहे, जो तोपर्यंत धार्मिक होता, जोपर्यंत शम्बरासुराने त्याला वाईट आणि अतिरेकी जगात ओढले नव्हते. देव त्याच्यामुळे भयभीत झाले होते आणि विघ्नराजाने ममासुरावर नियंत्रण मिळवले. आपण विकृत आकर्षणाच्या जाळ्यात सहज अडकू शकतो आणि तो आपल्या जीवनातील मोठा अडथळा बनू शकतो, हा एक मोठा धडा यातून मिळतो. विघ्नराजाची पूजा तो अडथळा दूर करण्यास मदत करते. }धूम्रवर्ण : अभिमानासुर किंवा अहंकारासुराला गणेशजींनी धूम्रवर्ण अवतारामध्ये पराभूत केले. अहंकारासुराच्या जन्माची एक मोठी कथा आहे. असे मानले जाते की, एका वेळी भगवान सूर्याला खूप अहंकार झाला तेव्हा त्यांच्या शिंकेतून अहंकारासुराचा जन्म झाला. धूम्रवर्णाचा अर्थ धुरासारखा रंग असा होतो. हा अवतार शिकवतो की, अहंकार अनेकदा स्पष्ट दृष्टी धूसर करतो, त्यामुळे ती स्वच्छ करणे गरजेचे आहे. फंडा असा आहे की, गणेशजींच्या या अवतारांचे सौंदर्य हे आहे की, त्यापैकी प्रत्येक अवतार आपल्याला आपल्यातील एखाद्या कमकुवतपणावर विजय मिळवायला शिकवतो. अहंकार, लोभ, राग, ईर्षा, वासना आणि मोह या वेगवेगळ्या वाईट गोष्टी असू शकतात, परंतु स्वतःबद्दलची जागरूकता, संतुलन आणि बुद्धिमत्ता आपल्याला यावर मात करण्यास मदत करतात.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *