आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीची सांगता 20 फेब्रुवारीला होणार आहे. तसेच 21 फेब्रुवारीपासून सुपर 8 फेरीचा थरार रंगणार आहे.सुपर 8 मधील अव्वल 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना 21 फेब्रुवारीपासून एकसेएक सामने पाहायला मिळण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला वूमन्स आशिया कप रायजिंग स्टार्स 2026 स्पर्धेत उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. एकाच दिवशी उपांत्य फेरीतील सामने खेळवण्यात येणार आहेत. सेमी फायनलमधील पहिल्या सामन्यात इंडिया ए वूमन्स टीमसमोर श्रीलंका ए महिला संघाचं आव्हान असणार आहे. उभयसंघात अंतिम फेरीत पोहचण्यासाठी चुरस पाहायला मिळणार आहे. या निमित्ताने भारत ए विरुद्ध श्रीलंका ए महिला संघातील उपांत्य फेरीतील सामन्याबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कधी?
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना शुक्रवारी 20 फेब्रुवारीला होणार आहे.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना कुठे?
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना बँकॉक टेर्डथाई क्रिकेट ग्राउंड इथे होणार आहे.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामन्याला भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता सुरुवात होईल. तर 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्ही-मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?
इंडिया विरुद्ध श्रीलंका सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर लाईव्ह पाहायला मिळेल. तर सोनी लिव्ह एपद्वारे मॅच मोबाईलवर लाईव्ह पाहायला मिळेल.
भारत आणि श्रीलंकेची कामगिरी
इंडिया ए टीमची राधा यादव हीच्या नेतृत्वात पराभवाने सुरुवात झाली. भारतासोबत साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उलटफेरचा सामना करावा लागला. यूएईने भारतावर मात केली. मात्र त्यानंतर महिला ब्रिगेडने पाकिस्तान आणि नेपाळला पराभूत करत उपांत्य फेरीत धडक दिली.
तर श्रीलंकेलाही भारताप्रमाणे पहिल्या सामन्यात पराभूत व्हावं लागलं. बांग्लादेश ए टीमने श्रीलंकेवर विजय मिळवला. मात्र त्यानंतर श्रीलंका ए टीमने मलेशिया आणि थायलंडवर विजय मिळवला. श्रीलंकेने यासह उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. त्यामुळे आता भारत-श्रीलंकेपैकी कोण फायलनलमध्ये पोहचणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
इंडिया ए टीमची महिला ब्रिगेड उपांत्य फेरीसाठी सज्ज
One win away from the big stage 💙🏆
Radha’s India A lock horns with Sri Lanka A for a place in the final 🔥
Watch #INDvSL Semi-Final in DP World Women’s #AsiaCup Rising Stars 2026, LIVE on #SonyLIV and #SonySportsNetwork 📺 pic.twitter.com/L1ZOAVKKuZ
— Sony LIV (@SonyLIV) February 19, 2026
तर उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे इथून पाकिस्तान आणि तिथून भारताचा विजय झाला तर क्रिकेट चाहत्यांना रविवारी 22 फेब्रुवारीला महाअंतिम सामना पाहायला मिळू शकतो.
शहर
- पुणे: ‘ब्लड इन नीड’ सेवेचा अखिल भारतीय विस्तार; मोबाइल ॲपच्या लोकार्पणासह जगद्गुरू नरेंद्राचार्यजींशी माध्यमांचा विशेष संवाद
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
महाराष्ट्र
- मुंबई: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत: दोन दिवसांत २०० हून अधिक जणांना चावा, महापालिकेच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
- पुणे: महत्त्वाचा इशारा: आज 'तिरंगा रॅली'मुळे डेक्कन परिसरातील वाहतूक मार्गांत बदल
- पुणे: विग आणि मास्क घालून पोलिसांना हुलकावणी देणारी टोळी जेरबंद; ३७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
- पुणे: सातारा महामार्गावर काळाचा घाला: कारचा भीषण अपघात, मावळातील चार तरुणांचा मृत्यू
गुन्हा
- छत्रपती संभाजीनगर: ७ वीतील मुलीची 'रॉब्लॉक्स' गेमवर मैत्री अन् स्नॅपचॅटवर ब्लॅकमेल करत मागितले न्यूड फोटो; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल.
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- पुणे: प्रियकरासोबत राहत असल्याच्या रागातून पतीने केला पत्नीचा निर्घृण खून.
- पुणे: माणुसकी वेशीवर! पुण्यातील खराडी येथे मुळा-मुठा नदीपात्रात आढळला नवजात चिमुकलीचा मृतदेह; पोलिसांनी सुरू केला सखोल तपास.
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- अंक भविष्य ४ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या मूलांक १ ते ९ नुसार तुमचे आजचे राशीभविष्य
- आजचे राशिभविष्य ३ ऑगस्ट २०२६: जाणून घ्या आज कोणत्या राशींवर होणार शिवाची कृपा आणि कोणाला मिळणार ग्रहांची साथ
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- राजस्थान: बायकोपासून पैसे लपवण्यासाठी शेतकऱ्याने शेतात पुरले ५ लाख रुपये; वर्षभरानंतर नोटा वाळवीने खाल्ल्याचे पाहून बसला धक्का!
- प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमानच्या मुलाला अपघात: गायक ए.आर. अमीनच्या कारला चेन्नईत धडक, थोडक्यात बचावला!
- अहमदाबाद: इमारतीच्या टेरेसवर जाऊन २२ वर्षीय पीजी विद्यार्थीनीवर सुरक्षा रक्षकाचा जीवघेणा अत्याचार.
- बिहार: आईच्या उपचारासाठी जमीन गहाण ठेवली, एका गायीपासून सुरू केला प्रवास; बिहारच्या रोशन कुमार यांची प्रेरणादायी यशोगाथा.


























Subscribe to my channel


