कांदा पुन्हा महागला! लासलगावमध्ये घाऊक दर ४४ रुपये, तर किरकोळ बाजारात दर ७० रुपयांवर पोहचले

लासलगाव, (जि. नाशिक): कांद्याच्या वाढत्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडून बफर स्टॉकची विक्री, 'कांदा एक्स्प्रेस'द्वारे प्रमुख शहरांकडे रेल्वेने मालवाहतूक आणि साठेबाजांवर कडक कारवाई यांसारख्या विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. असे असतानाही आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत कांद्याच्या दराने पुन्हा एकदा मोठी उसळी घेतली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर महागाईचा मोठा ताण पडला असून गृहिणींचे बजेट कोलमडले आहे.

केंद्र सरकारचे सर्व प्रयत्न सुरू असतानाही केवळ दोन दिवसांच्या कालावधीत लासलगाव बाजारात कांद्याच्या दरात प्रति क्विंटल तब्बल ६०० रुपयांची वाढ झाली आहे. या वाढीव दरामुळे सध्या लासलगाव बाजारात कांद्याचा घाऊक दर ४,४०० रुपये प्रति क्विंटल (म्हणजेच ४४ रुपये प्रति किलो) वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे, स्थानिक व किरकोळ बाजारात हाच कांदा ग्राहकांसाठी थेट ६५ ते ७० रुपये प्रति किलो दराने विकाला जात आहे.

दरातील वाढीमागची कारणे

मागील काही दिवसांपासून हवामानातील बदल, नवीन पिकांची आवक अपुरी असणे आणि बाजारातील मागणी व पुरवठा यामध्ये निर्माण झालेली तफावत यामुळे कांदा दरात अचानक तेजी आली आहे. तसेच, शासनाकडून उपाययोजना केल्या जात असल्या तरी प्रत्यक्ष बाजारात होणाऱ्या आवकेवर आणि साठवणुकीवर परिणाम झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरात ही वाढ पाहायला मिळत आहे.

सध्या घाऊक बाजारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण असले, तरी वाढत्या किरकोळ किंमतींमुळे सर्वसामान्य जनता आणि शहरी भागातील ग्राहकांना महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. आगामी काळात बाजारात कांद्याची नवीन आवक वाढल्यानंतरच दर नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *