अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका कोणत्याही क्षणी इराणवर हल्ला करू शकते अशी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे जर आमच्यावर एक जरी हल्ला झाला तर आम्ही याला आमच्या विरोधात सुरू केलेलं युद्ध मानू आणि आम्ही मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या सर्व सैन्यतळांवर हल्ले करू अशी धमकी इराणकडून अमेरिकेला देण्यात आली आहे. दरम्यान अमेरिकेने आपल्या दोन सर्वात शक्तिशाली विमानवाहू युद्धनौका मध्य पूर्वेच्या समुद्रात तैनात केल्या आहेत. यामुळे मध्य पूर्वेत तणाव वाढला आहे. जर अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरूच झालंच तर त्याचा मोठा फटका हा कच्च्या तेलासाठी इराणवर अवलंबून असलेल्या अनेक देशांना बसणार आहे, यामध्ये भारताचा देखील समावेश आहे.
दरम्यान एक मोठी बातमी समोर येत आहे, यामुळे इराणसोबत युद्धाच्या तैयारीमध्ये असलेल्या अमेरिका आणि डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. आता रशिया इराणच्या मदतीला धावून आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर हिंद महासागर आणि ओमानच्या समुद्रात रशिया व इराण हे संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. यामुळे आता अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा चांगलाच जळफळाट झाला आहे, त्यामुळे हा वाद आणखी भडकण्याची शक्यता आहे. अमेरिकेने या भागात आधीच दोन सर्वात शक्तिशाली युद्धनौका तैनात केल्या आहेत, तसेच इराण आणि रशिया यांच्या संयुक्त युद्ध सरावाची बातमी समोर येताच अमेरिकेने गेल्या 24 तासांमध्ये 50 पेक्षा अधिक फायटर जेट देखील पाठवले आहेत. त्यामुळे आता तणाव वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान इराणी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार इराण आणि रशिया गुरुवारी उत्तर हिंद महासागरात संयुक्त युद्ध सराव करणार आहेत. एका रिपोर्टनुसार यावर बोलताना इराणचे नेव्ही कमांडर हसन मघसूदलू यांनी म्हटलं आहे की, या संयुक्त युद्धसरावाचा उद्देश हा दोन्ही देशांमधील ताळमेळ वाढवण्याचा आहे. सोबतच समुद्री दहशतवाद नष्ट करण्याचा आहे. अमेरिका आणि रशियाच्या संबंधांमध्ये देखील सध्या मोठा तणाव आहे, तसेच अमेरिका आता इराणवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. अशा स्थितीमध्ये आता इराण आणि रशिया एकत्र आल्याचं पहायला मिळत आहे.
शहर
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- नवी दिल्ली/मुंबई: निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेल २५ रुपयांनी महागणार? सोशल मीडियावरील चर्चांवर सरकारने दिले महत्त्वाचे स्पष्टीकरण
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
महाराष्ट्र
- आंबेगाव तालुक्यात शोककळा! ओढ्यात खेळताना १० वर्षीय कृष्णा चवरेचा बुडून दुर्दैवी मृत्यू; अवसरी बुद्रुकमधील घटना
- जाऊन येतो म्हणाला, पण विहिरीत आढळला मृतदेह! जालन्यातील तरुणाच्या मृत्यूचे गूढ वाढले; दानापूर फाट्यावरील घटना
- बीड कारागृहातून धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल! अझर पठाणचा गंभीर आरोप; निवडणुकीच्या तोंडावर राजकीय षडयंत्राचा दावा
- रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक! पॅन्ट्री कारमधील उंदीर आणि झुरळांच्या त्रासाला बसणार चाप; रेल्वेकडून १५ दिवसांची विशेष मोहीम
गुन्हा
- पैसा, घर गेले आणि मातृछत्रही हरवले! शहीद पुत्राची २ कोटींची फसवणूक; धक्क्याने मातेचा मृत्यू
- धक्कादायक! जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूला मुंबईत अटक; उद्योगपतीला 'सेक्सटॉर्शन'च्या जाळ्यात ओढून ६३ लाखांना लुटले
- पुण्यात विश्वासघाताचा धक्का! मालकाच्याच कार्यालयातून नोकराने लंपास केली १० लाखांची रोकड; खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- पुणे: भिडे पुलाजवळील गळा चिरून झालेल्या खून प्रकरणाचा छडा; हातावरील 'टॅटू' आणि तांत्रिक तपासाने आरोपींना बेड्या
राजकीय
- NCP मध्ये घमासान! दिल्लीत सुनेत्रा पवार अॅक्टिव्ह, पटेल-तटकरे अडचणीत? मोठा निर्णय लवकरच?
- Mumbai ; झिरवळांची ‘विकेट’ जाणार? प्री-कॅबिनेट बैठकीत मोठा ट्विस्ट; सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत काय घडलं?
- गुरुदेवांच्या आशीर्वादाने घशाची समस्या दूर; मुंबई महापौर रितू तावडेंच्या वक्तव्याची चर्चा
- मोठी अपडेट! रुपाली चाकणकर अडचणीत? आज चौकशीला हजर राहणार का?
इतर
- भारतातील जातीव्यवस्था : वास्तव, परिणाम आणि पुढील दिशा
- पुण्याच्या आर्या नाचणची सिल्वासा CBSE बोर्डात चमकदार कामगिरी; AI विषयात 100/100 गुण
- भारतीय रेल्वे इतक्या रंगबिरंगी का? प्रवाशांसाठी या रंगांचा अर्थ काय?
- Pune ; शेती: बाजार समित्यांमध्ये कांदा आणि कापसाच्या भावात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत
मनोरंजन
- पनवेल रेल्वे स्थानकावर थरार! लिफ्टमध्ये चार प्रवासी अर्धा तास अडकले; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे सुखरूप सुटका
- महाराष्ट्र हवामान अपडेट: विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, तर काही भागांत उष्णतेच्या लाटेचा इशारा
- मुंबईकरांचा प्रवास गारेगार! हार्बर रेल्वेच्या ताफ्यात नवीन AC लोकल; फेऱ्यांची संख्या आता थेट २८ वर
- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले: स्त्रिया आणि शोषितांची मुक्ती करणारा महान योद्धा
देश विदेश
- भारत-रशिया ऐतिहासिक करार: ३००० सैनिकांच्या तैनातीला मंजुरी; सीमेवर तणाव वाढल्याने पाकिस्तानच्या पोटात गोळा
- इराणची मोठी कारवाई! जैश अल-अदल या दहशतवादी संघटनेच्या संपूर्ण टीमचा खात्मा; पाकिस्तान सीमेवर थरार
- LPG : युद्ध थांबताच एलपीजीबाबत केंद्राचा मोठा निर्णय; नवीन फॉर्म्युला जाहीर, कुणाला फायदा?
- अखेर निर्णायक टप्पा! अमेरिकेला धक्का; इराणने पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव फेटाळला, जगभरात खळबळ
























Subscribe to my channel




