या आठवड्यात संसदेने ट्रान्सजेंडर विधेयक घाईघाईने मंजूर केले. ‘घाई’ यासाठी कारण वीस वर्षांपूर्वीपर्यंत दहापैकी सहा विधेयके छाननीसाठी संसदीय समित्यांकडे पाठवली जात असत. आता दहापैकी फक्त दोनच विधेयके पाठवली जात आहेत. आणखी एक चिंताजनक बाब म्हणजे दोन्ही सभागृहांमधील भाजप नेत्यांनी त्यांना बोलण्यासाठी दिलेल्या वेळेपैकी केवळ दोन-तृतीयांश वेळेचाच वापर केला. त्यांच्याकडे पुरेसे वक्ते नव्हते का? की विधेयक लवकर मंजूर व्हावे यासाठी त्यांनी वक्त्यांना पुढे न आणण्याचा निर्णय घेतला? तर दुसरीकडे विरोधी पक्षाच्या खासदारांनी प्रत्येक मिनिटाचा वापर करून प्रभावी हस्तक्षेप केला. उदाहरणार्थ- काँग्रेस पक्षाच्या रेणुका चौधरी म्हणाल्या, आम्ही खासदार होतो. तेव्हा आम्हाला आमची लैंगिक ओळख जाहीर करावी लागते. आम्ही हे स्वतः करतो. त्याची पुष्टी वैद्यकीय मंडळाकडून केली जात नाही. द्रमुकचे तिरुची शिवा म्हणाले , ट्रान्सजेंडर लोकांचे सर्वत्र शोषण, छळ व अपमान होत आहे. आता सरकार त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. तृणमूलचे साकेत गोखले म्हणाले, “ट्रान्स पुरुष हा पुरुषच आहे. ट्रान्स महिला ही महिलाच आहे. हे तिसरे लिंग नाही. सरकारला ही मूलभूत तथ्येच समजत नाहीत. तेव्हा आपण कोणत्या कायदेशीर हक्काबद्दल बोलत आहोत? याउलट भाजपच्या डॉ. मेधा कुलकर्णी यांनी राज्यसभेत काय म्हटले ते ऐका : “ते ट्रॅफिक सिग्नलवर भीक मागताना आणि पैसे गोळा करताना आढळतात... आणि घरी पोहोचल्यावर ते पैसे मोजताना, दारू पिताना आणि सिगारेट ओढताना दिसतात!’ यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही. संसदेने मंजूर केलेल्या विधेयकामुळे 2019 च्या कायद्यात व्यापक बदल करण्यात आले आहेत. ही दुरुस्ती त्याचा उद्देश आणि परिणाम या दोन्ही दृष्टीने धोकादायक आहे. कारण ती ट्रान्सजेंडर व्यक्तीची व्याख्या आणखी संकुचित करते. आता एखाद्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी वैद्यकीय मंडळ किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीची आवश्यकता असेल. स्व-ओळख यापुढे पुरेशी ठरणार नाही. यामुळे लैंगिक ओळख ही वैयक्तिक स्वायत्ततेची बाब न राहता शासनाच्या मान्यतेची बाब बनते. यामुळे असमान वागणूक निर्माण होते (कलम 14 चे उल्लंघन) आणि स्वायत्तता व प्रतिष्ठा मर्यादित होते (कलम 21 चे उल्लंघन). नवीन विधेयकानुसार रुग्णालयांना लिंग-पुष्टीकरण शस्त्रक्रियांची माहिती अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे. ते वैद्यकीय गोपनीयतेचे उल्लंघन आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती के. एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारत सरकार या निकालात स्पष्ट केले आहे की गोपनीयतेमध्ये शारीरिक आणि निर्णयात्मक स्वायत्तता तसेच वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार समाविष्ट आहे. एखाद्याच्या शरीरासंबंधीचे निर्णय वैयक्तिक स्वातंत्र्याच्या कक्षेत येतात. तृतीयपंथी लोकांना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांची ओळख उघड करण्यास भाग पाडणे धोकादायक ठरू शकते. यामुळे ते कुटुंब, कार्यस्थळ आणि सार्वजनिक जीवनात भेदभावाला अधिक बळी पडतात. तृतीयपंथी लोकांचे संरक्षण करण्याचा दावा करणारा कायदा, अशा संरक्षणाची गरज निर्माण करणाऱ्या परिस्थितीला अधिक मजबूत कसा करू शकतो? हे विधेयक अशा दंडात्मक तरतुदींचा लक्षणीय विस्तार करते. ते कागदोपत्री छळाला शिक्षा देण्यासाठी आहेत. मात्र प्रलोभन आणि अवाजवी प्रभाव यांसारख्या अस्पष्ट संज्ञांचा वापर, आणि अगदी संमतीने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांनाही गुन्हेगारी ठरवणे हे एक पूर्णपणे वेगळेच चित्र उभे करते. शिक्षेच्या भीतीमुळे लोक लिंग-पुष्टीकरण उपचार घेण्यास कचरतील. गुन्ह्यांच्या अस्पष्ट व्याख्येमुळे ते छळाचे साधन बनण्याचा धोका आहे. त्यामुळे मित्र, कुटुंब आणि अगदी वैद्यकीय व्यावसायिकांनाही शिक्षा होऊ शकते. हिंदी चित्रपटांमधील ट्रान्सजेंडर प्रतिनिधित्वाचा विचार करा. ऋषी कपूरच्या ‘रफू चक्कर’ किंवा अमिताभ बच्चनच्या ‘लावारिस’मध्ये ते प्रामुख्याने विनोदाचा स्रोत म्हणून सादर केले गेले. कुकू (‘सेक्रेड गेम्स’) किंवा शिल्पा (‘सुपर डिलक्स’) यांसारखी पात्रे अधिक सूक्ष्म चित्रण सुचवतात. पण इथेही ट्रान्स भूमिका अनेकदा सिस-जेंडर कलाकारांद्वारे साकारल्या जातात. 1930 च्या दशकात नाझी जर्मनीमध्ये “ट्रान्सव्हेस्टाईट प्रमाणपत्रे’ (त्या वेळी ट्रान्सजेंडर लोकांचे वर्णन करण्यासाठी वापरली जाणारी संज्ञा) जारी केली जात होती. अशी प्रमाणपत्रे होती त्यांना छळछावण्यांमध्ये पाठवले जात होते. आपण कोणत्या दिशेने जात आहोत? (हे लेखकाचे वैयक्तिक मत आहे. आयुष्मान डे व चाहत मंगतानी यांनी सह-लेखन केले आहे.)
आपल्या समाजात ट्रान्सजेंडर व्यक्तींना आधीच पूर्वग्रहांचा सामना करावा लागतो. त्यांच्या संमतीशिवाय त्यांना त्यांचे जेंडर स्पष्ट करण्यास भाग पाडणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
- पुणे: सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनचा थरार! भरधाव गाडीने उडवल्या अनेक वाहने, सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल
- पुणे: पाण्याची चिंता मिटली! खडकवासला धरणसाखळीतील चारही धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर, पाणीसाठा ९६ टक्क्यांवर
- मुंबई: जुलैमध्ये पावसाचा दिलासा, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, पण ऑगस्टमध्ये काय होणार? हवामान विभागाचा ताजा अंदाज
महाराष्ट्र
- राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ४००० रुपये एकत्रित मिळणार का
- नागपुर: अवघ्या एकाच दिवसात तीन वेगवेगळ्या महिलांच्या अंगावरील लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले
- वर्धा: एटीएम फोडून १२ लाखांची रोकड लांबवली; पुरावा नष्ट करण्यासाठी चोरांनी एटीएमलाच लावली आग
- पुणे: अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीत डीजेवरील वादानंतर रक्तरंजित थरार; टोळक्याच्या बेदम मारहाणीत तरुण जागीच ठार, १० जण अटकेत
गुन्हा
- अमरावती: बापट चौकात मध्यरात्री रक्ताचा थरार; तरुणाची निर्घृण हत्या, शहरात एकच खळबळ
- पुणे: सिंहगड रोड परिसरात खळबळ; किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या, परिसरात तीव्र संताप
- सांगली: बकरी विकण्याच्या आमिषाखाली ठाणे आणि सोलापूरमधील चार जणांची सायबर फसवणूक; सांगलीच्या सिमकार्डचा वापर
- ठाणे: उल्हासनगरमध्ये सायबर फसवणूक; लंडनच्या डॉक्टर मित्राकडून २५ हजार पाउंड्सचे आमिष दाखवून महिला डॉक्टरला २ लाखांना गंडा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १ ऑगस्ट २०२६: महिन्याची सुरुवात या राशींसाठी धडाक्यात, मिळणार गुडन्यूज तर या राशींची उडणार तारांबळ
- आजचे राशिभविष्य ३१ जुलै २०२६: या भाग्यवान राशींवर असणार श्रीगणेशाची कृपा, संपत्ती आणि लाभाचे योग
- आजचे राशिभविष्य ३० जुलै २०२६: या राशींच्या कुंडलीतील ग्रह मजबूत, स्वामींची साथ मिळणार तर काहींचे वाढणार टेन्शन
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचा ऐतिहासिक पराक्रम; ज्युडोमध्ये सुवर्णपदक जिंकणारी अस्मिता डे ठरली पहिली भारतीय खेळाडू!
- गोवा: बांबोळीतील 'फुलान्चो खुरीस'जवळ भीषण अपघात; वाहन पेट घेतल्याने एक जण ठार, तर दोघे जण गंभीर जखमी
- नवी दिल्ली: आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करणे झाले आणखी सोपे; नवीन अॅपवरून घरबसल्या करा अर्ज
- जम्मू-काश्मीर: कुलगाममधील केल्लम भागात दहशतवादी हल्ला, छत्तीसगडच्या दोन मजुरांचा मृत्यू; 'लष्कर-ए-तैयबा'कडून कृत्याची कबुली




























Subscribe to my channel




