वादळासह मुसळधार पाऊस, 12 तास धोक्याची, हवामान विभागाने थेट…

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाऊस झाला. थंडी, पाऊस आणि उडाका असे समीकरण बघायला मिळाले. आता मार्च महिन्याला सुरूवात झाली. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच तापमानात चढउतार बघायला मिळतोय. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मार्च महिन्यात तापमानात चढउतार राहिल. यासोबतच उष्णतेत वाढ होईल. गेल्या दोन ते तीन दिवसांचा विचार केला असता राज्यात उष्णता वाढताना दिसत आहे. आठ दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसला. अनेक भागात मुसळधार पाऊस झाला. राज्यात दुपारी जरी उकाडा जाणवत असला तरीही सकाळी गारठा आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे झाली. निफाड येथे 12 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आजही तापमानात चढउतार बघायला मिळेल. तब्बल इतक्या राज्यात पाऊस होण्याचा अंदाज देशातील अनेक राज्यात आज 3 मार्च 2026 रोजी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. पावसामुळे तापमान 2 ते 3 अंशांनी कमी होऊ शकते. जम्मू आणि काश्मीरमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. 2 ते 3 मार्च दरम्यान हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट वातावरण राहण्याचा अंदाज कोकण आणि गोव्याच्या काही भागात 4 ते 7 मार्च दरम्यान उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. आयएमडीनुसार, मार्चमध्ये ईशान्य भारत आणि वायव्य आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडू शकतो. यासोबतच दिल्लीमध्येही तापमानात चढउतार बघायला मिळण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा मोठा अंदाज आयएमडीनुसार 3 मार्च रोजी उत्तर प्रदेशच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे, तसेच 20 ते 30 किलोमीटर प्रति तास वेगाने जोरदार वारे वाहतील. पुढील 12 तास धोक्याची आहेत. हवामान खात्यानुसार, काही जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचू शकते. मार्च महिन्याला सुरूवात झाली आहे. मात्र, पाऊस अजूनही काही जाण्याचे नाव घेत नाहीये.

This post was originally published on this site.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *