पुणे - शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर जोरदार हल्ला चढविणाऱ्या भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ व त्यांच्या साथीदारांनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी देऊन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले, असा गौप्यस्फोट रघुनाथ कुचिक प्रकरणातील पिडीत तरुणीने मंगळवारी केला. इतकेच नव्हे, तर आजपर्यंत सगळे जबाब वाघ यांच्या सांगण्यावरुनच दिल्याचेही तिने नमूद केले आहे. हा गौप्यस्फोट चित्रा वाघ यांच्या चांगलाच अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, पिडीतेच्या गौप्यस्फोटानंतर पुणे पोलिसही "ऍक्शन मोड'वर आले असून पिडीतेला कायदेशीर सहकार्य करणार असल्याची भुमिका पुणे पोलिसांनी घेतली आहे.
शिवसेनेचे नेते व राज्यमंत्रीपदाचा दर्जा असणारे रघुनाथ कुचिक यांनी बलात्कार करुन गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरुन कुचिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर थेट निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध रान पेटविले होते. पिडीत तरुणीच्या जीवाला धोका असल्यापासून ते ती आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे तसेच तिचे अपहरण झाल्याचेही सांगण्यात आले. दरम्यान, पिडीत तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे जाऊन हा सर्व प्रकार कथन केला होता. कुचिक यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यावरही वाघ यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यासाठी वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयामध्ये दोनदा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधीत तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅट पुढे आणून कुचिक यांच्यासह पुणे पोलिस व महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केले होते.
दरम्यान, पिडीत तरुणीने मंगळवारी सकाळी "साम टिव्ही'ला मुलाखत देत तिच्याबाबत आत्तापर्यंत घडलेला घटनांना चित्रा वाघ व त्यांचे सहकारीच कसे जबाबदार आहेत, याचा पाढा वाचला.
पिडीत तरुणी म्हणाली, 'मी सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता शिवाजीनगर पोलिसांनी चौकशीसाठी बोलाविल्याने त्यांच्याकडे चौकशीकामी जात होते. मी उरुळी कांचन इथे आले, त्यावेळी पवार नावाच्या व्यक्तीने एक पत्र माझ्या हातात दिले. त्याने ते पत्र मला कुचिक यांनी दिल्याचे पोलिसांना सांग असे सांगितले. त्या पत्रामध्ये मी हे प्रकरण मागे न ऐकल्यास ते मला जीवे मारुन टाकतील' असा उल्लेख कुचिक यांच्या नावाने केल्याचे दिसले. प्रत्यक्षात कुचिक यांनी असे पत्र पाठविले नाही आणि मला धमक्याही दिल्या नाहीत.'
पिडीत तरुणी वाघ यांच्याबाबत म्हणाली, 'मागील काही दिवसांपासून चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत कुचिक व माझे काही चॅट पुढे आणले. प्रत्यक्षात त्यांनी सादर केलेले चॅट मी किंवा कुचिक यांनी मला कधीही पाठविले नव्हते. असे चॅट त्यांनी कुठून आणले, हे मला कळले नाही. मुंबईतील एक व्यक्ती मला वडीलांसारखे होती. मी गरोदर असल्याचे त्या व्यक्तीला कळले. तेव्हा ते मला भेटायला आले. त्यानंतर त्यांनी माझा उपयोग करुन कुचिकांकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली. ते कुचिक यांच्याशी सुडटबुद्धीने वागुन माझा वापर करीत होते. त्यांनी कुचिकांवर जबरदस्तीने गुन्हा दाखल करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला. मोहम्मद अहमद, रोहित भिसे व चित्रा वाघ या तिघांनी मिळून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.'
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

