मुंबई: मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी महापालिका प्रशासनाने अत्याधुनिक टनेल लाँड्री उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयात घोटाळा झाल्याचा संशय भाजप आमदार अमित साटम यांनी व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्तांनी हे १६० कोटींचे कंत्राट रद्द करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी एका पत्राद्नारे केली आहे. ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी असा प्रश्न अमित साटम यांनी उपस्थित केला आहे.
भाजप आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त प्रशासक इक्बाल चहल यांना लिहीलेल्या पत्रात खळबळजनक आरोप करण्यात आले आहेत. टनेल लाँड्रीचे कंत्राट काढण्यासाठी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याने १६ कोटीची रक्कम स्वीकारली आहे. त्याचे सविस्तर पुरावे मी वेळ आल्यावर तपास यंत्रणेला सादर करणार असल्याचे साटम यांनी यावेळी म्हटले आहे. कुठलेही तंत्रज्ञान, टेकनिकल स्पेसीफिकेशन किंवा अनुभव याविषयी यामध्ये कुठलीही एकसुत्रता नाहीये आणि सगळ्या गोष्टी विशिष्ट कंत्राटदाराला फायदा होणार याकडे लक्ष दिले, असल्याचा आरोप देखील साटम यांनी केला आहे.
मुंबई महापालिकेकडून जेव्हा निविदा काढली जाते, तेव्हा मुंबई महापालिका आणि CVC च्या मार्गदर्शक तत्वानुसार संबंधित कंपनीच्या कामाचा अनुभव ग्राह्य धरला जात असतो. मात्र, या मार्गदर्शक तत्वांना धाब्यावर बसवून खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि विदेशातील कंपन्यांचा मार्ग सुकर करण्यात आला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ज्या रुग्णालयाच्या आवारात ही टनेल लाँड्री उभारण्याचे प्रस्तावित आहे. ते क्षयरोगाचे रुग्णालय आहे. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. जर क्षयरोग रुग्णालयात टनेल लाँड्री बनवून तिथे धुवून आणि सुकवून पाठवले तरी त्याद्वारे जंतूसंसर्ग होणार नाही याची हमी आरोग्य विभाग देणार आहे का? असा प्रश्न अमित साटम यांनी केला उपस्थितीत केला आहे. जंतूसंसर्गाच्या
भीतीने आरोग्य विभागाने ही परवानगी दिली नसल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. आरोग्य विभागाला ही भीती वाटत असेल, तर भविष्यात रुग्णालयातील विविध आजारांनी ग्रासलेले रुग्ण आणि डॉक्टर यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का केला जात आहे? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. ही निविदा प्रक्रिया त्वरीत बंद करून संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. रुग्णालयांमध्ये वापरलेले कपडे धुण्यासाठी सध्या महापालिकेकडून परेल येथील विद्युत धुलाई केंद्राचा वापर केला जात आहे. हे केंद्र महापालिकेच्या मालकीचे आहे. मात्र, या केंद्राची कार्यक्षमता कमी झाल्याने याठिकाणी सध्या ५० टक्के कपडे धुतले जात आहेत. तर, उर्वरीत कपडे खासगी लाँड्रीतून धुतले जात आहेत.
शहर
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- मे २०२६ वाहन विक्रीचा अहवाल: भारतीय ऑटो मार्केटमध्ये मोठी तफावत; काही कार्स लाखांच्या घरात, तर काही ३०० चा आकडाही गाठू शकल्या नाहीत!
महाराष्ट्र
- संघ शताब्दी वर्षाची नवी रणनीती: संघटनात्मक बांधणी अधिक बळकट करणार, देशभरात वाढणार प्रचारकांची संख्या!
- सातारा जिल्ह्याचा धक्कादायक कारभार: चक्क 'अनफिट' रुग्णवाहिकांची धाव; जिल्हा परिषद सदस्याने उघड केले धक्कादायक वास्तव!
- भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; सांगलीत १४ फेसबुक युजर्सवर गुन्हा दाखल!
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
गुन्हा
- कोकण रेल्वेची मोठी कारवाई: एक्स्प्रेसमध्ये सडकी फळे विकणाऱ्या विक्रेत्याला अटक; १५ दिवसांची विशेष मोहीम सुरू!
- अमरावती: तरुणीची निर्घृण हत्या; अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने खळबळ!
- कोल्हापूर: प्रियकराकडून तीन मित्रांच्या मदतीने तरुणीवर अत्याचार; ब्लॅकमेलिंग प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल.
- दाऊदचा हस्तक 'सलीम डोळा'च्या ड्रग्ज नेटवर्कवर ईडीचा सर्जिकल स्ट्राईक; २० ठिकाणी छापेमारी, रोख रक्कम व महत्त्वाचे दस्तऐवज जप्त!
राजकीय
- पुणे विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी! शरद पवारांचे श्रीकांत पाटील तर अजित पवारांचे विक्रम काळे रिंगणात; चुरस वाढली!
- सांगली-सातारा विधानपरिषद निवडणूक: ८ उमेदवारांची रिंगणात उडी! महायुती आणि महाविकास आघाडीत जोरदार शक्तीप्रदर्शन.
- सातारा मिनी मंत्रालयाचा 'भाई' कोण? सभापतींच्या दालनात तडीपार गुंडाची बर्थडे पार्टी; पोलिस यंत्रणेचे पितळ उघडे.
- अमरावतीत विधान परिषदेचा 'रंगीत' खेळ! प्रवीण पोटेंपासून हर्षजीत देशमुखांपर्यंत दिग्गज मैदानात; कोण मारणार बाजी?
इतर
- आजचे राशिभविष्य ३ जून २०२६: भद्र राजयोग व लक्ष्मी नारायण राजयोगाचा शुभ संयोग, या राशींसाठी भाग्याचा दिवस!
- आजचे राशिभविष्य १ जून २०२६: जूनची सुरुवात या राशींसाठी ठरणार सुपरहिट, मिळतील मोठे लाभ आणि पदोन्नती!
- शहापुरात अन्नातून विषबाधा: एकाची प्रकृती चिंताजनक, २२ जण रुग्णालयात दाखल.
- आजचे राशीभविष्य ३० मे २०२६: 'भास्कर योगा'चा शुभ संयोग, या राशींना मिळेल भाग्याची साथ!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- उसाचा रस विकून झाला सेलिब्रिटी; इन्स्टाग्रामवर १.२५ लाख फॉलोअर्स असलेला 'हा' विक्रेता चर्चेत!
- मुंबई: 'अशोक वडापाव'चा जागतिक गौरव! 'टेस्टॲटलस'च्या जगातील सर्वोत्तम सँडविचच्या यादीत पटकावले २५ वे स्थान.
- ट्रम्प यांच्या 'युद्धविरामा'च्या दाव्यांना हरताळ; लेबनॉनवर इस्रायलचे भीषण हल्ले सुरूच, ८ जणांचा मृत्यू.
























Subscribe to my channel


