नवी दिल्ली: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफच्या (Tiger Shroff) कारवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या सनसनाटी गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित हस्तक अनिल पंडित याचे नाव अचानक प्रकाशझोतात आले आहे. अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिल्ली पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांच्या तपासात अनिल पंडित याच्याविषयी अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये बसून भारतामध्ये गुन्हेगारी कारवायांचे नियोजन करणारा अनिल पंडित हा हरियाणामधील तब्बल १२ खंडणीच्या प्रकरणांमध्ये हवा असलेला वाँटेड गुन्हेगार असल्याचे समोर आले आहे.
२०२३ पर्यंत कोणताही मोठा गुन्हा नाही: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल पंडित हा मूळचा हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील राय कलान गावचा रहिवासी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे २०२३ पर्यंत म्हणजेच त्याने भारत सोडण्यापूर्वी त्याच्यावर कोणताही मोठा किंवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल नव्हता. मात्र, २०२३ मध्ये देश सोडल्यानंतर अवघ्या दोन वर्षांतच त्याने आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतात बूट रोवले आणि तो कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. सध्या तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातून भारतातील गुन्हेगारी कारवायांचे नियंत्रण आणि समन्वय साधत असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे.
टायगर श्रॉफवरील गोळीबाराची जबाबदारी: मुंबईतील जुहू परिसरात रविवारी संध्याकाळी टायगर श्रॉफच्या कारवर अज्ञातांनी ५ राऊंड गोळीबार केला होता. या हल्ल्यात अभिनेता थोडक्यात बचावला असला तरी त्याचा ड्रायव्हर आणि अन्य एक व्यक्ती जखमी झाली. या घटनेनंतर काही वेळातच अनिल पंडित याने सोशल मीडियावर थेट पोस्ट करत या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. तसेच त्याचा साथीदार हरमन संधू यानेही ऑडिओ व सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीतील विशिष्ट व्यक्तींशी संबंध ठेवल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्या दिल्या होत्या.
हरियाणामध्ये १२ हून अधिक खंडणीचे गुन्हे: फक्त बॉलिवूड कलाकारांना धमकावणेच नव्हे, तर अनिल पंडितचा हरियाणातील व्यावसायिक व उद्योजकांकडून खंडणी उकळण्याच्या अनेक गंभीर गुन्ह्यांशी थेट संबंध आहे. पानिपत, सोनीपत आणि कर्नाल या भागांतील व्यावसायिकांना लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाखाली धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी सुमारे १० ते १२ गुन्ह्यांत तो पोलिसांच्या वॉन्टेड लिस्टमध्ये आहे. हरमन संधू, हॅरी बॉक्सर, शुभम लोणकर आणि रणदीप मलिक यांसारख्या कुख्यात गुन्हेगारांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे तपासात उघड झाले आहे. भारतात गोळीबार करणारे शूटर आणि खंडणी मागणाऱ्यांचे जाळे परदेशातून हाताळणाऱ्या अनिल पंडितच्या मुसक्या आवळण्यासाठी आता सुरक्षा यंत्रणांनी आपल्या हालचाली तीव्र केल्या आहेत.
शहर
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
- पुणे: गेल्या दहा-बारा वर्षांमध्ये भारतातील ५० कोटी लोकांची गरिबी दूर झाली: पंतप्रधान नरेंद्र मोदी
महाराष्ट्र
- सिंधुदुर्ग: सागरी हद्दीत घुसखोरी करून बेकायदा मासेमारी; मत्सव्यवसाय विभागाची धडक कारवाई, कर्नाटकाची 'सुलतान' नौका जप्त करत तांडेलसह सात खलाशांना घेतले ताब्यात!
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- उल्हासनगर: दिवाळीत डबल डेकर मेट्रोची भेट; मेट्रो ५ आणि ५ अ च्या निविदा जाहीर होताच शिंदेंच्या शिवसैनिकांकडून पेढे वाटून जोरदार जल्लोष!
- कोल्हापूर: आंदोलन तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है! गडहिंग्लज तालुका दुष्काळी घोषित करण्यासाठी शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात
- चंदीगड: पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला मोठा धक्का; ३ आमदारांनी पक्ष सोडत भाजपमध्ये केला प्रवेश
- दिल्ली: विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची दिल्लीत अमित शाहांची भेट; सुनेत्रा आणि पार्थ पवारांना वगळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ




























Subscribe to my channel




