गुन्हेगारी जगतात अनैतिक संबंध आणि वासनेपोटी स्वतःच्या जोडीदाराचा काटा काढल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील. परंतु, गुजरातच्या सुरेंद्रनगरमधून समोर आलेली एक मर्डर मिस्ट्री वाचून तुमचेही डोके चक्रावून जाईल. एका ५० वर्षांच्या महिलेने आपल्या अनैतिक संबंधांच्या आड येणाऱ्या पतीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. विशेष म्हणजे, स्थानिक पोलिसांना या हत्येचा छडा लावण्यात अपयश आले होते, मात्र अहमदाबाद क्राईम ब्रांचने तब्बल ८ महिन्यांनंतर या प्रकरणाचा असा काही थरारक खुलासा केला आहे, जो ऐकून सगळेच हादरले आहेत.
जागृती गोस्वामी (वय ५०) असे या लेडी 'मास्टरमाइंड' पत्नीचे नाव असून, तिने तिचा मुख्य प्रियकर कांतिलाल उर्फ भरत साबरिया (वय ५४) याच्यासोबत मिळून पती शांतीगिरी गोस्वामी यांची हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, या हत्येच्या संपूर्ण कटात आणि मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात या महिलेचे एकूण ४ प्रियकर वेगवेगळ्या टप्प्यांवर सामील होते.
पहिले लग्न आणि ४ प्रियकरांचे जाळे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृतीचे हे दुसरे लग्न होते. तिच्या पहिल्या पतीपासून तिला चार मुले आहेत. पहिल्या पतीला सोडून तिने शांतीगिरी यांच्याशी लग्न केले होते आणि पहिल्या पतीची चारही मुले शांतीगिरी सांभाळत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत जागृतीचे चार वेगवेगळ्या पुरुषांशी अनैतिक संबंध निर्माण झाले होते. पती शांतीगिरी यांना तिच्या या कृत्यांची माहिती मिळाली आणि त्यांनी याला तीव्र विरोध करण्यास सुरुवात केली. आपल्या मौजमजेत आणि अनैतिक संबंधात पती अडथळा ठरत असल्याचे पाहून जागृतीने त्याचा काटा काढण्याचे ठरवले.
सुपारी देऊनही नवरा वाचला!
पतीची हत्या करण्यासाठी जागृतीने आधी आपल्या एका प्रियकराला मोठी रक्कम देऊन पतीला संपवण्याची सुपारी दिली होती. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरला आणि शांतीगिरी सुदैवाने त्यातून वाचले. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर जागृतीने तिचा मुख्य प्रियकर कांतिलाल याच्यासोबत मिळून स्वतःच हत्येचा नवा प्लॅन आखला.
उशीने तोंड दाबून बेडवरच केला अंत
ठरलेल्या कटानुसार, ८ महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी शांतीगिरी घरात झोपलेले असताना जागृती आणि कांतिलाल यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्यांनी शांतीगिरी यांचे हात-पाय घट्ट पकडले आणि उशीने त्यांचे तोंड व नाक दाबले. शांतीगिरी यांनी जीव वाचवण्यासाठी प्रचंड धडपड केली, परंतु आरोपींच्या ताकदीपुढे त्यांचा काहीच इलाज चालला नाही. श्वास गुदमरल्याने त्यांचा बेडवरच तडफडून मृत्यू झाला.
मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात इतर प्रियकरांची मदत
हत्या केल्यानंतर शांतीगिरी यांचा मृत्यू नैसर्गिक वाटावा असा देखावा करण्यात आला. मृतदेहाची गुपचूप विल्हेवाट लावण्यासाठी जागृतीच्या इतर प्रियकरांनी तिला मदत केली. स्थानिक पोलिसांना सुरुवातीला हा संशयास्पद मृत्यू वाटला नाही, त्यामुळे प्रकरणाची फाईल बंद होण्याच्या मार्गावर होती. मात्र, अहमदाबाद क्राईम ब्रांचला या प्रकरणाबाबत गुप्त माहिती मिळाली. पोलिसांनी तांत्रिक बाबी आणि संशयितांच्या कॉल डिटेल्सचा सखोल तपास केला असता, तब्बल ८ महिन्यांनी या भीषण हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी पत्नी जागृती आणि तिच्या प्रियकरांना बेड्या ठोकल्या आहेत.
शहर
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
- मुंबई: लाडकी बहीण योजना अपडेट: ई-केवायसी न केलेल्या ८१ लाख महिलांना मिळणार १५०० रुपये? मुख्यमंत्र्यांनी काय दिले आश्वासन?"
महाराष्ट्र
- पुणे: सातारा आणि सांगलीत निवडणुका मग पुणे जिल्हा बँकेचीच का पुढे ढकलली? खासदार सुप्रिया सुळेंचा सरकारला संतप्त सवाल
- सांगली: नदी प्रदूषित करणाऱ्या महापालिका, पालिकांसह कारखान्यांवर थेट गुन्हे दाखल करा; जलसंपदामंत्र्यांचे अत्यंत कडक आदेश
- मुंबई: नवनाथ बन माझा मित्र नाही, तू कोण बोलणारा? आमदार निलेश राणेंचा भाजप प्रवक्त्यावर संताप
- पुणे: पुण्यात पाण्याची नासाडी केल्यास थेट १० हजारांपर्यंत दंड; वॉशिंग सेंटर, जलतरण तलाव आणि बांधकामांसाठी पाणी वापरावर कडक निर्बंध
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: सणासुदीचे दिवस सुरू, व्यापाऱ्यांच्या कमाईवर पाणी नका फेरू; रामलीला मैदानातील आंदोलनावरून दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना भावनिक आवाहन
- गोवा: वास्कोतील रविवार बाजारात ऐन दिवाळीपूर्वी भीषण आग; १०० हून अधिक दुकाने जळून खाक, व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान
- गोवा: भाजपला पुन्हा सत्तेत आणणे हेच आपले मुख्य लक्ष्य मंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय


























Subscribe to my channel




