परभणी: जिल्ह्यातील पालम शहरातून गणेश विसर्जन करण्यासाठी गोदावरी नदीपात्रात गेलेली दोन लहान मुले व तरुण पाण्यात बुडाल्याची अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथील गोदावरी नदीपात्रात ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे पालम शहरासह संपूर्ण परिसरात मोठी शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
नदीत बुडालेल्या युवकांची नावे मुंजाजी आश्रोबा घोरपडे (वय अंदाजे १७ वर्ष) आणि गजानन रामदास घोरपडे (वय अंदाजे २० वर्ष, दोन्ही रा. पालम) अशी आहेत. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हे दोघे युवक पालम शहरातून आपल्या गणेश मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांसोबत श्रींची मूर्ती विसर्जित करण्यासाठी धानोरा काळे येथील गोदावरी नदीच्या घाटावर गेले होते. धानोरा काळे येथील नदीवरील पुलावरून श्रींची मूर्ती पाण्यात सोडत असताना, अचानक पाय घसरून हे दोन्ही तरुण थेट नदीच्या प्रवाहात खाली पडले.
या दोन्ही मुलांना डोळ्यांसमोर पाण्यात पडताना पाहताच, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर तीन ते चार साहसी युवकांनी त्यांना वाचवण्यासाठी तात्काळ कोणतीही भीती न बाळगता पाण्यात उड्या घेतल्या. मात्र, पाण्याचा प्रवाह आणि खोली जास्त असल्यामुळे शोध घेऊनही त्या युवकांना दोन्ही मुले पाण्यात कुठेही सापडली नाहीत. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि प्रशासनाने तातडीने धाव घेतली.
या दोन्ही युवकांचा शोध घेण्यासाठी रात्री ९:३० वाजेपर्यंत युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. प्रशासनाकडून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाला (NDRF) देखील पाचारण करण्यात आले होते; मात्र निर्धारित वेळेत एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचू शकले नव्हते. रात्री ९:१५ वाजेपर्यंतही मदत पथक पोहोचले नसल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पालम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आदित्यकुमार लोणीकर हे आपल्या ताफ्यासह व पोलीस कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत स्थानिक गोताखोरांच्या मदतीने मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू ठेवले.
दरम्यान, अशा प्रकारच्या सार्वजनिक व धार्मिक सणांच्या वेळी उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालम शहरातील स्थानिक प्रशासनाकडे किंवा शासकीय यंत्रणेकडे कोणतीही ठोस पूर्वतयारी किंवा पुरेशी व्यवस्था नसल्याचा गंभीर आरोप संतप्त नागरिकांकडून केला जात आहे. आपत्कालीन मदतीसाठी पालम नगरपंचायत, तहसील कार्यालय तसेच गंगाखेड येथील नगरपालिका आणि इतर यंत्रणेकडे तातडीने मदत मागविण्यात आली होती. परंतु, गंगाखेड येथे आधीच मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त आणि नगरपालिकेचे कर्मचारी इतरत्र गुंतले असल्याचा निरोप मिळाल्याची माहिती पोलीस निरीक्षक आदित्यकुमार लोणीकर यांनी दिली.
या दुर्घटनेत प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत आणि एनडीआरएफच्या उशीरा पोहोचण्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत गोदावरी नदीपात्रात बेपत्ता झालेल्या दोन्ही युवकांचा शोध घेण्याचे काम सुरूच होते, परंतु अंधारामुळे व कठीण परिस्थितीमुळे बचावकार्यात मोठे अडथळे निर्माण झाले. गणेशोत्सवाच्या आनंदावर या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परभणी जिल्ह्यात काळे सावट पसरले आहे.
शहर
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
- पुणे: कापलेली लिंबे, छायाचित्रांचे तुकडे अन् अनेक प्रश्न..! पिंपरी पेंढारमधील गूढ घटनेने परिसरात उडाली खळबळ!
- नाशिक: सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी; नाशिक महापालिकेने मागितले तब्बल ७,३७० दशलक्ष घनफूट (सुमारे ८ टीएमसी) पाणी आरक्षण!
महाराष्ट्र
- पुणे: 'भारती विद्यापीठ'च्या विद्यार्थिनीची उत्तुंग भरारी; सिद्धी गावडेची राज्यस्तरीय 'एनएसएस' प्रजासत्ताक दिन पूर्व-संचलन शिबिरात यशस्वी कामगिरी!
- जळगाव: न्यायाची दारे ग्रामीण जनतेसाठी खुली! ॲड. अनिकेत निकम यांच्या 'न्याय विश्वास फाउंडेशन'ची ५००० हून अधिक नागरिकांना मोफत कायदेशीर मदत!
- नांदेड: डोळ्यांदेखत कारसह पत्नी वाहून गेली! नांदेडमध्ये बहादरपुरा पुलावरून कार थेट नदीत कोसळली; पती बचावला, पत्नीचा शोध सुरू!
- मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
गुन्हा
- हिंगोली: रागाने केला घात, ५ महिन्यांतच संसाराचा अंत; गर्भवती पत्नीला ठेचून मारले अन् स्वतःलाही संपवलं!
- पुणे: पिंपरी-चिंचवड हादरले! कौटुंबिक वादातून पतीने साथीदारांच्या मदतीने केली पत्नीची नृशंस हत्या; ओळख पटू नये म्हणून चेहरा विद्रूप, २४ तासांत ४ संशयितांना अटक!
- पुणे: नातीशी गैरवर्तन केल्याच्या गुन्ह्यात अडकलेल्या ५८ वर्षीय आजोबांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठासा दिलासा; जामीन मंजूर!
- पुणेः संतापजनक प्रकार! फ्लॅट खरेदीसाठी आणि माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तूप-तूप छळ; अखेर विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल, पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: "मी सर्वोच्च न्यायालयाची दहादा माफी मागतो..."सरन्यायाधीशांच्या टिप्पणीनंतर खासदार संजय राऊतांनी मागितली माफी!
- उत्तर प्रदेश: भाजपाचा सपाला मोठा धक्का; तीन बक्षीसघाती बंडखोर आमदारांनी हाती धरले कमळ!
- नवी दिल्ली: "पंतप्रधान नरेंद्र मोदींचे १० वेळा फोन आले, पण मी उचललेच नाही"; ओडिशाचे नवीन राज्यपाल ब्रजमोहन राम यांचा मोठा खुलासा!
- नवी दिल्ली: ५ महिन्यांत ३ केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामा सत्र; दोघांना तर पुन्हा संधी मिळणेही कठीण, नेमका काय आहे भाजपचा प्लॅन?



























Subscribe to my channel





Finally found a site that actually works smoothly. The login process is super fast and I didn’t encounter any glitches. Definitely a top choice for anyone looking for a reliable experience. Check out youwinlogin