Team India Super 8 Schedule T20 WC 2026Image Credit source: @akshar2026 X Account
आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 32 व्या सामन्यात बी ग्रुपमधील आयर्लंड विरुद्ध झिंबाब्वे आमनेसामने होते. या सामन्याचं आयोजन हे श्रीलंकेतील पल्लेकेले स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. मात्र पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणं अपेक्षित होतं. मात्र पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे तब्बल पावणे 3 तासांचा खेळ वाया गेला. तसेच त्यानंतरही सामना होण्यासारखी स्थिती नव्हती. त्यामुळे पंचांनी परिस्थिती पाहता दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आयसीसीने सामना पावसामुळे रद्द करण्यात आल्याचं जाहीर केलं.
झिंबाब्वेची सुपर 8 मध्ये धडक
उभयसंघातील सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात आला. झिंबाब्वेने याआधी खेळलेले दोन्ही सामने जिंकले होते. झिंबाब्वेचे 1 गुणासह एकूण 5 पॉइंट्स झाले. झिंबाब्वेने यासह सुपर 8 मध्ये धडक दिली. तर सामना रद्द झाल्याने आयर्लंडसह चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचंही साखळी फेरीतूनच पॅकअप झालं.
झिंबाब्वे सुपर 8 मध्ये पोहचणारी सातवी टीम ठरली. यासह गतविजेत्या भारतीय संघाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यांचं चित्र स्पष्ट झालं. टीम इंडिया सुपर 8 फेरीत एकूण 3 सामने खेळणार आहे. टीम इंडियासमोर या 3 सामन्यांत कुणाचं आव्हान असणार? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान
टीम इंडियासमोर सुपर 8 फेरीतील आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. सुपर 8 निमित्ताने 2024 मधील अंतिम फेरीतील दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 22 फेब्रुवारीला होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 26 फेब्रुवारीला झिंबाब्वे विरुद्ध 2 हात करणार आहे. तर सूर्यासेनेसमोर सुपर 8 फेरीतील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचं आव्हान असणार आहे. विंडीजने या स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे भारतीय संघ या सामन्यात कशी कामगिरी करते याकडे चाहत्यांचं लक्ष असेल.
टीम इंडियाचं सुपर 8 फेरीतील सामन्यांचं वेळापत्रक
22 फेब्रुवारी, भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका
26 फेब्रुवारी, भारत विरुद्ध झिम्बाब्वे
1 मार्च, भारत विरुद्ध वेस्टइंडिज
शहर
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
- नाशिक: रोड आणि सिडकोत तोतया पोलिसांचा उच्छाद; भरदिवसा नागरिकांना चकमा देत साडेपाच तोळे सोने लांबवले
महाराष्ट्र
- पुणे: परवानगी नाकारली तरीही थाटात पार पडला कार्यक्रम; पुण्यात राधा पाटील, मंडळ अध्यक्षांसह आयोजकांवर पोलिसी बडगा आणि गुन्हा दाखल!
- मुंबई: उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईत मोठा धक्का; ज्येष्ठ नेत्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द!
- नंदुरबार: गावोगावी उभे राहिलेत दोन गट, पक्षात गटबाजीचा आजार..; शिंदेंच्या आमदारानेच उघड केली स्वतःच्या पक्षाची पोलखोल!
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई! सर्व धरणसाठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित; विभागीय आयुक्तांचे वीजपंप जप्त करण्याचे कठोर आदेश
गुन्हा
- अहिल्यानगर: आंतरजातीय विवाहाला घरच्यांचा विरोध होईल या टोकाच्या भीतीतून प्रेमीयुगुलाचा विहिरीत उडी मारून करुण अंत
- धाराशिव: नळदुर्ग किल्ल्यावर मन हेलावणारी दुर्घटना; राष्ट्रीय स्तरावरील कुस्तीपटू मातेने तीन चिमुकल्यांसह मारली दरीत उडी, मायलेकांचा मृत्यू!
- अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!
- कोल्हापूर: पन्हाळा तालुक्यातील काखे येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून विवाहितेचा भरदिवसा अंगणात निर्घृण खून!
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
- आजचे राशिभविष्य ३ सप्टेंबर २०२६: या राशींवर असणार स्वामींची कृपा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद, पहा तुमचे भाग्य!
- आजचे राशिभविष्य २९ ऑगस्ट २०२६: या ४ राशींसाठी ग्रहांची स्थिती अशुभ, सतर्क राहण्याचा सल्ला; वाचा सविस्तर भविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: गृह मंत्रालयासोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर छेडणार भव्य आंदोलन; प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांचा केंद्र सरकारला स्पष्ट इशारा
- नेपाळ: महाप्रळयानंतर तब्बल ११ दिवसांनी ढिगाऱ्याखालून महिलेला वाचवले; थरारक बचावाचा व्हिडिओ व्हायरल
- नवी दिल्ली: प्रधानमंत्री किसान योजना शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत
- नवी दिल्ली: समजा, मी तुमचा विद्यार्थी आहे, मला..पंतप्रधानांच्या प्रश्नावर शिक्षिकेचं उत्तर अन् एकच हशा पिकला

























Subscribe to my channel




