पुणे: कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असतानाच, या अर्धवट आणि नियोजनशून्य कामामुळे आता परिसरातील पाणीपुरवठ्याचे तीन-तेरा वाजले आहेत. रस्त्याच्या कामादरम्यान वारंवार जलवाहिन्या फुटत असल्यामुळे या संपूर्ण परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
कात्रज-कोंढवा रस्त्यावरील रुंदीकरणाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असून, प्रशासनाच्या या नियोजनशून्य कारभारामुळे आतापर्यंत तब्बल २१ निष्पाप नागरिकांचा रस्ते अपघातांमध्ये बळी गेला आहे. त्यातच आता या रखडलेल्या विकासकामांचा ताण परिसरातील मूलभूत सुविधांवर पडत आहे. रस्त्याच्या खोदकामामुळे व इतर कामांमुळे मुख्य जलवाहिन्या वारंवार क्षतिग्रस्त होत आहेत, ज्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
या समस्येमुळे अनेक भागांत पाण्याचा थेंबही मिळत नाही, तर काही ठिकाणी अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. अनेक सोसायट्यांमध्ये आणि इमारतींमध्ये, विशेषतः वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नागरिकांपर्यंत पाणी पोहोचतच नाही. काही भागात आठवड्यातून एकदा किंवा अत्यंत अनियमित वेळेत पाणी सोडले जात असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः नोकरदार वर्ग आणि महिला वर्गाची यामुळे प्रचंड कोंडी होते. दिवसा पाण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने, कामावर गेल्यानंतर पाणी आले तर ते भरून कोण ठेवणार, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
घरात पिण्यासाठी आणि दैनंदिन वापरासाठीही पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिक पूर्णपणे हतबल झाले आहेत. महानगरपालिका प्रशासनाकडून वारंवार जलवाहिन्या दुरुस्त केल्या जात असल्या तरी, यावर कोणताही शाश्वत आणि कायमस्वरूपी उपाय काढण्यात आलेला नाही. परिणामी, नागरिकांना नाइलाजास्तव विकतचे पाणी आणि खाजगी टँकर मागवावे लागत आहेत. टँकरवर आणि पिण्याच्या पाण्यासाठी होणारा अतिरिक्त आर्थिक खर्च किती दिवस सहन करायचा, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत असून प्रशासनाच्या या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे.
शहर
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
- मुंबई: कचऱ्यावर प्रक्रियेसाठी मध्य रेल्वे उभारणार पाच केंद्रे; वाडीबंदर, एलटीटी, पनवेल, कल्याण, इगतपुरीत प्रकल्प
- पुणे: कुंडमळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलाचा इंद्रायणी नदीत बुडून मृत्यू
- पुणे: धायरीत आरएमसी प्लांटवर कारवाईचा दिखावा..! फक्त पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच
महाराष्ट्र
- नाशिक: मालेगाव तालुक्यात भीषण चारा टंचाई: केवळ ९५ दिवसांचा चारा शिल्लक, अडीच लाखांहून अधिक पशुधनाचे अस्तित्व धोक्यात
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
- कोल्हापुर: ऊस दराची कोंडी फुटणार? कारखानदार आणि शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची आज महत्त्वाची बैठक
- मुंबई: आदिवासी आणि रहिवाशांचे त्याच परिसरात पुनर्वसन करा; बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघटनेची आक्रमक मागणी
गुन्हा
- नाशिक: प्रेयसीचा दुरावा अन् आर्थिक छळाला कंटाळून २८ वर्षीय इंजिनीअर तरुणाची आत्महत्या; सुसाईड नोटमुळे पोलीस चक्रावले, चौघांवर गुन्हा दाखल
- रायगड: सिडकोच्या कारवाईच्या धसक्याने बाळू कांबडे यांचा मृत्यू खारघरच्या बेलपाडा आदिवासीवाडीतील अत्यंत दुर्दैवी घटनेने संताप!
- जालना: दारूच्या नशेत आई-वडिलांना मारहाण करणाऱ्या मोठ्या भावाला झोपेतच संपवले; लहान भावाने कुऱ्हाड चालवून केला खून!
- मुंबई: पत्नीसोबतच्या भांडणातून नराधम बापाने अवघ्या ९ महिन्यांच्या चिमुकल्याला स्कायवॉकवरून खाली फेकले; घाटकोपरमधील अंगावर काटा आणणारी घटना
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- बिहार: विधानपरिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का! पाटणा शिक्षक मतदारसंघात ३ दशकांची वर्चस्वाची परंपरा खंडित करत आरजेडीचा दणदणीत विजय
- गोवा: विक्रोळीतील २१ वर्षीय विद्यार्थी कुशाग्र पटालेचा दुचाकी-टॅक्सी अपघातात दुर्दैवी मृत्यू!
- नवी दिल्ली: काँग्रेसशासित कर्नाटकात खळबळ: एसआयआर (SIR) प्रक्रियेनंतर अंतिम मतदार यादी जाहीर, तब्बल १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळली!
- गोवा: भाजप अध्यक्ष नितीन नबीन दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर; बैठकांचा धडाका लावत मंत्री, आमदार आणि कार्यकर्त्यांना दिले महत्त्वाचे मार्गदर्शन!



























Subscribe to my channel




