T20 World Cup 2026 Super 8 : T20 वर्ल्ड कप 2026 मध्ये टीम इंडियाने आतापर्यंत दमदार प्रदर्शन केलय. सलग चार विजयांसह टीम सुपर-8 मध्ये पोहोचली आहे. टीम इंडिया ग्रुप-1 चा भाग आहे. सुपर 8 राऊंडला सुरुवात होण्याआधीच टीम इंडियाची ग्रुप 1 मध्ये खूप चर्चा आहे. कारण याला ग्रुप ऑफ डेथ सुद्धा म्हटलं जातं. या ग्रुपमध्ये भारताशिवाय दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या टीम आहेत. या सर्व टीम्स सतत चांगलं प्रदर्शन करतायत.
ग्रुप 1 मधील चारही संघ ग्रुप स्टेजमध्ये एकही मॅच न हरता सुपर-8 मध्ये पोहोचल्या आहेत. भारताने ग्रुप A मध्ये पाकिस्तान, अमेरिका, नेदलँड्स आणि नामीबिया या टीम्सना हरवून टॉपमध्ये जागा बनवलीय. दक्षिण आफ्रिकेने ग्रुप डी मध्ये सर्व मॅच जिंकल्या आहेत. वेस्ट इंडिजने ग्रुप C सलग चार सामने जिंकलेत. झिम्बाब्वे ग्रुप बी मध्ये तीन विजय आणि एका ड्रॉ सह अजिंक्य आहे. या टीमच्या अजेय रेकॉर्डने या ग्रुपला सर्वात कठीण बनवलय. सर्व मजबूत संघ एकाच ग्रुपमध्ये असतील, तर त्याला ग्रुप ऑफ डेथ म्हटलं जातं.
टीम इंडियासाठी सेमीफायनलचा मार्ग कठीण
सेमीफायनल गाठण्यासाठी प्रत्येक टीमचा हा विजयी सिलसिला कायम राखण्याचा प्रयत्न असेल. भारतासाठी हा प्रवास सोपा नसेल. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे मजबूत संघ असून चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. टीम इंडियाला वेस्ट इंडिज विरुद्ध जिंकण्यासाठी इतिहास बदलावा लागेल. भारतीय टीमने टी 20 वर्ल्ड कपमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध आतापर्यंत एकदाच विजय मिळवला आहे. दोन्ही टीम्स चारवेळा आमने-सामने आल्या आहेत. तीनवेळा भारतीय टीमला पराभवाचा सामना करावा लागलाय. अशा स्थितीत टीम इंडियासाठी सेमीफायनलचा मार्ग अजून कठीण बनलाय.
सुपर-8 च्या ग्रुप 1 मधील सामने
22 फेब्रुवारी : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रीका
23 फेब्रुवारी : झिम्बाब्वे विरुद्ध वेस्टइंडीज
26 फेब्रुवारी : वेस्टइंडीज विरुद्ध दक्षिण आफ्रिका
26 फेब्रुवारी : भारत विरुद्ध झिम्बाब्वे
1 मार्च : झिम्बाब्वे विरुद्ध दक्षिण आफ्रिका
1 मार्च : भारत विरुद्ध वेस्टइंडीज
ग्रुप-2 मध्ये या टीम्समध्ये टक्कर
सुपर-8 राऊड ग्रुप-2 इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या टीम्स आहेत. या चारही टीम्सनी ग्रुप स्टेजमध्ये प्रत्येकी एक सामना गमावलाय.
दुसरीकडे सुपर-8 राऊंड सर्व टीम्स आपल्या ग्रुपच्या बाकी टीम्ससोबत एक-एक सामना खेळतील. यानंतर दोन्ही ग्रुपची टॉप-2 टीम्स सेमीफायनलमध्ये क्वालिफाय करतील.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- पुणे: ज्येष्ठ विचारवंत, राजकीय विश्लेषक व काँग्रेसचे निष्ठावान नेते डॉ. रत्नाकर महाजन यांचे पुण्यात निधन; पुरोगामी चळवळीचा अभ्यासू चेहरा हरपला
महाराष्ट्र
- रत्नागिरी: कोकणातील अंगावर काटा आणणारी वास्तवता! राजापूर तालुक्यातील सागवे वाडपवाडीत मृतदेह नेण्यासाठी ग्रामस्थांना चक्क पात्रातून काढावा लागतोय पायी रस्ता
- सातारा: देशसेवेदरम्यान शहीद झालेले वीर जवान रोहित पवार यांच्यावर साताऱ्यातील चिंचणी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; साऱ्यांचे डोळे झाले पाणावले
- रत्नागिरी: कोकण किनारपट्टीवर आजपासून वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी
- छत्रपती संभाजीनगर: काळीज पिळवटणारी घटना! घरी बनवलेली खिचडी खाल्ल्याने विषबाधा होऊन २४ तासांत लहान भाऊ अन् बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू
गुन्हा
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
- हिंगोली: तू पोलिसांना टिप का देतोस? खबरी असल्याच्या संशयातून वसमतमध्ये २२ वर्षीय तरुणाची विटा-दगडने ठेचून निर्घृण हत्या
- पुणे: बारामतीत खळबळ! झुंबा डान्स क्लासवर कारवाई न करण्यासाठी ५ लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य ९ सप्टेंबर २०२६: सिंह राशीतील चंद्र गोचरमुळे ‘डबल धमाका’ आणि मालमत्ता वाढीचे योग!
- आजचे राशिभविष्य ७ सप्टेंबर २०२६ : शेवटचा श्रावणी सोमवार या राशींसाठी ठरणार भाग्यशाली, शिवकृपा लाभणार!
- आजचे राशिभविष्य ५ सप्टेंबर २०२६ दहीहंडी विशेष: चंद्र-मंगळ योगामुळे या राशींना मिळणार प्रचंड धनलाभ आणि करिअरमध्ये यश!
- आजचे राशिभविष्य 4 सप्टेंबर 2026 : जन्माष्टमीच्या दिवशी ग्रहांचा शुभ संयोग या राशींसाठी नशीब बदलवणारा, श्रीकृष्णाची मिळणार कृपा !
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- दिल्ली: देशातून जातीव्यवस्था समूळ नष्ट करा, आम्ही स्वतःहून आरक्षण सोडायला तयार आहोत; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचे मोठे विधान
- नवी दिल्ली: राहुल गांधींच्या खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण; न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले न्यायालयासमोर सगळे समान आहेत, कोणीही श्रेष्ठ नाही
- उत्तर प्रदेश: प्रशासकीय हलगर्जीपणाचा कळस! उत्तर प्रदेशमधील पूरग्रस्त भागात मदत म्हणून वाटले एक्स्पायर्ड कफ सिरप, लहान मुलांची प्रकृती बिघडली
- तमिळनाडू: टीव्हीकेचे नेते विजय यांच्या सरकारसमोर मोठे राजकीय संकट, विरोधकांचे सरकार कोसळण्याचे भाकीत आणि नव्या समीकरणांची चर्चा


























Subscribe to my channel



