सातारा: एक अत्यंत खळबळजनक, थरारक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सातारा शहरातील खंडोबाचा माळ परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एका मुजोर रिक्षाचालकाने कारवाई करत असलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या अंगावर काटा आणणाऱ्या घटनेमुळे सातारा शहर आणि पोलीस दलात तीव्र संताप व्यक्त होत असून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सातारा शहरातील गजबजलेल्या खंडोबाचा माळ परिसरात वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री जाधव या आपली नियमित ड्युटी बजावत होत्या. दरम्यान, परिसरात वाहतूक नियम मोडणाऱ्या एका रिक्षाचालकाला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आणि कारवाई टाळण्याच्या उद्देशाने मुजोर रिक्षाचालकाने आपली रिक्षा न थांबवता भरधाव वेगाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री जाधव यांनी रिक्षा चालकाला रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्या रिक्षाच्या अडकल्या. तरीही न जुमानता त्या निर्दयी रिक्षाचालकाने रिक्षा न थांबवता ती तशीच भरधाव पुढे पळवली. या अंगावर काटा आणणाऱ्या प्रकारात महिला पोलिसाला तब्बल २०० मीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेण्यात आले. या भयानक घटनेमुळे रस्त्यावर उपस्थित इतर नागरिकांची आणि वाहनचालकांची तारांबळ उडाली आणि मोठा गोंधळ उडाला.
या भीषण घटनेत महिला पोलीस कर्मचारी भाग्यश्री जाधव या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या हाताला व पायाला तसेच शरीराला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी व स्थानिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिला पोलिसाला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरू केले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
या घटनेची गंभीर दखल घेत सातारा शहर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्या मुजोर आणि अरेरावी करणाऱ्या रिक्षाचालकाला हुकूमशाहीच्या मुसक्या आवळत ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि महिला पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी कठोर कायदेशीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साताऱ्यात पोलिसांवरच अशा प्रकारे प्राणघातक हल्ले होण्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
शहर
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- मुंबई: मनोज जरांगे पाटलांच्या ५०० कोटींच्या ऑडिओ क्लिप प्रकरणावरून शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सखोल चौकशीची मागणी
- मुंबई: उच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निर्देश: राज्यातील सर्व समुद्रकिनाऱ्यांवर जीवरक्षक आणि चेतावणी फलक बंधनकारक करण्याचे आदेश
महाराष्ट्र
- मुंबई: सीएसएमटी रेल्वे स्थानकावर बुकिंग हॉलजवळ छताचा भाग कोसळला; दुर्घटनेत दोन प्रवासी जखमी, सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू
- मुंबई: विद्यार्थ्यांपाठोपाठ आता शिक्षकांवरही डिजिटल वॉच राज्यातील शाळांमधील शिक्षकांसाठी 'स्वित्चॅट' ॲपद्वारे ऑनलाईन उपस्थिती अनिवार्य
- नाशिक: साक्षी चांडक देशात पहिली सीए इंटरमीडिएट परीक्षेत ५०२ गुणांसह ऑल इंडिया रँक १ मिळवत घडवला ऐतिहासिक इतिहास
- रत्नागिरी: जिल्ह्याला दुष्काळाचा भीषण फटका १२ हजार ८५० हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४३ हजारांहून अधिक शेतकरी संकटात
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
- आजचे राशिभविष्य: ८ ऑक्टोबर २०२६ रोजी दत्तगुरूंची कृपा आणि हंस राजयोगाचा मिळणार या राशींना लाभ!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली: परिसीमन विधेयकासाठी भाजपची मोठी चाल इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या पक्षाला सोबत घेण्याची तयारी
- नवी दिल्ली: ३० वर्षे तरी तुमचा नंबर लागत नाही, तुम्ही आता परदेशात आहात... केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची राहुल गांधींवर जोरदार टीका!



























Subscribe to my channel




