Shocking Crime: Same-Sex Love Found on Instagram Turns Fatal; Man Slits Friend's Throat After Marriage Refusal!

धक्कादायक! सोशल मीडियावर जुळले समलैंगिक प्रेम; लग्नाला नकार दिल्याने मित्राचा गळा चिरून निर्घूण खून!"

Shocking Crime: Same-Sex Love Found on Instagram Turns Fatal; Man Slits Friend's Throat After Marriage Refusal!

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली-जारावंडी मार्गावर एका ३२ वर्षीय तरुणाचा गळा चिरून निर्घूण खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली मैत्री आणि त्यातून निर्माण झालेले समलैंगिक प्रेम एका हिंसक वळणावर संपल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकी घटना काय?

मृत तरुणाचे नाव सतीशकुमार जगदीशप्रकाश निसाद (वय ३२, रा. नागेपल्ली, ता. अहेरी) असे आहे, तर आरोपीचे नाव सूरज हलदार (वय ३०, रा. मिरगन, जि. नबरंगपूर, ओडिशा) असे आहे. सतीशकुमार हा नागेपल्ली येथे गॅरेज व्यवसायात कार्यरत होता. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतीशकुमारची ओळख ओडिशामधील सूरज हलदारशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर लवकरच मैत्रीत आणि पुढे समलैंगिक प्रेमात झाले.

हत्येचे कारण:

दोघांमधील हे समलैंगिक संबंध काही काळ सुरळीत सुरू होते. मात्र, कालांतराने सतीशकुमार विवाहित असल्याचे आरोपीला समजले. यामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले. आरोपी सूरजचा सतीशकुमारवर लग्नासाठी दबाव होता, मात्र सतीशकुमारने त्याला स्पष्ट नकार दिला. या कारणावरून ३१ मे रोजी सकाळी त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. रागाच्या भरात आरोपी सूरजने सोबत आणलेल्या चाकूने सतीशकुमारवर सपासप वार केले आणि त्यानंतर त्याचा गळा चिरला. यामध्ये सतीशकुमारचा जागीच मृत्यू झाला.

पोलीस कारवाई:

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी सूरज हलदार याला या खुनाच्या आरोपाखाली अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

 

सविस्तर वाचा, लिंक कमेंट मध्ये:https://punenews24.in/



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *