नेपाळ क्रिकेट टीमने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील आपल्या मोहिमेचा जबरदस्त असा शेवट केला आहे. नेपाळने स्कॉटलंडवर दणदणीत असा विजय साकारला आहे. नेपाळला या स्पर्धेत आपल्या साखळी फेरीतील पहिल्या 3 सामन्यांत सलग पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे चाहत्यांना विजयाची प्रतिक्षा कायम होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही प्रतिक्षा साखळी फेरीत आपल्या शेवटच्या सामन्यात पूर्ण केली. नेपाळ यासह अपेक्षेप्रमाणे शेवटचा सामना जिंकण्यात यशस्वी ठरली. दीपेंद्र सिह ऐरी आणि कुशल भुर्टेल या जोडीने नेपाळच्या विजयात बॅटिंगने प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यात नक्की काय झालं? हे सविस्तर जाणनू घेऊयात.
नेपाळने वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंड संघाला या स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात चांगलंच झुंजवलं होतं. मात्र नेपाळचा इंग्लंड विरुद्ध निसटता पराभव झाला. नेपाळला अवघ्या 4 धावांनी सामना गमवावा लागला होता. इंग्लंड या विजयामुळे मोठ्या उलटफेरपासून वाचली. मात्र इंग्लंडच्या विजयापेक्षा नेपाळच्या पराभवाची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळाली. अवघ्या काही धावांनी हा सामना गमावल्याने नेपाळ टीमला आणि चाहत्यांना हा पराभव जिव्हारी लागला होता. मात्र नेपाळने इंग्लंड विरुद्ध आपली कामगिरी दाखवून क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं.
नेपाळला त्यानंतर इटली आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांकडून मोठ्या फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना टीमने साखळी फेरीतील आपल्या मोहिमेचा शेवट विजयाने करावा अशी इच्छा होती. नेपाळ टीमने चाहत्यांची ही इच्छा पूर्ण केली आणि जबरदस्त असा विजय मिळवला. नेपाळने मुंबईतील ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियममध्ये स्कॉटलंडला पराभूत केलं. नेपाळने यासह वर्ल्ड कप स्पर्धेत 12 वर्षांची विजयाची प्रतिक्षा संपवली. नेपाळने स्कॉटलंडला पराभूत करुन 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली आहे. नेपाळने याआधी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत 2014 साली शेवटचा विजय मिळवला होता.
सामन्याचा झटपट आढावा
मायकल जॉन्स याने केलेल्या 71 धावांच्या जोरावर स्कॉटलंडने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमवून 170 धावा केल्या. नेपाळने प्रत्युत्तरात 171 धावांचा पाठलाग करताना कडक सुरुवात केली. कुशल भुर्टेल आणि आसिफ शेख या सलामी जोडीने नेपाळला झंझावाती सुरुवात करुन दिली. दोघांनी आलेला प्रत्येक बॉल मारला आणि नेपाळला वेगवान सुरुवात करुन देण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 55 बॉलमध्ये 74 रन्सची पार्टनरशीप केली. कुशल आऊट झाल्याने नेपाळला पहिला झटका लागला. कुशलने 43 धावा केल्या. त्यानंतर स्कॉटलंडने आसिफ शेख आणि कॅप्टन रोहित पौडेल या दोघांना ठराविक अंतराने आऊट केलं. आसिफने 33 तर रोहितने 16 धावा केल्या. त्यामुळे नेपाळची 13.2 ओव्हरमध्ये 3 आऊट 98 अशी स्थिती झाली होती.
गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरीची विजयी भागीदारी
त्यानंतर गुलशन झा आणि दीपेंद्र सिंह ऐरी या जोडीने कमाल केली. गुलशन आणि दीपेंद्र या दोघांनी फक्त 36 चेंडूत नाबाद 73 धावांची भागीदारी केली. दीपेंद्रने या भागीदारीत सर्वाधिक योगदान दिलं. दींपेंद्रने स्कॉलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. दीपेंद्रने मोठे फटके मारले. त्यामुळे नेपाळच्या चाहत्यांना स्टेडियममध्ये एकच जल्लोष केला. तसेच गुलशननेही दीपेंद्रला चांगली साथ दिली. दीपेंद्र आणि गुलशन या दोघांनी फटेकबाजी करुन नेपाळला सुरक्षित असा विजय मिळवून दिला. नेपाळने 4 बॉलआधी 7 विकेट्स राखून हा सामना आपल्या नावावर केला. नेपाळने 19.2 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 171 रन्स केल्या. गुलशनने 24 आणि दीपेंद्रने नाबाद 50 धावा केल्या. दीपेंद्रला त्याच्या या नाबाद अर्धशतकी खेळीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




