Sanjay Raut : १५००, ५०० अन् आता लाडकींची किंमत ०, लाडकी बहीण योजनेबाबत दावा करत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

Sanjay Raut : राज्यात गाजत असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही योजना राज्यभरात गाजली. पण आता सरकारकडून लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी करण्यात येत आहे. तसेच काही निकष लागू केले आहेत. या योजनेअंतर्गत यापूर्वी १५०० रूपये मिळणाऱ्या काही महिलांना आता केवळ ५०० रूपये दिले जाणार आहेत. या बदलावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. लाडक्या बहिणींच्या मतांची किंमत शून्य होईल, असे राऊत म्हणालेत.

'८ लाख लाडक्या बहिणींना आता १५०० रूपयांवरून फक्त ५०० रूपये देण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींकडून १५०० रूपयांच्या बदल्यात सत्ताधाऱ्यांनी मतं विकत घेतली. त्या मतांची किंमत आता ५०० वर आली आहे. उद्या त्याची किंमत शून्य होईल.

Accident News : पेट्रोलच्या टँकरला अपघात, वाऱ्यासारखी खबर पसरली; मिळेल ते भांडं घेऊन गावकरी पोहचले, पेट्रोल भरण्यासाठी एकच झुंबड

महाराष्ट्र या राज्याची आर्थिक परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. सरकारकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कितीही आव आणला तरी, हे राज्य चालवणं आता आर्थिकदृष्ट्या सोपं राहिलेलं नाही.

गेल्या साडेतीन वर्षांमध्ये या राज्याची आर्थिक शिस्त पूर्णपणे बिघडल्याचे चित्र आहे. हे राज्य आता आर्थिक अराजकाच्या खाईमध्ये सापडलंय. मी आणि अजित पवार बोलत जरी नसलो तरी, ते देखील चिंतेने ग्रासले आहेत, असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे तक्रार केली. अजित पवार आमच्या फाईली मंजूर ते करत नाही. आम्हाला निधी देत नाहीत. आम्हाला निधी देत नाही, म्हणजे नेमकं कुणाला? असा प्रश्न आम्हाला पडतो. तुमचे सोबत जे किती ५ - २५ आमदार आहेत, ते सगळे गद्दार आहेत. ते फक्त पैसे आणि निधीसाठी तुमच्यासोबत आहेत. त्यांना फक्त राज्य लुटायचे आहे, आणि या राज्याची तिजोरी लुटण्याची परवानगी त्यांना हवी आहे का? असा खोचक सवालही राऊत यांनी उपस्थित केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply