
Nandurbar : बदलापूर येथील घटनेबाबत राज्यभर संतापाची लाट उसळली होती. हे प्रकरण ताजे असतानाच नंदुरबारमध्ये एका नामांकित शाळेत पाचवीत शिकणाऱ्या १० वर्षीय मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवण्याचा प्रकरण उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेतील कंत्राटी सफाई कामगाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून. त्याला अटक करण्यात आली आहे. तसेच या घटनेमुळे शाळेची बदनामी होईल म्हणून पालकांना गुन्हा दाखल करण्यासाठी मज्जाव केल्याप्रकरणी हायस्कूलचे चेअरमन व शाळेच्या मुख्याध्यापिका यांच्याविरुद्धही नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार घडल्याची घटना घडली होती. त्यानंतर राज्यभर त्याबाबत तीव्र पडसाद उमटले. असाच काहीसा प्रकार नंदुरबार शहरातील एका नामांकित हायस्कूलमध्ये उघड झाला आहे. या संस्थेत कंत्राटी सफाई कामगार म्हणून राजू मुन्सी (वय ५०) काम करीत होता. २७ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वाअकरा वाजेदरम्यान या सफाई कर्मचाऱ्याने शाळेतील पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीला ''मोबाईल मधील नेट सुरु करून दे'', असं सांगत ग्रंथालयात घेऊन जाऊन अश्लील व्हिडिओ दाखवले.
|
|
त्यानंतर विद्यार्थिनी घाबरून त्या ठिकाणाहून पळून गेली. तिने घडलेली हकीकत रात्री पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी दुसऱ्या दिवशी नंदुरबार शहर पोलीस ठाणे गाठत फिर्याद दाखल केली. पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून कंत्राटी सफाई कामगार राजू मुन्सी याच्याविरुद्ध भा.न्या.सं. २०२३ चे कलम ७५ (३) सह लैगिंक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२चे कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेत संशयित आरोपी राजू मुन्सी याला अटक करण्यात आली. पोलीस ठाण्यात असताना संशयित आरोपी याच्या छातीत दुखत असल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले.
मुख्याध्यापिका आणि चेअरमनविरुद्ध गुन्हा दाखल
नंदुरबार येथील एका नामांकित हायस्कूलमध्ये ही घटना घडल्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी संबंधित बाब शाळा व्यवस्थापनाच्या निदर्शनास आणून दिली. मात्र शाळेने तात्काळ कारवाई न करता फिर्याद दाखल केल्यास शाळेची तसेच मुलीची बदनामी होईल असे सांगत फिर्याद देण्यास मज्जाव केला. त्यामुळे नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात संस्थेचे चेअरमन डॉक्टर योगेश देसाई तसेच मुख्याध्यापिका सुष्मा शहा यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेची माहिती मिळताच अनेक पालक पोलीस ठाणे परिसरात दाखल झाले.
सफाई कर्मचाऱ्याला कामावरून काढले
विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी त्याला शाळा व्यवस्थापनाने कामावरून काढले आहे. शाळा परिसर मोठा असल्याने साफसफाई करण्यासाठी कंत्राटी सफाई कामगाराची नियुक्ती करण्यात आली होती. या घटनेच्या कायदेशीर कारवाईसाठी संस्थेतर्फे पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापिका सुष्मा शहा यांनी सांगितले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




