संजय राऊत, एकनाथ शिंदे, राज ठाकरे Image Credit source: टीव्ही ९ मराठी
Sanjay Raut on Raj Thackeray and DCM Eknath Shinde Meeting: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काल या भेटीचे फोटो सर्वत्र झळकले आणि राजकीय चर्चांना उधाण आले. या सर्व घाडमोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयावर त्यांचे मत मांडले. काय म्हणाले राऊत?
शिंदेवर टीका, तर राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मौन
यावेळी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यांना या भेटीवर प्रश्न विचारला असता तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं त्यावर आमचं बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी यांच्या विरुद्ध आमच टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राशी बेइमानी केली. जे नंदनवन तुम्ही सांगतात ते शिवसेना चोरीतून झालेलं आहे. या भांडणात आमचा जय होईल. या भेटीबाबत मला काही वाटत नाही. मी त्या विषयाकडे पाहत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
शरद पवार राज्यसभेवर?
तर शरद पवार हे राज्यसभेवर जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर राऊत यांनी मत व्यक्त केलं. शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्या पक्षाकडून अजून कोणी जाहीर केलं नाही की आम्ही महाविकास आघाडीत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीत आहेत. एकत्र बसून निर्णय घेऊ. शरद पवार यांनी माझ्या कडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेत इच्छुक आहे. शरद पवार भाजप सोबत जाणार नाही. हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेसने ती भीती बाळगू नये. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. या बद्दल मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा बोललो आहे. एक दोन दिवसात तुम्हाला मत सांगू. महाविकास आघाडी म्हणून ती जागा म्हणून आम्ही लढणार असं ठरलं तर एकत्र बसून चर्चा होईल. राज्यसभेच्या जागेवर कोण जाईल इतर पक्षाचं मत यावर चर्चा होईल असे ते म्हणाले.
[embedded content]
शहर
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
महाराष्ट्र
- मुंबई: "पक्षप्रमुखांचा निर्णय म्हणजे राजकीय पक्षाची इच्छा नाही, असे कसे?"; कपिल सिब्बलांचा सर्वोच्च न्यायालयात थेट सवाल.
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पावसाचा सलग १७ दिवसांचा खंड; खरीप पिके करपण्याच्या वाटेवर, शेतकरी चिंतेत!
- पुणे: फुटपाथ नाही, प्रचंड वाहतूक कोंडी; राजकारण बाजूला ठेवून प्रशासनाने चाकण-हिंजवडीकडे लक्ष द्यावे, आदित्य ठाकरेंची मागणी
- नागपूर: ८६ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेची कंत्राटदारांची देयके रखडली; १८ आणि १९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे व तीव्र आंदोलन
गुन्हा
- कचरा वादातून अमानुष हत्या! कुपवाडमध्ये केसरेकर दाम्पत्याचा मृत्यू, हातोडी-चाकूच्या हल्ल्याने सांगली हादरली
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- पुणे: भोंदू बाबाचे किळसवाणे कृत्य! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण; 'गुरुवर्य' स्वप्नील लांडेवर गुन्हा दाखल
- नाशिक: केमिकल वापरून बनवल्या जात होत्या बनावट नोटा; त्र्यंबकेश्वर मार्गावरील बंगल्यावर पोलिसांचा छापा
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य १४ ऑगस्ट २०२६: श्रावणी शुक्रवारी देवी लक्ष्मीची कृपा आणि मालमत्ता खरेदीचे योग!
- १३ ऑगस्ट २०२६ चे आजचे राशिभविष्य: श्रावण मासाच्या पहिल्या दिवशी कोणावर होणार शिवकृपा
- पंचांग १२ ऑगस्ट २०२६: दीपअमावस्या, बुधादित्य योग, गजकेसरी योग आणि शुभ मुहूर्त
- ८ ऑगस्ट २०२६ चे सविस्तर राशिभविष्य: आज शनीची विशेष कृपा, या राशींचे नशीब चमकणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: फाशीऐवजी विषारी इंजेक्शन देण्याची मागणी; मृत्युदंडाच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल
- अयोध्या: राम मंदिर दान चोरी प्रकरण एसआयटीचा अंतिम अहवाल सादर, माजी पदाधिकारी चंपत राय आणि अनिल मिश्रा यांना क्लीन चिट
- बंगळुरू: कौटुंबिक वादाचे भयानक पर्यवसान; पतीने मारहाण करत पत्नीचा घातला सालेाखा, त्यानंतर स्वतःही संपवले जीवन
- बिहार: गर्दीत अडकलेल्या कॉन्स्टेबलने आत्मरक्षणासाठी AK-47 मधून गोळ्या झाडल्या; सिवान गोळीबार प्रकरणात बिहार सरकारचे सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र

























Subscribe to my channel



