कोल्हापूर: 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' या कंपनीत गुंतवणूक केल्यास तीन ते पाच टक्के परतावा देण्याचे, तसेच १२ महिन्यांनंतर मूळ गुंतवणूक परत करण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
समीर सुभाष नार्वेकर (वय ३६), नेहा समीर नार्वेकर (वय ३६, रा. दोघेही, गिमवी, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) आणि अमित विश्वनाथ बालम (वय ३८, रा. कसाल, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
पोलिसांनी सांगितले की, वीणा नितीन लकडे (वय ४१, रा. पुईखडी, राधानगरी रोड, कोल्हापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून १९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल झाला होता. सुरुवातीला फिर्यादीसह अन्य नऊ गुंतवणूकदारांची मिळून ६४ लाख ९८ हजार ८९७ रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या कंपनीमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या अन्य गुंतवणूकदारांनीही पुढे येऊन तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले होते.
त्यानंतर आणखी गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे तक्रारी केल्याने या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती वाढल्याचे पोलिस तपासातून स्पष्ट झाले आहे. संबंधित कंपनीमध्ये गुंतवणूकदारांनी एकूण ३ कोटी ९२ लाख ६० हजार रुपये गुंतविल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १ कोटी ३८ लाख ७२ हजार ६६१ रुपये परतावा देण्यात आला. मात्र २ कोटी ५३ लाख ८७ हजार ३३९ रुपये परत न केल्याने एवढ्या रकमेची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
पाच टक्क्यांपर्यंत परताव्याचे आमिष
कोल्हापुरातील कावळा नाका, 'टीडब्ल्यूजे लर्निंग सोल्यूशन्स' होते. येथे गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले. नऊ लाख रुपये गुंतविल्यास तीन टक्के परतावा, दहा लाख रुपये गुंतविल्यास चार टक्के आणि २५ लाख रुपये गुंतविल्यास पाच टक्के परतावा, तसेच १२ महिन्यांनंतर गुंतविलेली मूळ रक्कम परत करण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा आरोप आहे. गुंतवणुकीच्या हमीसाठी नोटरी करून देण्याचेही सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
सतरा लाख भरले पण...
फिर्यादी वीणा लकडे यांनी एप्रिल २०२३ ते २१ मार्च २०२५ या कालावधीत बँकेमार्फत कंपनीत १७ लाख रुपये गुंतवले. आश्वासनानुसार परतावा तसेच मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ रक्कम परत करण्यात आली नाही. मार्च २०२५ पासून परतावा बंद करून आर्थिक फसवणूक केली. यामुळे लकडे यांनी पोलिसांत धाव घेतली.
सहापैकी तिघांना अटक
लकडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकूण सहा संशयित आरोपी आहेत. यातील तिघांना अटक झाली आहे. उर्वरित चिन्मय पालकर, विजय पताडे, निखिल सुर्वे हे अजून फरार आहेत, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.
शहर
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
महाराष्ट्र
- पुणे: आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम! निर्गुदसर येथे ब्रिडिंगसाठी आणलेली ६० हजारांची शेळी फस्त, वनविभागाने पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी!
- पुणे: बारामतीत राजकीय भूकंप! सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीत विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगतापांचे बंड, स्वतंत्र पॅनेलची घोषणा केल्याने रंगत वाढली!
- मुंबई: शिवाजी पार्कवर मोठा राडा: कॉकरोच जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांमध्ये जोरदार खडाजंगी, आंदोलनापूर्वीच वातावरण तापले!
- मुंबई: ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचा मोठा गौप्यस्फोट: मनोज जरांगे पाटलांचे आंदोलन म्हणजे नौटंकी, उपोषणाबाबत केले अत्यंत गंभीर आरोप!
गुन्हा
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप

























Subscribe to my channel




