
Pune : पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे हा मार्ग जुना राहावा. पुणे ते चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुका मार्गे संगमनेर, सिन्नर, नाशिक असा जुनाच मार्ग राहावा अशी मागणी आहे. परंतु नव्याने पुणे अहिल्यानगर, शिर्डी - नाशिक अशा मार्गाची घोषणा करण्यात आलेली आहे. त्यामुळे खेड, आंबेगाव, जुन्नर संगमनेर, सिन्नर या तालुक्यातील नागरिकात असंतोष निर्माण झालेला आहे. यासाठी संगमनेर, सिन्नर तालुक्यातही बैठका घेऊन नवीन मार्गाला विरोध दर्शविण्यात आलेला आहे. पुणे, चाकण, खेड, आंबेगाव, जुन्नर, संगमनेर, सिन्नर मार्गे नाशिकला हा मार्ग योग्य आहे कारण या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतीमालाच्या ने आण करण्याला, कंपनीच्या मालाची ने आण करण्याला तसेच आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच संगमनेर, सिन्नर भागाच्या विकासासाठी ही रेल्वे आवश्यक आहे.
असे नागरिकांचे, तसेच व्यावसायिक, उद्योजकांचे म्हणणे आहे या मार्गामुळे चाकण औद्योगिक वसाहतीच्या कंपनीतील मालाची ने आण करण्याला चालना मिळेल. पर्यटनाला चालना मिळेल. याबाबत आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, "पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जुन्या मार्गानेच व्हावा नवीन मार्गाला आमचा तीव्र विरोध आहे यासाठी जनआंदोलन करण्यात येणार आहे. उत्तर पुणे जिल्हा तसेच संगमनेर, सिन्नर भागाच्या विकासासाठी तसेच पर्यटन विकासाला चालना मिळण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे. संगमनेर भागातील हजारो लोक कामासाठी चाकण परिसरात आहेत. या मार्गामुळे त्या लोकांना ये जा करण्यासाठी हा मार्ग आवश्यक आहे.
|
Pune : अपघातांवर अंकुशासाठी पिंपरी-चिंचवडचा अनोखा प्रयोग; प्रत्येक बसमध्ये बसणार ब्रेथ अॅनालायझर |
पुणे नाशिक रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कड, उपाध्यक्ष राजू चौधरी तसेच उद्योजक सुधीर मुंगसे यांनी सांगितले की, "पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा जुन्या मार्गानेच व्हावा. जुना मार्ग हा उत्तर पुणे जिल्हाच्या भागातून तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर भागातून व नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर भागातून जातो त्यामुळे येथील विकासाला चालना मिळेल शेतीमालाची तसेच औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील मालाची ने आण करण्यासाठी तसेच प्रवाशी वाहतुकीसाठी हा रेल्वे मार्ग या भागातून होणे गरजेचे आहे. कारण पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी हा एक पर्याय आहे. जीएमआरटी प्रकल्पाचे कारण सांगून रेल्वे मार्ग चुकीच्या मार्गाने नेणे हे चुकीचे आहे हे कारण न पटण्यासारखे आहे."
पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे, अहिल्यानगर तसेच नाशिक जिल्ह्यातून जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे. या तीनही जिल्ह्यात सुमारे ३१७ कोटी रुपयांचे भूसंपादनासाठी मोबदल्याचे वाटप करण्यात आलेले आहे त्याचे नेमके काय होणार हा ही प्रश्न चर्चेत आहे. हा मार्ग राजकारणाच्या आखाड्यात अडकलाय का अशी चर्चा आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




