महाराष्ट्र: काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) नेत्यांकडून सातत्याने वादग्रस्त विधाने केली जात असून, यात आता भर पडली आहे. भाजपाचे आमदार परिणय फुके यांनी राहुल गांधी यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि त्यांच्या अलीकडील परदेश दौऱ्याबाबत एक अत्यंत खळबळजनक आणि वादग्रस्त दावा केला आहे. राहुल गांधी हे सध्या व्हिएतनाम दौऱ्यावर असताना, ते तिथे आपल्या पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेले आहेत, असे वक्तव्य आमदार परिणय फुके यांनी केले असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
परिणय फुके नेमके काय म्हणाले? एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आमदार परिणय फुके म्हणाले की, "राहुल गांधी सध्या व्हिएतनामच्या दौऱ्यावर गेले आहेत आणि त्यांच्या या दौऱ्यावरून अनेकदा चर्चा होत असतात. मात्र, यात काही चुकीचे नाही, कारण प्रत्येक व्यक्तीला काही महिने काम केल्यानंतर आपल्या कुटुंबाची आठवण येत असते. राहुल गांधी यांनाही आपल्या बायको आणि मुलाची आठवण आल्यामुळेच ते व्हिएतनामला गेले आहेत."
यावेळी जेव्हा त्यांना राहुल गांधींच्या विवाहाबाबत विचारण्यात आले, तेव्हा फुके म्हणाले की, "राहुल गांधी भलेही स्वतःला अविवाहित असल्याचे सांगत असतील, परंतु त्यांच्या पक्षातील अनेक लोक आणि वेगवेगळ्या फोटोंच्या माध्यमातून त्यांचा परिवार तिथे असल्याचे स्पष्ट होते. राहुल गांधी यांचे केवळ व्हिएतनाममध्येच नव्हे तर चीन, अमेरिका, थायलँड आणि इटली यांसारख्या विविध देशांमध्ये परिवार असल्याचा दावा लोक करतात."
देशविरोधी शक्तींच्या भेटीवर आक्षेप: आमदार परिणय फुके यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, जर ते त्यांच्या कुटुंबाला भेटत असतील तर त्यात काही गैर नाही किंवा आमच्या कोणाच्याही पोटात त्यामुळे दुखत नाही. परंतु, जर ते परदेशात जाऊन विदेशी शक्तींना भेटत असतील आणि तिथून देशविरोधी कारवायांचे आदेश किंवा अजेंडा घेऊन येत असतील, तर मात्र या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
ठाकरे बंधूंवरही जोरदार टीका: याच पत्रकार परिषदेत बोलताना परिणय फुके यांनी उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोन्ही ठाकरे बंधूंवरही तीव्र शब्दांत निशाणा साधला. ते म्हणाले की, हे दोन्ही नेते सध्या पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. उद्धव ठाकरे हे राहुल गांधींची चमचेगिरी करत आहेत, तर राज ठाकरे हे केवळ भिवंडी किंवा इतर ठिकाणच्या राजकारणाबद्दल बोलतात. २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी मोदी आणि फडणवीस यांची साथ सोडून काँग्रेसचे पाय धरल्यापासूनच त्यांच्या पक्षाची अधोगती सुरू झाली आहे, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
शहर
- पुणे: पायल झांबरे मृत्यू प्रकरण आरोपींना फाशीची शिक्षा द्या; पुण्यात न्यायालयाबाहेर नातेवाईकांचे तीव्र आंदोलन!
- नांदेड: फॉर्च्युनर कारला झालेल्या किरकोळ खमकीवरून टोकाचे पाऊल; दुचाकीची चावी काढून मारहाण व भरपाईचा तगादा लावल्याने हदगावच्या तरुणाने संपवले जीवन!
- नागपूर: हिंगणा मार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत महिला प्राध्यापिकेचा मृत्यू; चालक घटनास्थळावरून फरार
- पुणे: खिडकी वाटली म्हणून... दिल्ली-पुणे विमानात प्रवाशाने आकाशात उघडण्याचा प्रयत्न केला इमर्जन्सी दरवाजा; उडाली खळबळ
महाराष्ट्र
- रत्नागिरी: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना मिळाला आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार!
- नंदुरबार: खेळता खेळता एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू
- पुणे: एकट्या रुग्णांसाठी मोठा दिलासा! पुण्याच्या इनामदार हॉस्पिटलतर्फे 'बायस्टँडर' रुग्ण सहाय्यता सेवा सुरू
- कोल्हापूर: दिवाळी सणात कोल्हापुरातील 'सीपीआर' रुग्णालयाची ओपीडी दोन दिवस राहणार बंद; आणीबाणी व आपत्कालीन सेवा २४ तास सुरू!
गुन्हा
- पुणे: हुंड्याच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित पायल झांबरेची आत्महत्या; संतप्त माहेरच्यांनी 'झांबरे पॅलेस' फोडले, पतीला अटक
- छत्रपती संभाजीनगर: एसबीआय बँकेत भामट्याची हातचलाखी; 'पैसे मोजून देतो' म्हणत वृद्धेचे २९,००० रुपये लांबवले
- मुंबई: ६६ लाखांचा हायड्रो गांजा जप्त: साताऱ्यातील दोघा जणांना बेड्या, अंधेरीतील कारवाईने खळबळ
- हिंगोली: घरफोडी करणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या लातूर क्राईम ब्रंचच्या पोलिसांच्या डोळ्यात लाल मिरची पुड फेकून जीवघेणा हल्ला, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य ३१ ऑक्टोबर २०२६ : त्रिग्रह योगाचा तिप्पट लाभ, जाणून घ्या कशी असेल तुमची रास!
- लक्ष्मी-नारायण योगाचे भविष्य: २८ ऑक्टोबर २०२६ रोजी मेष, सिंह आणि वृश्चिक राशीच्या लोकांची कामात प्रगती, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
- २४ ऑक्टोबर २०२६ चे सविस्तर दैनिक राशिभविष्य: शनिदेवांची कृपा आणि नवीन संधी
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- उत्तर प्रदेश: भाऊबीजेच्या आनंदावर विरघळली दिवाळी; हरदोईतील गंगा एक्सप्रेसवेवर भीषण अपघातात पती-पत्नीसह दोन चिमुरड्यांचा मृत्यू, हसताखेळता परिवार उद्ध्वस्त!
- केरळ: २० वर्षे जुने लाचखोरीचे प्रकरण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात केरळ सरकारचे नवीन दक्षता चौकशीचे आदेश!
- नवी दिल्ली: मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात सोनिया गांधीच खऱ्या पंतप्रधान होत्या, पण नरेंद्र मोदी हेच खरे आणि दबंग पंतप्रधान आहेत - काँग्रेसचे माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंग यांचे वक्तव्य
- चंदीगड: पंजाबमध्ये मोठी कारवाई काँग्रेसचे माजी मंत्री सुंदर शाम अरोड़ा यांच्या होशियारपुर येथील निवासस्थानावर ईडीची धाड, सीआरपीएफचे जवान तैनात




























Subscribe to my channel





Solid platform with a great community feel. I feel like my wins are actually possible here. Definitely give krcubet a try today.