
Pune : रामनवमीनिमित्त शहरात निघणाऱ्या मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. सायंकाळी चार ते रात्री दहा या वेळेत अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतूक वळविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी नियोजन करूनच प्रवास करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
बाजीराव रस्ता आणि लष्कर परिसरात मिरवणुका निघणार असल्याने विश्रामबाग आणि लष्कर वाहतूक विभागाच्या हद्दीत आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने वाहतूक बंद किंवा वळवली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता इतर वाहनांना निर्बंध लागू राहतील. विश्रामबाग विभागात पुरम चौकातून बाजीराव रस्त्याने शिवाजीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद केला जाणार आहे. ही वाहने टिळक रस्त्याने वळवून पुढे अलका टॉकीज चौक आणि खंडुजी बाबा चौक मार्गे सोडण्यात येणार आहेत. लष्कर भागात वाय जंक्शनहून एमजी रोडकडे येणारी वाहतूक थांबविण्यात येणार आहे. मिरवणूक पुढे सरकत राहिल्यानुसार १५ ऑगस्ट चौक, महमंद रफी चौक आणि कोहिनूर हॉटेल परिसरात टप्प्याटप्प्याने वाहतूक वळवली जाणार आहे. काही ठिकाणी वाहतूक पूर्णपणे बंद ठेवून ती ईस्ट स्ट्रीट, भोपळे चौक, कुरेशी मशीद आणि सेंटर स्ट्रीट मार्गे सोडण्यात येणार आहे.
पोलिसांचे तोंडावर बोट
टिळक स्मारक ते पेरूगेटमार्गे नारायण पेठेकडे जाणारा रस्ता रामनवमीच्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी पूर्वसूचना न देता अचानक बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय झाली. बुधवारी दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान हा रस्ता सुरुवातीलाच अडविण्यात आला होता, मात्र याबाबत संबंधित यंत्रणांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या प्रकाराबाबत वाहतूक पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ठोस स्पष्टीकरण देण्याचे टाळले. स्थानिक पोलिसांकडे विचारणा केली असता, ‘कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे; मात्र वाहतूक बंद करण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांकडे आहे,’ असे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रस्ता बंद करण्यात आला असताना जबाबदारी नेमकी कोणाची, यावरच प्रशासनातील संभ्रम उघड झाला. विशेष म्हणजे, हा प्रकार वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही सायंकाळपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. सायंकाळी उशिरा विश्रामबाग पोलिसांनी आयोजकांना वाहतुकीसाठी जागा देण्याची सूचना केली.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
- मुंबई: १ ऑगस्टपासून सरकारी कामकाजात मोठा बदल; आता महत्त्वाची कागदपत्रे मिळणार फक्त डिजिटल स्वाक्षरीनेच!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: BAMU आणि एस.बी. हायस्कूल कर्मचाऱ्यांचा आरोप; निवडणूक ड्युटीदरम्यान अधिकारी-पोलिसांकडून दबाव
- तुकाराम मुंढेंची शाळांवर 'वॉच'! विद्यार्थ्यांच्या सुरक्षित अन्नासाठी कँटीन आणि मध्यान्ह भोजनाची कडक तपासणी
- वारीच्या भक्तिरंगात रंगली रिंकू राजगुरू; 'बाप विठुराया' गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला एक नवा आणि भावूक अंदाज!
- मुंबई: लाडकी बहीण योजनेवर 'कॅग' चा गंभीर ठपका; 3,541 कोटींच्या अतिरिक्त खर्चावर प्रश्नचिन्ह
गुन्हा
- उत्तर प्रदेश: पत्नीला परत आणण्यासाठी आईलाच विष! सासूच्या कथित सल्ल्यावरून मुलाचं धक्कादायक कृत्य
- पुणे: शुक्रवार पेठेतील आयुर्वेदिक दुकानावर धाड, ५० लाखांचा संशयास्पद साठा जप्त.
- नागपूर: मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम संपताच परिसरात खून; अवघ्या १० रुपयांच्या चहासाठी तरुणाचा बळी
- कर्नाटक :लग्नाला चार महिने, अन् संशयास्पद मृत्यू! नवविवाहितेच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांचे गंभीर आरोप; तपासाला वेग
राजकीय
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
- तमिळनाडू: विजय सरकार पाडण्यासाठी आमदाराला ₹35 कोटींची ऑफर; तिघांना अटक
- उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे वारे; भाजपच्या प्रभारीपदासाठी विनोद तावडेंच्या नावाची जोरदार चर्चा!
- सचिन अहिर शिंदेंच्या गोटात; संजय राऊतांचे 'ते' ट्विट व्हायरल, कवी सुरेश भटांच्या ओळींतून व्यक्त केली खंत!
इतर
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
- आजचे राशिभविष्य: १२ जुलै २०२६ – जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस?
- हेल्थ टिप्स: पोट निरोगी ठेवायचंय? दररोज मूठभर बदाम खा! 'सुपरफूड'चे जाणून घ्या जबरदस्त फायदे
मनोरंजन
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
- मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात! प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबत केले कोर्ट मॅरेज; जमिनीवर बसून सही करतानाचा पहिला फोटो व्हायरल!
- अखेर वितळला बर्फ! कश्मीरा पायावर पडून रडली, सुनीता आहुजांनी सांगितला १५ वर्षांच्या वादाचा शेवट!
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेशातील: सरकारी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार! मध्यरात्री ICU मध्ये रुग्णाला कथित मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू
- कर्नाटक पर्यटन विकासाला मोठी चालना; सौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणि गोकाक धबधब्यासह १३ ठिकाणी होणार हायटेक रोप-वे
- तेलंगणात भीषण हत्याकांड! पोक्सो कायद्यातील आरोपीने पत्नी, मुलांसह सहा जणांची केली हत्या; स्वतःही संपवले आयुष्य
- ९०० वर्षांचे रहस्य उलगडले! धारमधील मूर्ती सरस्वती नव्हे, तर 'देवी गायत्री'ची; आधुनिक तंत्रज्ञानातून स्पष्ट


























Subscribe to my channel




