
Satara : पुणे- सातारा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कंटेनर आणि बसच्या विचित्र अपघातामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये 23 प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सातारा जिल्ह्यातल्या वरवे गावाच्या हद्दीत झाला. अपघातानंतर महामार्गावरील मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघाताचा तपास सातारा पोलिसांकडून सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सातारा महामार्गावर वरवे गावाच्या हद्दीत रविवारी दुपारी हा अपघात झाला. या अपघातामध्ये 4 वाहनं एकमेकांना धडकली. या वाहनांमध्ये 2 कंटेनर आणि 2 बसचा समावेश आहे. अपघातानंतर खासगी बस पलटी होऊन 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 23 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपघातग्रस्त वाहनं पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर अपघातात मृत्यू झालेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. अपघातग्रस्त वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला बसला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर बस महामार्गावर उलटली. त्यामुळे बसमधील चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 23 प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांमध्ये चौघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातावेळीच एका कारने देखील कंटेनरला पाठीमागून धडक दिली. यामध्ये कारचे नुकसान झाले पण कारमधील प्रवासी सुखरुप आहेत. अपघातानंतर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
शहर
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक: कोणती जागा कुणी लढवायची हे ठरवण्याचा अधिकार नेत्यांचाच; महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू!
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- मुंबई: पान-गुटख्याची जाहिरात करताय, तर आधी स्वतः खा आणि तुमच्या मुलांनाही खाऊ द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंचा बॉलिवूड कलाकारांवर अत्यंत संताप
महाराष्ट्र
- पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक: कोणती जागा कुणी लढवायची हे ठरवण्याचा अधिकार नेत्यांचाच; महायुतीत उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू!
- मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प अदानी नवभारततर्फे हत्येपूर्वी किंवा स्थलांतरास टाळाटाळ करणाऱ्या रहिवाशांचे ट्रान्झिट रेंट (भाडे) घटवले, नवीन दर जाहीर!
- पुणे: कारेगावात दिवसाढवळ्या थरारक गोळीबार पाण्याच्या प्लँटवर कामावर गेलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळी झाडून निर्घृण हत्या!
- रत्नागिरी: सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम यांच्यात पुन्हा उफाळला वाद; नेत्यांनी एकमेकांकडे पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
गुन्हा
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई
- पुणे: मोरगाव परिसरातील शेरेवाडीत दोन वयोवृद्ध महिलांची झोपेतच धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; दरोड्याच्या संशयाने खळबळ
- बीड: १५ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित अंत! दारूच्या नशेत चालत्या कारमध्ये सीटबेल्टने आवळला गळा; मित्राचीच हत्या करून मृतदेह घाटात फेकला
- सिंधुदुर्ग: फोंडाघाटात खळबळ! शिवीगाळ केल्याच्या वादातून झालेल्या हल्ल्यात एकाचा लोखंडी रॉडने घाव घालून खून; परिसरात भीतीचे वातावरण
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
- लंडन: युझवेंद्र चहलची काउंटी टीमला भावनिक साद; 3 वर्षे, 9 बळी आणि असंख्य आठवणी चहलचा नॉर्थम्प्टनशायरला भावनिक निरोप
- कोलकाता: दुर्गा पूजेच्या नावाखाली ५०-६० कोटींचा महाघोटाळा; माजी मंत्री इंद्रनील सेन यांच्या घरी भल्या पहाटे ईडीची धडक कारवाई

























Subscribe to my channel



