
Pune : पुणे रेल्वे स्टेशन यापुढे दररोज पाच तास बंद राहणार आहे. फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. तसंच या कामामुळे लांबपल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फलाट विस्तारीकरणाच्या कामामुळे पुणे रेल्वे स्टेशन दररोज पाच तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही दिवसांत सुरू होणार आहे. यासाठी दररोज चार ते पाच तास पुणे रेल्वे स्थानक पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहे. या काळामध्ये पुणे रेल्वे स्थानकावर एकही गाडी येणार नाही किंवा जाणार नाही.
पुणे रेल्वे स्थानकांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या लांबपल्ल्याच्या अनेक गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. रेल्वे स्थानकाच्या फलाट विस्तारीकरणाचे काम काही वर्षांपासून प्रलंबित आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून या कामासाठी 108 दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिमॉडेलिंगचे काम सुरू झाल्यानंतर पुढचे काही महिने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.
पुणे रेल्वे स्थानकावरुन 155 रेल्वे गाड्या धावतात. यापैकी 65 गाड्या पुणे विभागातून सुटतात. तर काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर येथून सोडण्याचे नियोजन केले जात आहे. फलाट विस्तारीकरणाच्या या कामामुळे पुणे रेल्वे स्थानकावरुन बाहेर जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकच पाहून याकाळामध्ये प्रवास करणे फायदेशीर ठरेल. नाही तर त्यांना रेल्वे स्थानकावरच थांबावे लागेल.
शहर
- "सोनम वांगचुक यांच्या उपोषणावर काँग्रेसचा अखेर पाठिंबा; प्रकृती खालावल्याने उपोषण मागे घेण्याचे आवाहन"
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
महाराष्ट्र
- पुणे: शहरात सलग चार दिवस गढूळ पाणीपुरवठा; नागरिक संतप्त
- "ओला, उबर आणि रॅपिडोच्या मनमानीला लगाम: महाराष्ट्र सरकारचे नवे ॲग्रीगेटर धोरण लागू; आता नियमांचे पालन अनिवार्य"
- नागपूर: 'चौक पोलीसांचा असला तरी शहराचे कमिशनर आम्हीच' रीलबाजांची हिरोगिरी महागात;
- पुणे: हॉस्टेलमधून काढल्याचा राग अनावर! पुण्यात युवकाचे अपहरण करून बेदम मारहाण; शहरात खळबळ
गुन्हा
- पुणे: फुरसुंगी गोळीबार प्रकरणात बिष्णोई टोळीचा सोशल मीडिया कनेक्शन; Signal ॲपवरून होत होता गुप्त संवाद
- कोल्हापूर : भरदिवसा भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार; खासगी सावकारीच्या वादातून हल्ल्याचा संशय
- कोल्हापूर: उसने दिलेल्या पैशांसाठी तगादा लावणाऱ्या महिलेचा विष पाजून खून; दीड महिन्यानंतर पोलिसांनी उलगडला थरारक गुन्हा
- जळगाव: विवाहितेचे मुलासह अपहरण; दोन महिने डांबून ठेवत नराधमाकडून अत्याचार
राजकीय
- दिल्ली: अमित शाहांच्या भेटीनंतर शिंदे गटाला मिळणार दोन मंत्रिपदे? 'या' नेत्यांच्या नावाची चर्चा.
- सिंधुदुर्ग: सावंतवाडी पाणीपुरवठा योजनेला वेग; आमदार दीपक केसरकर आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी!
- नाशिक: १२ नगरसेवक फुटण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे स्वतः रिंगणात; मातोश्रीवर होणार 'वन-टू-वन' चर्चा.
- मुंबई: महाराष्ट्रात समान नागरी कायदा (UCC) लागू करण्याच्या हालचालींना वेग; दोन आठवड्यांत स्थापन होणार तज्ज्ञ समिती.
इतर
- आजचे राशिभविष्य १५ जुलै: गणरायाची विशेष कृपा या राशींवर; काहींनी आर्थिक आणि आरोग्याची घ्यावी काळजी.
- मुंबई: व्हायरल ताप, डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांत १५ ते २० टक्क्यांनी वाढ; 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष!
- आजचे राशिभविष्य (१४ जुलै २०२६): गणरायाच्या कृपेने 'या' राशींना धनलाभ, यश आणि नव्या संधींची चाहूल!
- आजचे राशिभविष्य १३ जुलै २०२६: या राशींना होणार बंपर लाभ, आजचा दिवस ठरेल खास!
मनोरंजन
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
- क्रिकेट विश्व: क्रिकेटर सौरव गांगुली च्या बायोपिक चं पहिलं पोस्टर रिलीज !
देश विदेश
- पश्चिम बंगाल: भरधाव ट्रेनची शाळेच्या वाहनाला भीषण धडक; विद्यार्थ्यांसह तिघांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती गंभीर
- इस्रोचे महत्त्वाचे धोरण बदल: 'गगनयान'सारख्या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील शास्त्रज्ञांच्या राजीनाम्यावर निर्बंध; नोकरशाहीचा निर्णय
- पंख उधार घेऊन भरारी घेता येत नाही; आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नासाठी स्वदेशी पंखांची गरज!
- छत्रपती संभाजीनगर: स्नॅपचॅटवरील प्रेमाची साद! ओडिशाहून प्रेमाखातर थेट महाराष्ट्रात पोहोचली १९ वर्षीय तरुणी.


























Subscribe to my channel



