Pune News : घटस्फोटासाठी पत्नीची पोलिसात तक्रार; चिडलेल्‍या पतीने पेटविल्‍या परिसरातील पंधरा गाड्या

पुणे : लग्‍नाला सहा वर्ष झाले होते. परंतु, पती काही काम करत नसून घरीच बसून असतो. यामुळे त्रस्‍त पत्‍नीने पतीपासून सुटका मिळावी याकरीता पोलिसात  घटस्‍फोटासाठी तक्रार दाखल केली. पतीला ही बाब समजल्‍यानंतर संतापात त्‍याने पत्‍नीच्‍या दुचाकीसह परिसरातील दहा दुचाकी व चार मोठ्या गाड्या पेटवून दिल्‍या. 

कोंढव्यातील अश्रफनगर परिसरातील अलिप टावर समोरील हा धक्कादायक प्रकार झाला आहे. आरोपी टेरेन्स आणि त्याची पत्नी एलिना जेकेब यांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. काही वर्ष चांगली गेली. मात्र लग्नानंतर टेरेन्‍स हा कोणताही कामधंदा करत नव्हता. पत्‍नी वारंवार सांगत असताना देखील पती कामाला जात नव्‍हता. म्हणून पत्नीने त्याच्या विरोधात पोलिसांमार्फत घटस्फोटासाठी अर्ज दिला.

पत्नीने घटस्फोटासाठी पोलिसात तक्रार दाखल केली. पतीला हे समजल्‍यानंतर घटस्फोटाच्‍या अर्जावरून चिडलेल्या जॉन याने पत्नीच्या दुचाकीसह परिसरातील चारचाकी कार, रिक्षा आणि इतर वाहन पेट्रोल टाकून पेटवून जाळल्याचा धक्कादायक प्रकार पुण्याच्‍या कोंढव्यात खळबळ उडाली आहे. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *