
Pune - भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन लवासाच्या विक्रीला नॅशनल कंपनी लॉ ट्रीब्यूनल ने नुकतीच परवानगी दिली आहे. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर तर्फे लवासाची खरेदी केली जाणार आहे. १,८१४ कोटी रुपयांना हा व्यवहार होईल.
लवासाच्या उभारणीसाठी कर्ज देणाऱ्या बड्या वित्तसंस्था तसेच तेथे घरे घेऊनही त्यांचा ताबा न मिळाल्याने अडकलेले खरेदीदार यांना या निर्णयामुळे मोठाच दिलासा मिळणार आहे.
डार्विन प्लॅटफॉर्म ने लवासाच्या खरेदीचा प्रस्ताव कर्जदारांना दिला होता. तो कर्जदारांनी मान्य केल्यावर त्यास एनसीएलटीनेही मंजुरी दिली आहे. त्यानुसार १,८१४ कोटी रुपयांची रक्कम आठ वर्षात दिली जाईल. त्यात ९२९ कोटी रुपये रुपयांचे कर्ज चुकते करण्यात येईल, तर घर खरेदीदारांना तयार घरे बांधण्यासाठी ४३८ कोटी रुपये खर्च केले जातील.
लवासामध्ये ८३७ घर खरेदीदारांनी घरे घेतली आहेत. त्यांचे दावे ४०९ कोटी रुपयांचे आहेत. आता त्यांना पाच वर्षात घरे दिली जातील. त्यापूर्वी या घरबांधणीला पर्यावरण मंजुरी घेतली जाईल आणि घर बांधणीला जो खर्च येईल तो खरेदीदारांकडून वसूल केला जाईल. घरांची खरेदीची किंमत पारदर्शकपणे ठरवण्यासाठी चार सदस्यांची समिती नेमण्यात आली आहे.
|
|
मुंबईत मुख्यालय असलेल्या डार्विन ग्रुपने यापूर्वी जेट एअरवेज आणि रिलायन्स कॅपिटल यांच्या खरेदीसाठीही स्वारस्य दाखवले होते. लवासाला यापूर्वी युनियन बँक ऑफ इंडिया, एल अँड टी फायनान्स, बँक ऑफ इंडिया व ॲक्सिस बँक यांनी कर्जे दिली आहेत.
लवासा हिल स्टेशनचा विकास हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने केला होता. युरोपीय बांधकाम शैलीने निर्माण केलेले शहर म्हणून लवासाची अल्पावधीतच प्रसिद्धी झाली होती. या प्रकल्पात लवासाला धरण बांधण्यास तसेच आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारणीलाही परवानगी मिळाली होती.
मात्र नंतर कंपनीने कर्ज थकवल्यामुळे एका कर्जदाराने काही वर्षांपूर्वी लवासाविरुद्ध दिवाळखोरीचा दावा केला होता. त्यावर नुकताच लवादाच्या श्याम बाबू गौतम आणि कुलदीप कुमार करीर यांनी लवासाच्या विक्रीच्या प्रस्तावाला संमती दिली आहे.
शहर
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- नाशिक: सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्यास पुढील २० वर्षांत ६६ टक्क्यांवर पोहोचणार खासगी वाहनांचा वापर; शहराला हव्यात तब्बल ८०० बस
- पुण्यात खळबळ! महापालिका शाळेची फाइलच गायब; महंमदवाडीतील जागा खासगी संस्थेला देण्याच्या प्रशासकीय घाटावर सर्वपक्षीय नगरसेवक आक्रमक
- बाबरी मशीद पाडायला नको होती' असे म्हणणे देशविरोधी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; मुंबई पोलिसांची तडीपारीची कारवाई रद्द
महाराष्ट्र
- कोल्हापूर: ठेकेदाराचा पाठलाग करून मारहाण, ३००० रुपये घेतले काढून; ५० हजारांची मागितली खंडणी
- पुणे: रस्त्यावर कुजलेले दूध ओतणे पडले महागात; भोर नगरपालिकेची १० हजार रुपयांची दंड कारवाई
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- बीड: माजी सैनिकाचे घर फोडणारा गल्लीतीलच निघाला; बीडच्या केजमधील घरफोडीचा अवघ्या ४८ तासांत पर्दाफाश, ३.५५ लाखांचा ऐवज जप्त
गुन्हा
- अहिल्यानगर: एका क्लिकमध्ये बँक खाते रिकामे! अहिल्यानगरमध्ये सायबर भामट्यांचा सुळसुळाट, अवघ्या सात महिन्यांत नागरिकांचे १८ कोटी लाटले
- पुणे: पत्नी घर सोडून गेली, दोन दिवसांनी पतीने संपवले आयुष्य; हातावरील मजकूर आणि सुसाईड नोट पाहून पोलीसही झाले अवाक
- सांगली: कामावरून झालेल्या वादातून झोपलेल्या तरुणाच्या डोक्यात लाकडी दांडके घालून निर्घृण खून; आरोपी पसार
- नाशिक: मुलीच्या मृत्यूनंतर दुःखात असलेल्या वडिलांनीही संपवले जीवन
राजकीय
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
- नवी दिल्ली: "आमचा वेळ वाया घालवू नका, व्हिडिओ पाहायला वेळ नाही!"; जंतरमंतरवरील पोलिस कारवाईच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाची तातडीच्या सुनावणीस स्पष्ट नाकार
इतर
- आजचे राशिभविष्य २९ जुलै २०२६: गणपती बाप्पाच्या कृपेने ‘या’ राशींना मिळणार नवीन नोकरी आणि आनंदाची बातमी
- आजचे राशिभविष्य २७ जुलै २०२६ : या राशींना नोकरीत प्रमोशन तर काही राशींना व्यवहारात सतर्क राहण्याचा इशारा, जाणून घ्या आजचे भविष्य
- आजचे राशिभविष्य २५ जुलै २०२६: विठूरायाची कृपा आणि शनीची साथ, या राशींचा दिवस ठरणार सोन्याचा!
- आजचे राशिभविष्य २४ जुलै २०२६: शुक्र या राशींसाठी पाडणार पैशांचा पाऊस, पुण्याई येणार फळाला, इच्छापूर्ती होणार!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- उत्तर प्रदेश: डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या ६५ वर्षीय महिलेची अंत्यविधीची तयारी सुरू असताना १७ तासांनी पुन्हा परतली प्राणांतून सुटका;
- मध्य प्रदेश: लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाने बँक कर्मचारी प्रेयसीची केली हत्या; मृतदेह पेट्रोल टाकून जाळल्याने मोठी खळबळ
- उत्तर प्रदेश: कानपूर हादरले! चहात विष कालवून हळूहळू मारण्याचा प्रयत्न; चार्टर्ड अकाउंटंट पतीने पत्नीचा पोलखोल करणारा 'हिडन कॅमेरा' व्हिडिओ आणला समोर
- उत्तर प्रदेश: मथुरा बनले देशाचे नवे 'मिनी जामताडा'! १८ गावांमधील गल्लीबोळांतून तब्बल ३१२ सायबर ठगांना बेड्या; उत्तर प्रदेश पोलिसांची आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई



























Subscribe to my channel




