Pune : महारेरा’चा दणका! बिल्डरांकडून कोट्यवधींची वसुली; ग्राहकांना रक्कम परत मिळाली

Pune : महारेराच्या आदेशांची अंमलबजावणी करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने पुण्यातील घरखरेदीदारांना मोठा दिलासा; राज्यभरात २७० कोटींची वसुली. विकासकाला पैसे देऊनही घराचा ताबा न मिळाल्याने भरपाईसाठी महारेराकडे धाव घेणाऱ्या पुण्यातील घरखरेदीदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. महारेराने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मदतीने पुण्यातील घरखरेदीदारांची तब्बल ४७ कोटी रुपयांची भरपाई वसूल करून दिली आहे.

महारेराकडून भरपाईचे आदेश दिल्यानंतरही अनेक विकासक त्याची अंमलबजावणी करत नाहीत. अशा प्रकरणांमध्ये महारेराकडून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे वसुलीचे वॉरंट पाठवले जातात. स्थावर संपदा (नियमन आणि विकास) अधिनियम २०१६ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाला जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे रक्कम वसूल करण्याचे अधिकार आहेत.

मे २०१७ पासून आतापर्यंत महारेराने राज्यभरातील १,२९१ तक्रारदारांसाठी ७९२ कोटी रुपयांच्या भरपाईचे आदेश दिले आहेत. यापैकी २७० कोटी रुपये प्रत्यक्ष वसूल करण्यात आले असून, त्यातील ७० कोटी रुपये केवळ गेल्या वर्षभरात जिल्हाधिकारी कार्यालयांच्या मदतीने वसूल झाले आहेत.

Weather Alert : नववर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर; मुंबईसह अनेक भागांत सरी, गारठा कायम राहणार

पुण्यातील १३९ प्रकल्पांमधील २७४ वॉरंटपोटी १९५ कोटी रुपयांच्या भरपाईचे आदेश देण्यात आले होते. यापैकी ४४ प्रकल्पांतील ५१ वॉरंटद्वारे ४७ कोटी रुपये घरखरेदीदारांना मिळाले आहेत.दरम्यान, १०३ कोटी रुपयांची प्रकरणे राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (NCLT) प्रलंबित असल्याने त्यांची वसुली अद्याप होऊ शकलेली नाही, अशी माहिती महारेराकडून देण्यात आली आहे.



विडियो गॅलेरी

2 thoughts on “Pune : महारेरा’चा दणका! बिल्डरांकडून कोट्यवधींची वसुली; ग्राहकांना रक्कम परत मिळाली

Leave a Reply to Maliyah1973 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *