
Pune : पुणे महापालिकेच्या १६५ जागांसाठी ४१ प्रभागांमधून मंगळवारी दिवसभरात दोन हजार २९८; तर एकूण तब्बल तीन हजार ४१ अर्ज दाखल झाले आहेत. बुधवारी अर्जाची छाननी होणार आहे. सर्वच प्रभागांत मुख्य राजकीय पक्षांच्या अनेक उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत. त्यामुळे छाननी झाल्यानंतर ज्यांचे अर्ज वैध झाले आहेत, त्यांना अर्ज माघारी घेण्यासाठी अधिकृत उमेदवार व नेत्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. अन्यथा बंडखोर उमेदवारांच्या उपद्रवाला सामोरे जावे लागणार आहे.
पुण्यात भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाच्या वादामुळे युती तुटल्याने भाजपने १५८ ठिकाणी उमेदवार दिले आहेत. तर सात जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला (रिपाइं) सोडण्यात आल्या आहेत. तिकीट वाटप करताना भाजपमध्ये मंगळवारी दुपारी एक वाजेपर्यंत उमेदवार बदलण्याची प्रक्रिया सुरू होती. यात अनेक दिग्गजांची उमेदवारी नाकारून त्यांना घरी बसविण्यात आले आहे. १६५ पैकी ९० जागांवर महिलांना, तर ७५ ठिकाणी पुरुष उमेदवारांना संधी दिली आहे.
|
|
भाजपने तयार ठेवले उमेदवार
शिवसेनेबरोबर युती होणार असल्याने भाजपने त्यांच्यासाठी १५ जागा सोडून अन्य ठिकाणचे उमेदवार निश्चित केले होते. त्यातील सुमारे १०० जणांना भाजपने सोमवारी एबी फॉर्म दिले. त्यानंतर उर्वरित उमेदवारांना सोमवारी मध्यरात्री, तर काहींना आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अर्धा ते एक तास शिल्लक असताना उमेदवारी दिली आहे. शिवसेना युती तोडू शकते ही शक्यता गृहित धरून भाजपने तेथे उमेदवार तयार ठेवले होते. त्यानुसार या १५ जागांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना अचानक संधी देण्यात आली.
माजी नगरसेवकांचं तिकीट कापलं
भाजपने अनेक माजी नगरसेवकांची उमेदवारी कापली आहे. त्यातील अनेकांनी पक्षांतर करून अन्य पक्षांत उमेदवारी मिळवली आहे. आमदारांच्या नातेवाइकांना उमेदवारी दिली जाणार नव्हती; पण मानसी देशपांडे, वर्षा तापकीर, रंजना टिळेकर या पूर्वीपासून नगरसेविका असल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या इच्छुकांना उमेदवारी दिली असून, केवळ विकास दांगट यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यांनी आता अपक्ष अर्ज दाखल केला आहे. याचप्रमाणे प्रभाग क्रमांक ३३ शिवणे खडकवसाला येथे बंडखोरी झाल्याने भाजपचे उमेदवार धोक्यात येऊ शकतात.
पुण्यात भाजपकडून विद्यमान नगरसेवकांची तिकीट कापून नव्यांना संधी देण्यात आलीय. पुण्यात भाजपने यंदा निम्म्या विद्यमान नगरसेवकांची उमेदवारी नाकारलीय. शिवाय काही आमदार आणि नेत्यांचा मुलांनाही तिकीट नाकारलं आहे. भाजपनं ४२ विद्यमान नगरसेवकांच तिकीट कापलं आहे.
ऐश्वर्या जाधव
मारुती सांगळे
आयुब शेख
श्वेता गलांडे-खोसे
मुक्ता जगताप
सुनीता गलांडे
संदीप जराड
सोनाली लांडगे
राजश्री काळे
आदित्य माळवे
सुनीता वाडेकर
अर्चना मुसळे
बंडू ढोरे
स्वप्नाली सायकर
ज्योती कळंबकर
अमोल बालवडकर
श्रद्धा प्रभुणे
हर्षाली माथवड
दीपक पोटे
माधुरी सहस्त्रबुद्धे
जयंत भावे
स्वाती लोखंडे
नीलिमा खाडे
ज्योत्स्ना एकबोटे
राजेश येनपुरे
योगेश समेळ
सुलोचना कोंढरे
विजयालक्ष्मी हरियार
आरती कोंढरे
सम्राट थोरात
मनीषा लडकत
संजय घुले
कविता वैरागे
राजश्री शिळीमकर
प्रवीण चोरबोले
सरस्वती शेंडगे
आनंद रिठे
शंकर पवार
वृषाली चौरे
नीता दांगट
राजश्री नवले
दिशा माने
४१ प्रभाग, १६५ जागा, ३ हजार ४१ अर्ज
पुणे महापालिकेच्या ४१ प्रभागांतून १६५ जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया २३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. मंगळवारी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ११ हजार ७९६ नामनिर्देशन अर्जाची विक्री झाली. २३ ते २९ डिसेंबरदरम्यान ७४३ नामनिर्देशन पत्र दाखल झाले. मंगळवारी शेवटच्या दिवशी उमेदवारांची प्रचंड गर्दी झाली होती. १५ क्षेत्रीय कार्यालयांत सायंकाळी सातपर्यंत एकूण दोन हजार २९८ अर्ज दाखल झाले. या संपूर्ण कालावधीत ४१ प्रभागांत १६५ जागांसाठी एकूण तीन हजार ४१ अर्ज दाखल झाले आहेत.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




