
Pune : शहरातील गर्दीच्या प्रमुख मार्गांपैकी एक नगर रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी केलेल्या उपाययोजनांमुळे मार्गावरील कोंडी फुटून वाहतुकीचा वेग वाढला आहे. नगर रस्त्यावरील येरवडा ते खराडी या भागात प्रायोगिक तत्त्वावर सिग्नल फेज बदल, चौक सुधारणा, अर्धवर्तुळाकार वळण (यू-टर्न), उजवीकडे वळणात (राईट टर्न) पोलिसांनी बदल केले. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा वेग गतवर्षीच्या (जानेवारी ते फेब्रुवारी) तुलनेत यंदा १६ ते १९ टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षण वाहतूक विभागाने नोंदविले आहे. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
नगर रस्त्यावरील गर्दीचे प्रमाण ध्यानात घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काही दिवसांपूर्वीच नगर रस्त्याची पाहणी केली. येरवडा, विमानतळ, खराडी, वाघोली परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस आयुक्तांनी सूचना केल्या होत्या. त्यानुसार वाहतूक विभागाने नगर रस्त्यावरील समस्यांचा अभ्यास केला. महापालिका आणि वाहतूक पोलीस यांनी संयुक्तपणे काम करीत उपाययोजना केल्या. येरवडा, शास्त्रीनगर चौकातील कल्याणीनगरकडे जाणाऱ्या उजवीकडील वळणामुळे मुख्य नगर रस्त्यावर कोंडी होत होती. त्यामुळे ही सुविधा बंद करून पुढे अर्धवर्तुळाकार वळण दिल्याने मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी झाली. तर, वडगाव शेरी चौकातून नगरकडे जाताना अग्निबाज प्रवेशद्वारासमोरून उजवीकडे वळण देण्यात आले.
|
Beed Crime : बीडमध्ये मारहाणीत विकासचा मृत्यू, हत्येनंतर क्षीरसागरचा फोन; ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय? |
पुण्याकडे येताना उजवीकडे वळण देण्यात आले. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील कोंडी कमी होऊन वेग वाढण्यास मदत झाली.
विमाननगर चौक (फिनिक्स मॉल) येथे उजवीकडे वळण असल्याने मुख्य रस्त्यावर कोंडी होत होती. पोलिसांनी उजवीकडचे वळण बंद करून चौक सिग्नलविरहीत केला. तर, खराडी दर्गा चौकातील उजवीकडचे वळण बंद करून आपले घर बसथांब्यापासून अर्धवर्तुळाकार वळण केल्याने मुख्य रस्त्यावरील वाहतूक सिग्नल विरहीत झाली. येरवडा ते खराडी या भागात केलेल्या या उपाययोजनांनंतर एटीएमएस या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीद्वारे वाहतुकीची वर्दळ पाहून करण्यात आलेल्या विश्लेषणाद्वारे संबंधित भागातील वेग वाढल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षीच्या (जानेवारी-फेब्रुवारी) तुलनेत हा वेग १६ ते १९ टक्क्यांनी वाढला आहे. अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपाययोजना राबविण्यात आल्या.
नगर रस्त्यावरील वाघोली भागात सर्वाधिक वाहतूक कोंडींचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने या परिसरात विशेष कारवाई केली. यामध्ये वाघेश्वर चौक ते केसनंद फाटा तसेच बकोरी फाट्यापर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील अतिक्रमणे, टपऱ्या काढून टाकण्यात आल्या. खड्डे बूजवून रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. वाघोली वाहतूक विभागाच्या हद्दीत ट्रॅव्हल्स वाहनांवर कारवाई करून त्यांना अटकाव करण्यात आला.
नगर रस्त्यांवरील बेशिस्त वाहनधारकांवर कारवाई करीत यंदा जानेवारी ते १० मार्चपर्यंत तब्बल ३४ हजार ३११ खटले दाखल करून २ कोटी ४८ लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. यामध्ये विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, ट्रीपल सिट, मद्यप्रशान करून वाहन चालवणे, सिग्नल तोडणे अशा नियमभंगाचा समावेश आहे.
शहर
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
- नाशिक: शालार्थ आयडी घोटाळा उच्च न्यायालयाकडून अमोल कुलकर्णीचा अटकपूर्व जामीन फेटाळला, बनावट कागदपत्रांच्या आधारे कोट्यवधींची फसवणूक उघड
महाराष्ट्र
- पुणे: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटन अनिश्चित काळासाठी स्थगित, पंतप्रधानांच्या दौऱ्यावरील अनिश्चितता ठरली कारण
- पुणे: पिंपरी-चिंचवडच्या मारुंजी परिसरात थरकाप उडवणारी घटना: चालकाला चालत्या गाडीतच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने भीषण अपघात, उपचारापूर्वीच मृत्यू
- पुणे: मुंढवा जॅकवेलचे ५ पंप सुरू; शेतीसाठी दररोज ४५ कोटी लिटर पाणी सोडण्यास सुरुवात, अखेर जलसंपदा विभागाला आली जाग
- पुणे: शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात मतदानासाठी 'स्पायकॅम पेन' आणि पैसे वाटपाचे गंभीर आरोप, राजकीय वातावरण तापले
गुन्हा
- गडचिरोली: दारू तस्करीची भन्नाटक्कल उघड: दुचाकींच्या पेट्रोल टाकी अन् सीट कव्हरमध्ये लपवून नेली जात होती दारू, २.३२ लाखांचा मुद्देमाल जप्त!
- मुंबई: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण ९वीत नापास, वेल्डिंगचे काम अन् जुना गुन्हेगारी रेकॉर्ड; असा आहे शार्प शूटर रेहानचा प्रवास!
- सातारा: सोन्याच्या दागिन्यांची थोरांडी चोरी! बायकोसाठी हार घ्यायचा बहाणा करून फोटो काढण्याच्या बहाण्याने चोरटा १४ लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन पसार!
- छत्रपती संभाजीनगर: 'तुझी बहीण माझ्याशीच बोलते'; संशयास्पद कारणावरून तरुण घरात घुसून ठार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य (१६ ऑक्टोबर २०२६): लक्ष्मी नारायण योगाचा या राशींना लाभ, शुक्र देणार पैसा व सुख-समृद्धी; पाहा तुमचे राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १५ ऑक्टोबर २०२६: गुरु करणार सौभाग्य योग निर्माण, या राशींना मिळणार गुरुचे पाठबळ व लाभ!
- आदिशक्ती आणि हनुमानजींच्या कृपेने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी उजळणार भाग्य; वाचा सर्व राशींचे सविस्तर दैनिक राशिभविष्य!
- आजचे राशिभविष्य १२ ऑक्टोबर २०२६: या राशींवर होणार शिवशक्तीची कृपा, नोकरीत मिळणार पगारवाढ आणि आर्थिक समस्या होणार दूर!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- नवी दिल्ली: दिल्लीतील व्यापाऱ्यांचे राहुल गांधींना पत्र; रामलळा मैदानातील रॅली पुढे ढकलण्याची मागणी, १०,००० कोटी रुपयांच्या नुकसानीचा इशारा
- नवी दिल्ली: राजधानी दिल्लीत एसआयआरविरोधातील आंदोलने अधिक तीव्र १४५ संघटनांचे एकत्र येऊन निवडणूक आयोगावर धडक मोर्चा, राकेश टिकैतही मैदानात
- गोवा: एआय धोरण २०२६ जाहीर तरुणांना प्रशिक्षण, स्टार्टअप्सला चालना आणि तंत्रज्ञान क्रांतीच्या दिशेने मोठी झेप!
- उत्तर प्रदेश: मनेागरणात डेंगूमुळे पतीचा मृत्यू, पाठोपाठ पत्नीनेही दम तोडला; एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार



























Subscribe to my channel




