
Hadapsar : हडपसर येथील साडेसतरानळी परिसरात गुन्हेगारी व अवैध धंद्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी नागरिकांनी येथे स्वतंत्र पोलिस चौकीची मागणी केली आहे. सध्या चौकीसाठीची जागा व त्यावरील लोखंडी खोल्याही तयार आहेत. मात्र, दोन-तीन महिने उलटूनही त्या ठिकाणी अद्याप कामकाज सुरू झालेले नाही. त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. येथे अवैध दारू धंदे, मटका, जुगार व व्यसनी तरुणांचे प्रमाण अधिक वाढले आहे. यातून चोऱ्या व दहशतीचे प्रकारही घडत असून बाल गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील नागरिकांना त्याचा वारंवार त्रास सहन करावा लागतो.
आठवडाभरापूर्वी येथे एक तरुण भेटत नाही म्हणून त्याच्या मित्राला बोलावून दोन-तीन तरुणांनी कोयत्याने वार करून त्याला जखमी केले होते. आपली दहशत दाखविण्यासाठी त्याचा व्हिडिओही समाज माध्यमावर प्रसारित केला होता.
|
|
तीन महिन्यापूर्वी पाच-सहा तरुणांनी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकाशेजारील परिसरात काही गाड्या व दुकानांची कोयत्याने तोडफोड करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. पोलिसांकडून वारंवार कारवाई करूनही त्यावर नियंत्रण मिळवता आलेले नाही.
येथील पोलिस चौकी सुरू झाल्यास असे अवैध धंदे व गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, अशी नागरिकांना आशा आहे. मात्र, पोलिस चौकी उभारूनही ती सुरू का केली जात नाही, याबाबत त्यांच्याकडून शंका व्यक्त केली जात आहे.
येथील पोलिस चौकीसाठी सध्या आहे त्या जागेपेक्षा अधिक प्रशस्त जागेचा शोध सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा काही जागांबाबत माहिती दिलेली आहे. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. याशिवाय या भागात नियमित पोलिस पेट्रोलिंग सुरू असून, बेकायदा धंदे व इतर गुन्हेगारीवर नियंत्रण आणले जात आहे.
- संजय मोगले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हडपसर पोलिस ठाणे
येथील पोलिस चौकीची वारंवार मागणी केली होती. आमदार चेतन तुपे पाटील व सिटी कॉर्पोरेशनचे अनिरुद्ध देशपांडे यांच्या पुढाकारातून चौकी स्थापनही करण्यात आली आहे. मात्र, पोलिस प्रशासन तेथे कामकाज सुरू करण्यास टाळाटाळ का करीत आहे, ते समजत नाही.
अमोल तुपे, अध्यक्ष, क्रांती शेतकरी संघ
साडेसतरानळी येथे चौकी व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मांजरी बुद्रुकसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची मंजुरी मिळालेली आहे. तेथील कामकाज सुरू झाल्यानंतर सध्याचे तेथील सर्व कर्मचारी साडेसतरानळी पोलिस चौकीसाठी मागता येईल. त्यानंतरच तेथे खऱ्या अर्थाने स्वतंत्र पोलिस चौकी होईल.
चेतन तुपे पाटील, आमदार
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
- पुणे: लवळे फाट्या जवळ भीषण साखळी अपघात! सिमेंटचा ट्रक, डंपर, टेम्पो आणि दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक; एक जण जागीच ठार, दोघे गंभीर जखमी
- पुणे: म्हाळुंगे-नांदे रोडवर मोठा अपघात! चालकाला डुलकी लागल्याने कर्नाटक पासिंगचा आरएमसी ट्रक उलटला; रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप
महाराष्ट्र
- पुणे: सरकारला फुले-आंबेडकरी विचारांची ताकद बघायची आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीवर ॲड. प्रकाश आंबेडकरांचा संतप्त सवाल
- छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा पदवीधर आमदार निवडणुकीचे समीकरण स्पष्ट; विद्यमान जागा ज्यांच्याकडे, त्याच पक्षाची राहणार, महायुतीच्या जागावाटपावर चंद्रशेखर बावनकुळेंचे स्पष्टीकरण
- कोल्हापूर: गांधी जयंतीनिमित्त कोल्हापुरात अनोखी परंपरा! कारागीर फिरोज सत्तारमेकर यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यास सर्वप्रथम अर्पण केली पुष्पमाला
- अहिल्यानगर: काळाचा घाव! नवीकोरी मोटारसायकल घेऊन नातेवाइकांना भेटायला चाललेल्या तीन भावांचा भीषण अपघातात जागीच मृत्यू
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- रशिया: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची एक आयडिया, अन् संपू शकतं युक्रेन युद्ध; व्लादिमीर पुतिन यांचं मोठं विधान
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
























Subscribe to my channel




