
Pune : शहर ‘ड्रग्जमुक्त’ करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पुण्यातील काही भाग अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या विश्लेषणात कोंढवा, येरवडा, खडकसह काही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ड्रग्ज प्रकरणे सर्वाधिक असल्याचे उघड झाल्याने आता या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार आणि सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी मंगळवारी गुन्हे आढावा बैठक घेतली. या वेळी पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कठोर सूचना दिल्या आहेत. ‘केवळ कारवाई न करता अमली पदार्थाच्या साखळीचा मुळापर्यंत शोध घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पोलिसांच्या विश्लेषणानुसार कोंढवा, लक्ष्मीनगर, येरवडा, काळेपडळ, खडक आणि लोणी काळभोर ही पोलिस ठाणे अमली पदार्थांच्या प्रकरणांत ‘टॉप’मध्ये आहेत. त्याचबरोबर शिवाजीनगर, डेक्कन, कोथरूड, वारजे, पर्वती, मार्केटयार्ड, बाणेर, लष्कर, मुंढवा, वानवडी, हडपसर, लोहगाव, वाघोली, खराडी, लोणीकंद, सहकारनगर या १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतही मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची प्रकरणे समोर येत आहेत,’ अशी माहिती पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
प्रत्येक संबंधित पोलिस ठाण्यात स्वतंत्र ‘अँटी-ड्रग्ज पथक’ स्थापन करण्यात येणार आहे. दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले हे पथक ड्रग्जविरोधी कारवाईवर लक्ष ठेवणार आहे; तसेच या पथकांना अत्याधुनिक ‘ड्रग्ज ॲनालायझर’ यंत्रणा देण्यात येणार आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे, की केवळ साठा जप्त करण्यापुरते मर्यादित न राहता ड्रग्जचा पुरवठा कुठून होतो, कोणत्या मार्गाने येतो आणि कोणाला वितरित केला जातो, याचा सखोल तपास केला जाणार आहे. त्यासाठी शहरातील २२ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
अमली पदार्थांची तस्करी अणि विक्री रोखण्यासाठी पोलिसांकडून आता ॲपचा (उपयोजन) वापर करण्यात येणार असून, या ॲपवर माहिती देणाऱ्या नागरिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. नगरसेवकांना ‘माझा प्रभाग ड्रग्ज मुक्त’ या उपक्रमाशी जोडण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी प्रायोगिक तत्त्वावर पहिल्या टप्यात चार प्रभागांत हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग
























Subscribe to my channel




