
Pune : विमाननगर येथील मसाज पार्लरमधील महिलेच्या मृत्यू प्रकरणात राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या कारवाईवेळी महिलेने इमारतीतून उडी मारली होती. या घटनेत तिचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात महिलेच्या पतीने पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दिली. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पतीने केली आहे.
काय आहे प्रकरण?
पुणे येथील विमाननगर भागातील एका मसाज पार्लरमध्ये देह व्यापाराचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. पोलिसांची कारवाई, तसेच अटकेची भीती वाटल्याने महिलेसह मसाज पार्लरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. मसाज पार्लरमधील व्यवस्थापकाच्या पायाला दुखापत झाली होती.
दरम्यान, या घटनेनंतर सीआयडीच्या पथकाने मंगळवारी विमाननगर भागातील इमारतीस भेट दिली. सीआयडीच्या पथकाकडून या प्रकरणात चौकशी करण्यात येणार आहे. संबंधितांचे जबाब नोंदविण्यात येणार आहेत.
नेमकं काय झालं होतं?
विमानगर परिसरातील ‘द रुट्स स्पा’ येथे पोलिसांची कारवाई सुरु असताना महिला कर्मचारी आणि स्पा सेंटरच्या व्यवस्थापकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारली होती. विमानतळ पोलिस ठाण्याच्या पथकाने रविवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास स्पा सेंटरवर छापा टाकला होता. कारवाईदरम्यान अटकेच्या भीतीने महिला आणि व्यवस्थापकाने खिडकीतून उडी मारल्याचे पोलिसांनी सांगितले होते.
महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता, तर व्यवस्थापकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी तात्काळ पंचनामा करत स्पा सेंटरचा कारभार, परवाने, कर्मचारी नोंदी; तसेच अन्य बाबींची तपासणी सुरु केलेली.
स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या प्रकारांबाबत तक्रारी मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करत आला होता. घटनेबाबत स्पा सेंटरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि अन्य संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

