
Pune : शेअर बाजारात ऑनलाइन गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळेल,’ असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका ८८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची २२ कोटी तीन लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही आजवरची सर्वांत मोठी सायबर फसवणूक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.
तक्रारदार हे मूळचे गुरुग्राम (हरियाणा) येथील असून सध्या मगरपट्टा सिटी परिसरात वास्तव्यास आहेत. त्यांचा हडपसर औद्योगिक वसाहतीत छोटा कारखाना होता. करोना काळात आर्थिक अडचणीमुळे त्यांनी कारखाना विक्री केला. या व्यवहारातून मिळालेली मोठी रक्कम आणि इतर मालमत्ता विक्रीतून मिळालेले पैसे त्यांनी साठवून ठेवले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सायबर चोरट्यांनी तक्रारदारांच्या मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी स्वतःला ऑनलाइन शेअर ट्रेडिंग तज्ज्ञ असल्याचे भासवून, कमी कालावधीत मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी त्यांना एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जोडले. त्यानंतर बनावट ‘शेअर ट्रेडिंग अॅप’ डाउनलोड करण्यास सांगितले. या अॅपवर खोटी नफा-तोट्याची आकडेवारी दाखवून सुरुवातीला काही रक्कम गुंतवण्यास प्रवृत्त केले. तक्रारदाराचा विश्वास संपादन करण्यासाठी चोरट्यांनी काही दिवस तक्रारदारांच्या खात्यात लहान रक्कम जमा करून ‘परतावा मिळत आहे’ असे भासवले. त्यामुळे खात्री पटल्यावर तक्रारदारांनी वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे ट्रान्सफर करायला सुरुवात केली.
|
|
२६ मोबाइलचा वापर
अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तक्रारदारांनी सात बँकांमधील १५० वेगवेगळ्या खात्यांत पैसे पाठवले. ही खाती मुख्यतः नोएडा, कोलकाता, बंगळुरू आदी शहरांतील ‘म्यूल अकाउंट्स’ (भाड्याने वापरली जाणारी खाती) असल्याचे आढळले आहे. फसवणुकीसाठी चोरट्यांनी २६ मोबाइल क्रमांक, एक इंटरनेट-आधारित फोन नंबर, तीन वेब लिंक आणि बनावट ‘शेअर ट्रेडिंग अॅप’ वापरल्याचे पोलिसांनी सांगितले. तक्रारदारांनी सहज बोलताना मुलाला ऑनलाइन ‘शेअर ट्रेडिंग’मध्ये गुंतवणूक करत असल्याचे सांगितले. यानंतर मुलाला संशय आला. त्यानंतर कुटुंबीयांनी पुणे सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून पावणेपाच कोटींना गंडा
‘तुमच्या आधार कार्डचा वापर करून विविध राज्यांत बँक खाती उघडून ‘मनी लाँडरिंग’ करण्यात आले आहे. चौकशीसाठी तुम्हाला अटक होऊ शकते,’ अशी भीती दाखवत सायबर चोरट्यांनी कोंढवा परिसरातील एका महिलेची चार कोटी ८२ लाख १४ हजार ४१८ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटक झालेले नाहीत. संबंधित महिला (रा. कोंढवा) यांना १८ डिसेंबर २०२५ ते १५ जानेवारी २०२६ या कालावधीत सायबर चोरट्यांनी संपर्क साधला. त्यानुसार पीडित महिलेने एकूण चार कोटी ८२ लाख रुपये आरोपींच्या खात्यांवर जमा केले.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune : २६ मोबाईलच्या वापरातून ज्येष्ठ नागरिकाला २२ कोटींचा ऑनलाइन गंडा; पुण्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी सायबर फसवणूक उघडकीस”