
Pune : पोर्शे अपघात प्रकरणात मद्यधुंद अल्पवयीन मोटारचालक मुलाबरोबरच त्याच्याबरोबर असलेल्या दोन मुलांच्या रक्ताचे नमुने पोलिसांसमक्ष बदलण्यात आले, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी केवळ मोटारचालक मुलाऐवजी त्याच्या आईने रक्ताचे नमुने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली होती.
कल्याणीनगर अपघात प्रकरणात ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. अजय तावरे याच्या आदेशानुसार डॉ. श्रीहरी हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलण्यात आले. त्यावेळी तेथे काही पोलिसही उपस्थित होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आरोपपत्रात आरोपींची संख्या, त्यांचा सहभाग, त्याबाबत साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री अपघात झाला. अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला. अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळात हजर केले.
|
|
बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे अशा अटी, शर्तींवर त्याला जामीन मंजूर केला. अपघातानंतर पंधरा तासात मुलाची मुक्तता करण्यात आल्याने सामान्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी बाल न्याय मंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर बाल न्याय मंडळाने मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.
अपघातानंतर मुलाला वाचविण्यासाठी वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र यांनी प्रयत्न केले. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना अल्पवयीन मुलाने केलेला गु्न्हा अंगावर घेण्यासाठी धमकावले. ससून रुग्णालयात मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानीने स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपये पैसे देेण्यात आले. अगरवाल यांचा परिचित अश्फाक इनामदार, अमर गायकवाड यांच्यामार्फत बाल न्याय मंडळाच्या आवारात घटकांबळेला पैसे देण्यात आले होते.
ससूनमध्ये नेमके काय घडले ?
अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत मोटारीत त्याचे दोन मित्र होते. मित्र अल्पवयीन आहेत. ससून रुग्णालयात त्यांच्याही रक्ताचे नमुने घेण्यात आले. डाॅ. तावरे याच्या सांगण्यानुसार, डॉ. हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरला वैद्यकीय कक्षात बोलावून घेतले. तेथे अल्पवयीन मुलाऐवजी अन्य दोन मुलांचे रक्ताचे नमुने घेतले, अशी माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरचा तपशीलवार जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. डॉ. हाळनोर याने अल्कोहोलमध्ये भिजवलेला कापूस न वापरता कोरड्या कापसाने रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली होती, असे या डॉक्टरने जबाबात नमूद केले.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




