हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; महापालिका अधिकाऱ्यावर हल्ला, ५ जणांवर गुन्हा दाखल

 

 

 

 

 

 

 

Pune :हडपसरमध्ये अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईदरम्यान मोठा राडा झाल्याची घटना समोर आली आहे. पुणे महापालिकेच्या सहायक निरीक्षकाला भाजी विक्रेत्यांनी मारहाण केल्याचा आणि त्यांच्या गाडीची काच फोडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सविस्तर जाणून घेऊया...
गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास हडपसरमधील हांडेवाडी परिसरात ही घटना घडली. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या टीमने भाजी विक्रेत्यांविरुद्ध अतिक्रमण कारवाई सुरू केली होती. यावेळी काही भाजी विक्रेता महिलांनी कारवाईला विरोध दर्शवला.
त्यांनी सहायक निरीक्षक अमोल लावंड यांना शिवीगाळ केली आणि धमकावले. यानंतर एका व्यक्तीने निरीक्षकांच्या गाडीची काच फोडली.
या घटनेनंतर अमोल लावंड यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शीतल महेश डांगे, रेखा सुदेश रोकडे, शाहिन मियाँसाहेब शेख, उषा दादाराव गायकवाड आणि सोनू सुदेश रोकडे या पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक विष्णू देशमुख या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अतिक्रमण हटवण्याच्या कारवायांदरम्यान अशा घटना वारंवार घडत असल्याने, महापालिका आणि पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

1 thought on “हडपसरमध्ये अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; महापालिका अधिकाऱ्यावर हल्ला, ५ जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply to Gus1622 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *