
Pune : पश्चिम महाराष्ट्रातील रुग्णांसाठी ससून सर्वोपचार रुग्णालय हे अतिशय महत्त्वाचे आहे. दररोज हजारो रुग्ण या रुग्णालयात उपचारासाठी येतात. मात्र, गेल्या १० महिन्यांपासून या रुग्णालयाचा कारभार अधांतरीच आहे. रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिष्ठात्यांकडे असून एवढ्या काळात अद्याप पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्यात आलेला नाही. विशेष म्हणजे, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ या पुण्यातील असतानाही याकडे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या दोन वर्षांत ससूनमध्ये गैरप्रकारांची मालिका सुरू होती. त्यामुळे एकही व्यक्ती स्थिरपणे अधिष्ठात्यांच्या खुर्चीत टिकून राहिली नाही. अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील पलायन प्रकरणात नोव्हेंबर २०२३ मध्ये तत्कालीन अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना पदावरून हटविण्यात आले. त्यानंतर तातडीने डॉ. विनायक काळे यांच्याकडे अधिष्ठातापदाची सूत्रे देण्यात आली. डॉ. काळे यांच्या कार्यकाळात पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीचे रक्तनमुने बदलण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी ससूनमधील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉ. अजय तावरे यांना अटक करण्यात आली. याच प्रकरणात गेल्या वर्षी मे महिन्यात डॉ. काळे यांना अधिष्ठाता पदावरून हटवून सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले.
डॉ. काळे यांच्यानंतर ससूनच्या प्रभारी अधिष्ठातापदी डॉ. चंद्रकांत म्हस्के यांची गेल्या वर्षी मे महिन्यात नेमणूक करण्यात आली. डॉ. म्हस्के यांच्याकडे आधीपासून बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाचा कार्यभार होता. त्यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला. विशेष म्हणजे, एकाच महिन्याच्या आत जूनमध्ये डॉ. म्हस्के यांच्याकडील अतिरिक्त कार्यभार काढून घेण्यात आला. त्या जागी मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.
|
|
गेल्या वर्षी जून महिन्यापासून डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे ससूनच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. अद्यापपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाने पूर्णवेळ अधिष्ठाता नेमण्याची तसदी घेतलेली नाही. ससूनमधील या प्रभारी कामकाजामुळे रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर गंभीर परिणाम होत आहे. याबाबत भाजपचे आमदार डॉ. सिद्धार्थ शिरोळे यांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा अधिवेशनात मुद्दा मांडला होता. मात्र, वैद्यकीय शिक्षण विभागाने त्या दिशेने पावले उचललेली नाहीत.
मंत्र्यांची एकदाही ससूनला भेट नाही
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अंतर्गत ससून सर्वोपचार रुग्णालय येते. या विभागाचे राज्यमंत्रिपद माधुरी मिसाळ यांच्याकडे असून त्या पुण्यातील आहेत. त्यांनी मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून ससून रुग्णालयाला अद्यापर्यंत एकदाही भेट दिलेली नाही. ससून रुग्णालयातील अधिष्ठाता नियुक्तीपासून अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. असे असतानाही मंत्र्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. याबाबत मंत्री मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.
ससूनचे अस्थिर अधिष्ठातापद
नोव्हेंबर २०२३ – अमली पदार्थ तस्करीचा सूत्रधार ललित पाटील प्रकरणात डॉ. संजीव ठाकूर पदमुक्त.
मे २०२४ – पोर्श अपघात प्रकरणातील आरोपीच्या रक्तनमुने अदलाबदल प्रकरणात डॉ. विनायक काळे सक्तीच्या रजेवर.
मे २०२४ – बारामतीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.
जून २०२४ – मुंबईतील जे. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील अस्थिव्यंगोपचार विभागाचे प्रमुख डॉ. एकनाथ पवार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार.
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




