
Pune : पुणे विभागातील पुण्यासह १० रेल्वे स्थानकांना ‘ईट राइट स्टेशन’ मानांकन मिळाले आहे. अन्न तयार करण्यापासून ते प्रवाशांना खाण्यासाठी देण्यापर्यंतची प्रक्रिया योग्य पद्धतीने करण्याचे प्रशिक्षण या स्थानकांतील सर्व खाद्य विक्रेत्यांना देण्यात आले. याचबरोबर त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत चाचणी करून अखेर त्यांना हे मानांकन देण्यात आले आहे. यामुळे यापुढे रेल्वे प्रवाशांना स्वच्छ खाद्यपदार्थ खाण्यास मिळतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.
भारतीय अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाच्या (एफएसएसएआय) नेतृत्वाखाली ‘ईट राइट इंडिया’ ही मोहीम राबविली जाते. त्याअंतर्गत ‘ईट राइट स्टेशन’ हा उपक्रम आहे. या उपक्रमांतर्गत रेल्वे स्थानकावरील सर्व खाद्य विक्रेते, केटरिंग युनिट, रेस्टॉरंट, फूड कोर्ट तसेच लहान विक्रेत्यांना प्रशिक्षण दिले जाते. त्यात अन्न तयार करण्यापासून ते वाढण्यापर्यंत सुरक्षित स्वयंपाक आणि हाताळणी पद्धतींचे पालन करण्याचा समावेश असतो. अशा पद्धतीने प्रशिक्षण दिल्यानंतर सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून याचे पालन होते की नाही, याची तपासणी त्रयस्थ संस्थेमार्फत केले जाते. या चाचणीच्या आधारे संबंधित स्थानकाला ‘ईट राइट स्टेशन’ मानांकन दिले जाते.
|
|
पुणे विभागाअंतर्गत येणारे पुणे, कोल्हापूर, मिरज, सांगली, सातारा, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, साईनगर शिर्डी आणि शिवाजीनगर रेल्वे स्थानकांना हे मानांकन मिळाले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने हा उपक्रम राबविला. यासाठी मारिको इंडिया कंपनीकडून सामाजिक दायित्व निधी प्राप्त झाला होता. या उपक्रमासाठी समन्वय अधिकारी नारायण सरकटे यांनी काम पाहिले. तसेच पुणे रेल्वे स्थानकातील केंद्रीय अन्न सुरक्षा अधिकारी सुधीर कुमार यांनीही विशेष प्रयत्न केले.
पुणे विभागातील १० रेल्वे स्थानकांतील सर्व अन्न व्यावसायिकांना अन्न सुरक्षेबाबत प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्रयस्थ संस्थेकडून त्याची चाचणी करून नियमांची पूर्तता करण्यात आली. या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने या सर्व रेल्वे स्थानकांना ‘ईट राइट स्टेशन’ प्रमाणपत्र दिले आहे
शहर
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
- मुंबई: एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळत सचिव महेंद्र हरपाळकर यांची केली बदली!
महाराष्ट्र
- नागपूर: जग अनेक पेचात आणि द्विधा मनस्थितीत अडकलेय, भारताकडून जगाला मोठ्या अपेक्षा; सरसंघचालक मोहन भागवतांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य!
- बीड: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का; जळगावमध्ये नेत्यांचा पक्षाला रामराम, तर बीडमध्ये काँग्रेसची ताकद वाढली!
- मुंबई: ठाकरे बंधूंच्या ४ ऑक्टोबरच्या महामोर्चाच्या मार्गात मोठा बदल; आता भायखळ्याऐवजी 'या' ठिकाणाहून निघणार एल्गार मोर्चा!
- नाशिक: 5 वर्षीय मुलीच्या कथित अपहरणाने खळबळ; पोलिस तपासात कौटुंबिक वादाचे सत्य उघड
गुन्हा
- कोल्हापुर: साखरेचा वेळेत पुरवठा न करता व्यापाऱ्याची ६१ लाखांची फसवणूक; बाप-लेकाविरुद्ध गुन्हा दाखल
- मुंबई: CJP आणि अभिजीत दिपकेंच्या शिवाजी पार्क आंदोलनावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जोरदार टीका
- कोल्हापूर: मजरेवाडीत जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयते, कुऱ्हाडी चालल्याने ८ जण गंभीर जखमी
- अमरावती: प्रॅक्टिकल लिहून देण्यास नकार दिल्याने कॉलेजच्या पायऱ्यांवरच १९ वर्षीय तरुणीच्या गळ्यावर चाकूने जीवघेणे वार!
राजकीय
- नवी दिल्ली: धावत्या कारमध्ये सीएनजीचा भीषण स्फोट; २ आमदारांसह ६ जण जखमी!
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
इतर
- आजचे राशिभविष्य: गौरी विसर्जन आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने या राशींचे नशीब उजळणार, होणार बक्कळ कमाई!
- गौरी पूजन व गुरुवारचा शुभ संयोग: आजचे राशिभविष्य आणि कोणत्या राशींवर होणार स्वामीकृपा!
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात 'इंडिया' आघाडीचे रणशिंग फुंकले; देशव्यापी आंदोलने आणि निवडणूक आयोगावर धडक मोर्चाची घोषणा!
- कर्नाटक: मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि साखर कारखाने बंद पाडू राजू शेट्टींचा राज्य सरकारला आक्रमक आणि निर्वाणीचा इशारा!
- नवी दिल्ली: निवडणूक आयोगाचा मध्यरात्री मोठा निर्णय: फॉर्म ६ मधून एसआयआर (SIR) भाग वगळला, मतदारांवर नेमका काय परिणाम होणार?
- नवी दिल्ली: प्रियंका गांधींची मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी, मतदारयादीच्या मुद्द्यावरून सरकारवर तोफेचा डाग

























Subscribe to my channel




