
PM Modi Shivaji Park Sabha Mumbai : अखेर 17 मे रोजी मुंबईत पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी मनसेला शिवाजी पार्क येथील मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. या मैदानावरून मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं. अखेर सभेसाठी मनसेला मैदान उपलब्ध करून देण्यात आलं आहे. यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
18 मार्चला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं शिवाजी पार्क मैदान निवडणुकीच्या सांगता सभेसाठी उपलब्ध व्हावं यासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जाचा विचार करून मुंबई महानगरपालिकेला फर्स्ट कम फर्स्ट बेसिसवर मनसेला मैदान उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे, अशी माहिती मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिली आहे.
|
|
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं मनसेनं सत्तेचा गैरवापर करा हे मैदान पदरात पाडून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचा हा देखील दावा आहे की, पहिला अर्ज हा आमच्या वतीनं दाखल करण्यात आला होता. मात्र, मुंबई महानगरपालिका असो की, नगर विकास खाते असो दोन्ही सत्ताधारी पक्षाकडेच असल्यामुळे त्यांनी आमच्या अर्जाला केराची टोपली दाखवत मनसेला मैदान उपलब्ध करून दिलं आहे, अशी माहिती अनिल देसाईंनी दिली
पर्यायी मैदानांचा विचार सुरू : अनिल परब
2009 मध्येसुद्धा सारखीच परिस्थिती निर्माण झाली होती. निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी मनसेकडून आणि शिवसेनेकडून अर्ज करण्यात आले होते. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आधी अर्ज केला होता. त्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आली होती. शासनाच्या वतीनं विविध कार्यक्रमांसाठी 39 दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी सभा घ्यायची असेल, तर नगर विकास खात्याची परवानगी घ्यावी लागते. यंदा दोन अर्ज आल्यामुळे परवानगीचा मुद्दा हा नगर विकास खात्याच्या कोर्टात जाऊन पडला होता. आम्ही आधी अर्ज दिला होता. आम्हाला परवानगी मिळणं अपेक्षित होतं, आता जरी मनसेला परवानगी मिळाली असली तरी आम्ही पर्यायी मैदानाचा विचार करत आहोत, अशी माहिती अनिल परबांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मैदान मिळालं असलं तरी यंदाची पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा ही विशेष लक्षवेधी आहे. कारण या आधी कधीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिवाजी पार्क येथील मैदानात सभा पार पडली नव्हती. यापूर्वी भाजपचे नेते अटल बिहारी लालकृष्ण अडवाणी गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन अशा दिग्गज नेत्यांची सभा पार पडली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच या मैदानात सभा घेणार आहेत.
दरम्यान, एकंदरीतच महायुतीची शेवटच्या टप्प्यातली मुंबईतली होणारी सभा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे या ठिकाणी होणारे भाषण या बाबी पाहता मुंबईतल्या सहा आणि मुंबईच्या आसपासच्या लोकसभा मतदारसंघावर मतांचा टक्का वाढवण्यासाठी मदत करतील हे मात्र नक्की आहे.
शहर
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
- पुणे: वेळप्रसंगी स्वतःला विकेन, पण पैशांसाठी 'छत्रपती' कारखाना बंद पडू देणार नाही; अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांची अत्यंत भावनिक साद
- अहिल्यानगर: संतापजनक प्रकार; पवनचक्कीच्या निर्जन परिसरामध्ये नेऊन महिलेचे अपहरण व जबर मारहाण
महाराष्ट्र
- नांदेड: अनोखी परंपरा! मातीच्या मूर्तीऐवजी चक्क ३ सनांकच मानले साक्षात महालक्ष्मी; कंधारमधील येइलवाड कुटुंबाचा कौतुकास्पद सोहळा
- पुणे: हायप्रोफाइल 'द न्यू पूना क्लब'च्या किचनमध्ये जिवंत झुरळे अन् उंदराची विष्ठा; FDA च्या धडक कारवाईत परवाना तत्काळ रद्द!
- छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षण न्यायालयीन लढाई: कायदेशीर लढा आणखी तीव्र करण्यासाठी विनोद पाटील यांची नवी रणनीती समोर!
- पुणे: युट्यूबर्स संतोष पंडीत यांनी सांगितला तुरुंगात गेल्याचा थरारक आणि भयानक अनुभव; म्हणाले, त्या दिवसांत...
गुन्हा
- हिंगोली: वसमतमध्ये खळबळ! पडक्या आणि निर्जन विश्रामगृहात आढळला ३२ वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृतदेह; डोक्यावर गंभीर जखमा असल्यामुळे हत्येचा दाट संशय
- पुणे: "आम्ही इथले भाई... बघतोय काय!"; पुण्यात उघडपणे कोयता फिरवून नागरिकांमध्ये दहशत पसरवल्याची धक्कादायक घटना!
- छत्रपती संभाजीनगर: लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून मेडिकल दुकानात घुसून २२ वर्षीय केमिस्टची निर्घृण हत्या, पोलिसांनी अवघ्या ९ तासांत आवळल्या आवडी
- अहिल्यानगर: दूध वाहतूक करणाऱ्या चालकाला एकट्यात गाठून कोयत्याने सपासप वार करत संपवले, खर्ड्यातील घटनेने खळबळ
राजकीय
- पुणे: लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप करत महिलेचा सर्वसाधारण सभेत आत्मदहनाचा प्रयत्न
- मुंबई: 'आंबा चोरला म्हणून फाशी नसते, नीट पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरू कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेस-मनसेचा संताप'
- नवी दिल्ली: पंतप्रधान मोदींचं सीजेपी आंदोलनावर मोठं भाष्य, 'युवकांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही, कठोर कारवाईचा इशारा!'
- नवी दिल्ली/मुंबई: महाराष्ट्रातील २० जिल्हा परिषदा आणि २११ पंचायत समित्यांच्या निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याचे निर्देश
इतर
- आजचे राशिभविष्य १७ सप्टेंबर २०२६: गौराईच्या आगमनाने या राशींचे नशीब उजळणार, होणार मोठा धनलाभ!
- पंचांग १६ सप्टेंबर २०२६: कलानिधी योग, नीचभंग राजयोग आणि गणेशोत्सवातील शुभ मुहूर्त; जाणून घ्या संपूर्ण माहिती
- आजचे राशिभविष्य १५ सप्टेंबर २०२६: महादेवाची कृपा आणि गणेशाची साथ या राशींसाठी ठरणार भाग्य चमकवणारी, होणार धनलाभ!
- आजचे राशिभविष्य ११ सप्टेंबर २०२६: धनलक्ष्मीच्या कृपेने वाढणार बँक बॅलन्स, शुक्र देणार लक्झरी लाईफस्टाईल!
मनोरंजन
- 'ईथा' चित्रपटावरून नवा वाद; विठाबाई नारायणगावकर यांच्या कुटुंबीयांचा तीव्र आक्षेप
- ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!
- मनोरंजन: दिलजीत चा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात,काय आहे कारण ?
- मराठी हॉरर -कॉमेडी चित्रपट 'भूतम भयम्'!! अभिनेत्री छाया कदम यांचा भीतिदायक लूक समोर
देश विदेश
- नवी दिल्ली: पहिले शिवसेना, नंतर राष्ट्रवादी आणि आता तृणमूल काँग्रेस; टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवल्यावरून राहुल गांधींचा केंद्र सरकार व निवडणूक आयोगावर कडाडून हल्लाबोल
- दिल्ली: विद्यापीठ निवडणूक २०२६ मतदानाच्या पूर्वसंध्येला नॉर्थ कॅम्पसमध्ये दोन विद्यार्थी गट भिडले, तुफान हाणामारीत एक विद्यार्थी गंभीर जखमी!
- बिहार: गोड खाण्याचा आनंद ठरला शेवटचा! घशात रसगुल्ला अडकल्याने ८ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू; हळहळ व्यक्त!
- कर्नाटक: बेळगावात गणेशोत्सवाच्या रात्री भीषण दुर्घटना! रेफ्रिजरेटरचा (फ्रिज) स्फोट होऊन लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील ४ जणांचा जिवंत जळून करपून मृत्यू!



























Subscribe to my channel




